वाचवावे राष्ट्र : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि महाराष्ट्र
आपापसात मतभेद जसे भाजपात आहेत तसे ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील अगदी गाव पातळीपासून तर नागपूरपर्यंत आणि थेट संघाच्या राष्ट्रीय परराष्ट्रीय पातळीवर देखील आहेत, असतात पण एकतर संघात शिस्तीला प्रचंड महत्व त्यामुळे त्यांचे आपापसातले मतभेद मनभेद बाहेर ऐकायला बघायला अजिबात मिळत नाहीत, अत्यंत महत्वाचे म्हणजे झालेले मतभेद मनभेद मिटवून टाकण्यासाठी दोन्ही गटातले स्वयंसेवक आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागतात अत्यंत महत्वाचे म्हणजे संघाचे इतरांसारखे अजिबात नाही म्हणजे एकदा का त्यांचे आपापसातले मतभेद मिटले कि एकमेकांविषयीची झालेली त्यांची नाराजी पुढल्या क्षणी संपून ते एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून लगेचच पुढली मोहिम फत्ते करण्या सज्ज होतात विशेष म्हणजे संघात त्याच्या स्थापनेच्या दिवसापासून तर आजपर्यंत सतत तेही जगभरतले सारेच्या सारे पदाधिकारी आणि स्वयंसेवक सतत कायम हिंदू राष्ट्र बलवान करण्यासाठी, मोहीम फत्ते करण्यासाठी, आक्रमण करू पाहणाऱ्या जगभरातल्या तमाम हिंदूंच्याशत्रूंना मोठ्या खुबीने युक्तीने जेरीस आणण्यासाठी कोणतेही शस्त्र अजिबात हाती न घेता यश संपादन करण्यासाठी या साऱ्यांची सतत धडपड सुरु असते, थकणे व थांबणे हे दोन्ही शब्द रा स्व संघाच्या शब्दकोशात नाहीत, अगदी आमच्या विदर्भातले अनेक असंख्य बहुसंख्य आळशी सुद्धा जर संघ स्वयंसेवक असतील तर त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी किंवा मोहीम जोपर्यंत ते पूर्ण करून मोकळे होत नाहीत एरवी ते खूप आळशी असून सुद्धा संघ कार्यात मात्र वाहून घेतांना दिवसरात्र अहोरात्र मेहनत घेतांना मी स्वतः बघितले अनुभवले आहेत किंवा तुम्ही देखील तुमची नजर तीक्ष्ण ठेवून संघात व्यस्त असणाऱ्यांचे निरीक्षण केले तर एखाद्या ख्रिस्ती पाद्रीने देखील मान खाली घालावी अशी त्यांच्या कामाची बेमालूम संयमी पद्धत असते आहे. याठिकाणी आपल्याला संघ आणि भाजपाबाबत देश पातळीवर येथे काहीही बोलायचे नाही मात्र आपल्या या राज्यात, महाराष्ट्रात त्यांचे नेमके काय सुरु आहे आणि आपण हिंदू भविष्यात सुरक्षित राहण्यासाठी ते नेमके काय करताहेत किंवा त्यांना सहकार्य करणे आपले कसे कर्तव्य आहे हे नेमके मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात याचा अर्थ मी भाजपा कार्यकर्ता आहे किंवा संघ स्वयंसेवक आहे असा त्यातून अजिबात अर्थ काढू नका किंबहुना मी संघ भाजपामध्ये मोठ्या खुबीने घुसून तुमच्यासमोर नको ती नेमकी माहिती उघड करतो म्हणून हेच संघ भाजप्पावाले नक्की माझ्या नावावे ठणठणा बोंबा मारणार आहेत पण नेमके सत्य उघड करण्यात तर माझी पत्रकारिता नामचीन आहे, बदनाम आहे…
www.vikrantjoshi.com
