भाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत…
उमाकांत देशपांडे लोकसत्तेचा वार्ताहर आहे मीडियातल्या इतर अनेकांसरखा तो भ्रष्ट भामटा दलाल नाही, पत्रकारितेशी तो अत्यंत प्रामाणिक आहे त्याच्याकडे मी कायम आदराने बघतो आणि मीडियातला मग तो कितीही मोठा असला पण दलाली करणारा असला तर त्यांना मात्र मी कायम पायाशी ठेवतो. मंगळवार 31 मे च्या लोकसत्तेत याच उमाकांत देशपांडे यांनी, महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राम्हण नेतृत्व अडगळीत, मथळ्याखाली छोटासा लेख लिहिला आहे छापला आहे. जसे एखाद्या विवाह समारंभाला कोणीही केवळ त्रिकोणी अंडरवेअर घालून जात नाही तसेच जेव्हा आपण एखाद्या गंभीर विषयाला हात घालतो ते लिखाण व्यापक असावे, देशपांडे यांनी विषय छान निवडला पण विषयाची अवस्था सूट बूट न घालता त्रिकोणी अंडरवेअर घालून एखाद्या विवाह समारंभाला जाणाऱ्यासारखी येथे देशपांडे यांची झाली आहे. अत्यंत चांगला विषय त्यांनी थोडक्यात आटोपता घेतल्याने एखाद्याचा मधुचंद्र रात्रभर चालण्याऐवजी पहिल्या पंधरा मिनिटात आटोपल्यासारखा देशपांडे यांचा लेख अगदीच पिटुकला झाला आहे पण तरीही उमाकांत यांनी स्वतः संस्कारी ब्राम्हण असूनही ब्राम्हण विषयाला हात घातला हेही नसे थोडके. देशपांडे यांनी लिहिलेल्या मुद्द्यांचा येथे उहापोह करायचा झाल्यास प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले आणि विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर घेतलेले नाही याचा अर्थ फडणवीस मोदी आणि भाजपाने त्यांना यापुढे कायमचे दुर्लक्षित केले असे अजिबात नाही किंबहुना मंत्री मंडळातून काढल्यानंतर जावडेकर त्या बावनकुळे पद्धतीची भूमिका घेऊनच मोकळे झाले म्हणजे त्यांनी मोदी किंवा संबंधितांविषयी मनात राग आकस बदल्याची भावना आरडाओरड असे काहीही न करता जावडेकर शांत आहेत आणि माझी माहिती अशी कि त्यांचे सत्तेत किंवा भाजपामध्ये नजीकच्या काळात मोठे पुनर्वसन नक्की केले जाणार आहे, तेच विनय सहस्त्रबुद्धे यांच्याही बाबत शंभर टक्के तेच घडणार आहे, कारण ज्यांची पक्षात चालते किंवा दादागिरी आहे किंवा ज्यांना डिसिजन पॉवर आहे त्या मोदी शाह किंवा इतर संबंधितांचे हे दोघेही ब्राम्हण आवडते आहेत लाडके आहेत….
विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रकाश जावडेकर यांचे मात्र राज्याच्या महाराष्ट्राच्या बाबत जे कायम विटाळशी बाईसारखे वागणे असते ते नक्की खटकणारे आहे असते. नव्याने लग्न झालेली गावाकडली नवरी कशी चार दिवसाच्या नकोशा विटाळपणात क्षणभर नवऱ्यासमोर उभी राहून आणि छद्मी हसून एका क्षणात आसुसलेल्या कातावलेल्या कंटाळलेल्या कामुक झालेल्या नवर्या समोरून क्षणार्धात निघून जाते, जावडेकर सहस्त्रबुद्धे यांचे महाराष्ट्रातल्या अगदी भाजपा कार्यकर्त्यांसमोर किंवा नेत्यांसमोर देखील हे असे विटाळशी नव्या नवरीसारखे कायम वागणे बोलणे असते, मला तर अनेकदा असे वाटते कि विनय सहस्त्रबुद्धे यांचा या राज्यात गोरेगावातला धनंजय पांडे हा एकमेव ओळखीचा कार्यकर्ता आहे असावा. भटजी आणि शेटजी यांचा पक्ष म्हणजे भाजपा हि जी या राज्यात भाजपाची प्रतिमा होती ती एकेकाळी फार चुकीची होती असे नक्की नाही किंबहुना या राज्यातले शेटजी संघात आणि भाजपामध्ये होते त्यामुळेच संघ विशेषतः भाजपाचा आर्थिक डोलारा त्याकाळी बऱ्यापैकी सावसरल्या जायचा अर्थात देशात किंवा राज्यात जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेत आली याच संचेती खंडेलवाल यांच्यासारख्या साऱ्याच शेटजी मंडळींनी कितीतरी पटीने अधिक खर्च झालेला पैसा वसूल केला, आजही अशांचे तेच धंदे सुरू आहेत, लुटणे लुबाडणे अव्याहत सुरु आहे. संघ आणि जनसंघ किंवा आजचा भाजपा काळा नुसार कालानुरूप स्वतःत धाडसी दूरदर्शी व्यापक आधुनिक झपाट्याने वेगाने दूरदृष्टी ठेवून बदल करीत गेले म्हणूच ते बलाढ्य काँग्रेसला सम्पवून स्वतः देशात राज्यात सत्तेतवर आले अन्यथा ते जर कायम शेटजी व भटजी भोवताली रेंगाळत बसले असते तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस किंवा पवारांनी त्यांना कधीही तोंड वर काढू दिले नसते. तरीही मला वाटते आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास भाजपाला जेवढे या राज्यातल्या ओबीसींनी त्यांना भाजपामध्ये मान आणि स्थान दिल्यानंतर जेवढे उत्स्फूर्त उचलून धरले जेवढे ते भाजपामय होऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात ओबीसींनी जेवढी मोठी साथ व साद दिली दुर्दैवाने अद्याप ते मराठ्यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात भाजपा संघामध्ये अजिबात घडलेले नाही, भाजपामध्ये आलेले बहुसंख्य जवळपास सारे मराठा नेते आजही कुंपणावर बसून आहेत कुंपणावरच बसून असतात ते केव्हाही कोलांट्या उड्या मारून या पक्षातून त्या पक्षात निघुन जातील संघ भाजपातल्या निष्णात नेत्यांच्या देखील ते अजिबात लक्षात येणार नाही आणि हेच त्रिवार सत्य आहे. जसे राष्ट्रप्रेमी मुस्लिमांना कुरवाळून गोंजारून त्यांना आपलेसे करून या देशातली या राज्यातली भाजपा त्यांना झपाट्याने आपल्याकडे ओढते आहे, आकर्षित करते आहे. तेच महत्वाचे मोठे काम राज्यातल्या भाजपाला विशेषतः प्रभावी राजकीय रस व आवड असलेल्या मराठ्यांच्या बाबतीत नक्की व तातडीने करावे लागणार आहे. मध्यंतरी मला जळगावचे कट्टर संघ स्वयंसेवक दीपक घाणेकर म्हणाले कि जो कोणी एकदा संघ शाखेत हजेरी लावून जातो तो मनातून आपोआप कायमस्वरूपी संघाचा स्वयंसेवक होतो जरी त्याला संघाचे काम कार्य करणे जमत नसले तरी. नेमकी हीच भूमिका जर ओरिजनल संघ भाजपा कार्यकर्त्यांनी किंवा स्वयंसेवकांनी राज्यातल्या समस्त बहुसंख्य मराठ्यांवर फोकस केली तर भविष्यात त्यांना वापरून घेणारे कुंपणावर बसणारे बसलेले बाहेरून आलेले भाजपा नेते, कार्यकर्ते नक्की बघायला मिळणार नाहीत. माय डिअर उमाकांत देशपांडे भाजपा आणि ब्राम्हण हा विषय येथे संपत नाही, पुन्हा पुढल्या भागात…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी