घराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी
लोकांना आता ठोस काहीतरी ऐकायचे आहे त्यांना मोदी आणि ठाकरे तुमच्याकडून बुढी के बाल खायला नको आहेत म्हणजे खाताना तेवढे गॉड गॉड एकदा तोंडात विरघळले कि ना चव राहते ना भूक भागते. असे आता यापुढे त्यांना तुमच्याकडून काहीही नको आहे अन्यथा तुमचे वाहिन्यांवर येऊन बोलणे एक मजाक बनके राहेगा, मोदीजी भारतीय तुम्हाला आणि ठाकरेजी राज्यातले तुम्हाला अशाने यापुढे अजिबात सिरीयस न घेता विशेषतः सोशल मीडियावर तुम्हा दोघांची सारे नेटकरी खिल्ली मजाक टिंगल उडवून मोकळे होतील. १८ मेला सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा विविध वाहिन्यांवर आले जनतेला ते आज नक्की काहीतरी वेगळी घोषणा किंवा आश्वासक निर्णय घेऊन सांगून मोकळे होणार आहेत वाटले होते म्हणून त्यादिवशी झाडून सारे मधुचंद्राच्या राती जसे घरातले तरुण सदस्य नवपरिणीत जोडप्याच्या खोलीजवळ कान टवकारून आणि डोळे फाडून लक्ष ठेवून असतात कि निदान आज तरी पलंग जोरजोरात हलण्याचा, जागेवरून काहीतरी उंचच उंच उडण्याचा आवाज येईल तसे सारे त्यापद्धतीने दूरदर्शन संचासमोर बसलेले होते पण कसले काय नि कसले काय, चक्क पाऊण तास ठाकरे तुम्ही बोलत होते पण ठोस काहीही निघाले नाही तोच नेहमीचा टाइम पास तेच तुमचे नेहमीचे प्रत्येकाच्या तोंडात बुढी के बाल किंवा पिटुकली लिम्लेटची गोळी कोंबण्यासारखे झाले म्हणजे जोपर्यंत गोळी चघळतो तोपर्यंत बरे वाटते, एकदा का गोळी विरघळली कि ना पॉट भरणे ना कुठले समाधान. एक घरगुती साधा सरळ मुख्यमंत्री अशी तुम्ही बेमालूम आपल्या राज्यात मिळविलेली प्रतिमा, अशाने घालवून बसाल, जनता फ्रस्ट्रेट आहे, त्यांना काहीतरी ठोस हवे आहे. तुमचे हे तर भाषण असे झाले कि सोशल मीडियावर झळकणारी इकडली तिकडली वाक्ये तुम्हाला हर्षल प्रधान यांनी एकत्र जोडून दिलीत आणि तुम्ही ती वाक्ये जशीच्या तशी शाळेतल्या निबंध वाचून दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी पाठ म्हणून दाखवलीत, असे कृपया पुन्हा घडू नये, कदाचित इतर हुजरे तुम्हाला फॅक्ट सांगणार नाहीत, मला मात्र गप्प बसणे शक्य नाही, शक्य नव्हते…
त्याआधी एबीपी माझा वर कोरोना मधून सहीसलामत बाहेर पडलेले मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत अशीच सर्वांनी कान टवकारून ऐकली. मी तर तुम्हाला आधीच सांगितले होते, आव्हाड लढवय्ये आहेत ते हि जीवघेणी ठरलेली ठरणारी लढाई देखील नक्की जिंकून येतील, नेमके तेच घडले, बरे वाटले आव्हाड मृत्यूच्या दारातून बाहेर पडले, सहीसलामत आले. त्यांनी आपल्या मुलाखतीमधून जे विदारक सत्य मांडले आज तेच चित्र अमाप पैसे आणि प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या प्रत्येकाच्या घरातले आहे विशेषतः पुढारी पोलीस पत्रकार प्रशासन शासन दलाल व्यापारी इत्यादी साऱ्यांच्यायच घरातले ते दृश्य आहे जे आव्हाड यांनी मनापासून मांडले. ज्याला आपण उपरती होणे असे म्हणतो ते आव्हाड यांच्या बाबतीत घडले आणि हे असे, मी आव्हाड यांना माजलेला नेता असे नक्की म्हणणार नाही पण प्रत्येक माजलेल्या आणि बरबटलेल्या व्यक्तींच्या घरातून नेत्यांना साऱ्यांना उपरती व्हावी. बायको कुठे मुले कुठे आणि आपण कुठे फिरतोय पैसे मिळविण्याच्या हे राज्य विकण्याच्या नादात यात सहभागी असलेल्या कोणाचेही लक्ष नाही. अगदी संध्याकाळचे जेवण देखील एकत्र होत नाही कारण नवरा त्याच्या गर्लफ्रेंड बराबर जेऊन येतो, मुले मुली कुठेतरी पब मध्ये पडलेले असतात आणि बायका एकतर आपल्या शौकिन मैत्रिणींबरोबर मजा मस्ती करण्यात गुंतलेल्या असतात किंवा त्यांना देखील त्यांचे बॉय फ्रेंड असतात. ज्यावेगाने काळा पैसे अनेकांच्या घरातून आला आहे त्याच वेगाने तो त्या त्या कुटुंबाची विल्हेवाट लावण्यात गुंतलेला आहे आणि हेच नेमके सत्य आहे जे तुम्हाला आणि मला देखील अमान्य करून चालणार नाही, आव्हाड बोलले, सत्य तेवढे त्यांनी अगदी मनातून मांडले इतर बोलत नाहीत बोलणार नाहीत एवढाच काय तो फरक…
तुम्हाला सत्य तेच सांगतो, कोरोना लॉक डाऊन घोषित होण्याआधी गेली कित्येक वर्षे मी फार कमी घरी जेवत असे कारण घरात तीन तीन बायका म्हणजे सुना किंवा पत्नी असतांना या तिघींना स्वयंपाक तरी येतो किंवा नाही येथपासून माझी तयारी होती. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशी एकदम प्रोफेशनल त्यामुळे समोर अगदी ताजे व गरम अन्न आले तरच खावेसे वाटे, टिफिन नेला तर दुपारी आपण माती खातोय कि अन्न, नेमके कळत नसे पण कोरोना ने चमत्कार केला आज माझ्या घरातला माझ्यासहित प्रत्येक सदस्य विशेषतः माझ्या दोन्ही सुना आणि धाकटा विनीत ज्यापद्धतीने प्रत्येक पदार्थ समोर मांडतात, आईशपथ, असे चवदार अन्न फूड जेवण तत्पूर्वी मी जगातल्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात कधी देखील खाल्ले नव्हते. धन्यवाद कोरोनाला ज्याने घराला घरपण दिले….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.