उद्धव ठाकरे हे काँग्रेस, मुस्लिम, राष्ट्रवादी, मुस्लिम धार्जिणे पक्ष किंवा संघटना थोडक्यात हिंदू विरोधी किंवा मुस्लिम धार्जिण्या विचार प्रवाहात केवळ सत्तेच्या लोभापायी आदित्य यास मंत्री करण्याच्या नादात आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सांगण्यावसरून चुकीच्या आग्रहावरून मुख्यमंत्री झाले आणि तेथेच ते पूर्णतः संघ व भाजप तसेच मोदी शाह भागवत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नजरेतून पडले, मुख्यमंत्री होण्याची मोठी चूक केल्यानंतर जर पुढल्या काही महिन्यात याच उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम धार्जिण्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्यावर आजचे राजकीय संकट नक्की कोसळले नसते पण संघ आणि भाजपा तुम्हाला राजकारणातून संपवायला निघाले आहेत असे त्यांच्यावर काहींनी बिंबवले आणि उद्धव राजीनामा देण्याऐवजी जेव्हा आघाडीला चिटकून राहिले तेव्हाच देशपातळीवर संघ व भाजपाचे ठरले कि उद्धव व त्यांच्या शिवसेनेला आता संपवून मोकळे व्हायचे शिवाय उद्धव यांच्या चिक्कू, व्यवहारी, लबाड आणि शरद पवार व आघाडीच्या चुकीच्या नेत्यांच्या आहारी जाण्याच्या भूमिकेला वागण्याला त्यांच्याच शिवसेनेचे कट्टर हिंदू नेते बहुसंख्य नेते आमदार खासदार मंत्री व पदाधिकारी कंटाळलेले वैतागलेले असल्याने संघ भाजपा व उद्धव यांच्यावर नाराज असलेले त्यांच्याच सेनेतले अतिशय प्रभावी नेते हळू हळू एकत्र यायला लागले फडणवीस यांनी त्या साऱ्यांना अतिशय विश्वासात घेतले आणि पुढले रामायण घडले. काही दिवसांपूर्वी मी जे नेमके सांगितले तीच वस्तुस्थिती आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपा, विश्व् हिंदू परिषद, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, सेवा भारती, राष्ट्र सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी ज्या विविध क्षेत्रात काम करणार्या संघटना किंवा उपशाखा आहेत त्याच धर्तीवर यापुढे एकनाथ शिंदे यांची धनुष्य बाण असलेली शिवसेना विशेषतः संघ व भाजपाच्या सहकार्याने या सेनेची वाटचाल देशभर असेल. जोपर्यंत याच पद्धतीने म्हणजे एकनाथ शिंदे पद्धतीने उद्धव ठाकरे संघ व भाजपाशी युती करून होते तोपर्यंत मातोश्रीच्या सेनेला संपविण्याची ताकद कधीही इतरांची झाली नाही पण बाळासाहेबांनी न केलेली चूक उद्धव यांनी तेही त्यांच्या पश्चात केल्याने आज तरी उद्धव व त्यांची सेना मोठ्या राजकीय संकटात सापडलेली आहे. पण अतिशय महत्वाचा मुद्दा असा कि उद्धव व त्यांचे कुटुंब लबाड कसे हे जसे त्यांच्या बड्या नेत्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या लक्षात आले आणि एकत्र ते जसे बाहेर पडले नेमके ते यश सामान्य मतदारांच्या बाबतीत आजही संघ भाजपा आणि शिंदे शिवसेना इत्यादी उद्धव विरोधकांना अजिबात न आल्याने उद्धव यांना मोठी सहानुभूती मिळते आहे, त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते आहे, नेमके उद्धव नेतृत्वात लबाड कसे हे त्यांच्या या प्रभावी विरोधकांना जर पटवून सांगण्यात अपयश आले तर नक्की राज्यातल्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकात त्याचा मोठा फटका भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे, उद्धव समस्त हिंदूंना, मराठी माणसाला खड्यात टाकणारे कसे त्यावर पटवून समजावून सांगण्याची आणि त्यातून मत व मन परिवर्तन करण्याची फार मोठी जबाबदारी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या साऱ्याच नेत्यांवर येऊन पडलेली आहे…
क्रमश: हेमंत जोशी