इकडले तिकडले राज्यातले…

इकडले तिकडले राज्यातले…

अलीकडे या दिवसात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हादरले आहेत कि घाबरले आहेत अस्वस्थ आहेत कि अशांत भ्यायले आहेत कि वरमले आहेत कि नरमले आहेत, नेमके आत्ताच नक्की सांगता येणार नाही पण उद्धवजी मनातून मनापासून यादिवसात अगदी शंभर टक्के अस्वस्थ आहेत तरीही उसने अवसान आणून आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू यासाठी सरकली आहे कि केवळ फक्त कमवायला बसलेले त्यांचे दोन्ही साथीदार म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी केव्हा त्यांचा पाठिंबा काढून त्यांना एकटे पाडतील किंवा रस्त्यावर आणतील नेमके सांगता येत नाही आणि उद्धवजीबाबत स्पष्ट बोलायचे सांगायचे झाल्यास पाण्यात आकंठ बुडणाऱ्या माकडिणीसारखी यादिवसात परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी नाकातोंडात जाते आहे त्यामुळे कधी त्यांना अनिल परबांच्या तर कधी संजय राऊत यांच्या तर कधी श्रीधर पाटणकर यांच्या तर कधी यशवंत जाधव यांच्या खांद्यावर पाय ठेवून बुडण्यापासून वाचण्यासाठी उभे राहावे लागते आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. संजय पांडे आणि किमान सभयता पाळणारे दिलीप वळसे पाटील त्या भामट्या आणि भ्रष्ट अनिल देशमुख यांच्यानंतर गृह खात्यात आले नसते तर उरली सुरली अब्रू देखील महाआघाडीची वेशीवर क्षणार्धात टांगल्या गेली असती. अर्थात कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाट लागलेली आहे कि मुंबईतल्या लेडीज बार आणि हुक्का पार्लरचे दर दिवसाचे प्रत्येकी उत्पन्न किमान पन्नास लाख आहे असते. आणि हि तर केवळ झलक तुम्हाला मी सांगतो आहे दाखवतो आहे. सामान्य, रिस्क घेणारा प्रसंगी जीवाची घराची काळजी चिंता न करता रस्त्यावर उतरून शिवसेनेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा शिवसैनिक आजही भूका नंगा कंगाल म्हणून आयुष्य कंठतो जगतो आहे आणि सेना नेते केवळ कमवायला बसलेले आहेत, काँग्रेस व राष्ट्रवादी ठेवायला जागा नसतांना दिवसागणिक कमावून लुबाडून मोकळे होताहेत त्याचे वाईट परिणाम नेमके उद्धव यांच्या लक्षात आलेले असल्याने ते या दिवसात कमालीचे अस्वस्थ अशांत अस्थिर झालेले आहेत माझी तशी नेमकी माहिती आहे…

अलीकडे बावनकुळे यांच्याकडल्या विवाह स्वागत समारंभ सोहळ्यात रा स्व संघातल्या दोन महान व मोठ्या हस्तींशी माझे ऑफ द रेकॉर्ड काही मुद्द्यांवर बोलणे झाले, पाक विचारांच्या या राज्यातल्या या देशातल्या मुसलमानांवर मी जे अनेकदा लिहितो ते मुद्दे खोडून काढत हे दोन्ही दिग्गज मला म्हणाले कि देश हिताच्या विरोधात किंवा कायम बदला घेण्याच्या किंवा बंड करण्याच्या सतत मूड मध्ये असलेले काहीसे हिंसक काहीसे कट्टर काहीसे बदमाश काहीसे बदनाम काहीसे हलकट काहीसे अस्वस्थ व अशांत मुसलमान या देशात किंवा आपल्या राज्यात जरी मोठ्या प्रमाणात सतत ऍक्टिव्ह असले तरी याच मुसलमानांमध्ये असा एक फार मोठा वर्ग आहे ज्याला या देशाविषयी प्रेम आहे विशेष म्हणजे पाकिस्थान विषयी त्याच्या मनात नफरत आहे, हिंदुस्थानावर मनापासून प्रेम करणाऱ्या या मुस्लिमांना हिंदूंसंगे कायम मुख्य प्रवाहात येऊन काम करावे प्रगती साधावी खूप मोठे व्हावे मानसन्मान मिळवावा आर्थिक शैक्षणिक बौद्धिक प्रगती साधावी असे या हिंदुस्थानी प्रेमी मुस्लिमांना कायम वाटत असते आणि या अशा राष्ट्रप्रेमी मुस्लिमांची अस्वस्थता जेव्हा भाजपामध्ये काम करणाऱ्या काही विचारवंत मुस्लिमांनी नरेंद्र मोदी मोहन भागवत किंवा अन्य काही नेत्यांच्या नजरेत आणून दिली, त्यानंतर भाजपा विशेषतः आणि संघ देखील या राष्ट्रप्रेमी मुस्लिमांचे सबलीकरण करण्यात जुंपला आहे गुंतला आहे विशेष म्हणजे आम्ही सुरुवात ज्या उत्तर प्रदेश मधून केली तेथे असलेल्या पूर्वीच्या बहुसंख्य वात्रट जात्यांधमुस्लिमांचे मुस्लिम तरुणांचे हृदय परिवर्तन करण्यात आणि त्यांच्या मनातली भाजपाविषयी संघाविषयी नफरत आणि भीती घालविण्यात आम्ही कमालीचे यशस्वी ठरलो आहोत आणि हि केवळ सुरुवात आहे, आम्ही आता महाराष्ट्रात देखील हा प्रयोग राबवणार आहोत आणि त्यादृष्टीने जर तुमच्या नजरेत सुशील राष्ट्रप्रेमी पराक्रमी देशभक्त मुस्लिम तरुण आढळले तर त्यांना कृपया फडणवीस यांची तरी निदान भेट घालवून द्या. जेथे माझे मन कायम अस्वस्थ व्हायचे त्याची सुरुवात यापुढे महाराष्ट्रात आपल्या राज्यात होणार बघून मला मनापासून आनंद झाला कि हिंदूंकडून सततची होणारी हेळसांड टिंगल टवाळी अपमान दुर्लक्ष अलिप्तता या प्रकारामुळे राज्यातला किंवा देशातला या देशावर या राष्ट्रवर मनापासून मनातून प्रेम करणारा मुस्लिम वर्ग देखील दुरावण्याची जी मोठी शक्यता निर्माण झालेली होती, त्याला मोठा आळा नक्की बसू शकेल आणि खर्या अर्थाने राज्यात देशात हिंदू मुस्लिम भाई भाई हे चित्र मोठ्या प्रमाणावर नक्की बघायला मिळेल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top