भाग 2 : राज हेअर कटिंग सलून …

भाग 2 : राज हेअर कटिंग सलून …

राज ठाकरे यांनी उत्तर सभेत माझ्या आजवरच्या लिखाणाचे दाखले घेत भाषण केले असा वेडा दावा मी नक्की करणार नाही पण आजवर जे मी तुम्हाला बेंबीच्या देठापासून सांगत होतो त्याची दाखल राज ठाकरे यांनी घेतली त्याचा मला मनस्वी आनंद आहे आणि राग आजही अजिबात नाही पण मनापासून त्या शरद पवार यांच्याविषयी यासाठी वाईट वाटते कि पवारांनी क्षणिक फायद्यासाठी या राज्याचे राज्यातील समस्त जनतेचे हिंदूंचे मराठी माणसाचे आणि स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले नुकसान करून ठेवले. क्षणिक तात्पुरत्या फायद्याचा विचार करणारे स्वतःचे जसे नुकसान करवून घेतात त्याचवेळी ते सभोवतालचे वातावरण देखील बिघडवून ठेवतात, गरज अजिबात नव्हती राज्यातल्या पाक विचारांच्या काही मुसलमानांना डोक्यावर बसवून घेण्याची त्याचवेळी समस्त मराठा समाजाला कळत नकळत इतर हिंदूंपासून दूर नेण्याची पण हे पाप पवारांनी केले आणि राज्य रसातळाला नेऊन ठेवले. एकतर कोणताही युगपुरुष सत्पुरुष कुठल्याही एका जातीची अजिबात मक्तेदारी नसते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जसे दलितांचे भले केले त्याचवेळी अविस्मरणीय राज्य घटना लिहून त्यांनी त्याचवेळी अख्य्या हिंदुस्थानचे भले केले मात्र या राज्यातल्या महामूर्खाना समजावून सांगायचे तरी कोणी कारण या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समस्त युग पुरुषांना मूठभर चतुर आणि भामट्या मंडळींनी त्या त्या जातीची जणू ते मक्तेदारी असे लेबल लावले आणि समस्त राज्याचे पार वाटोळे केले जसे माळ्यांनी महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फक्त आमच्या असे चित्र उभे केले, संत रोहिदास केवळ चर्मकारांचे किंवा संत गोरोबा  फक्त कुंभाराचे, संत तुकाराम कुणब्यांचे असे कितीतरी थोर पुरुष थोर संत त्या त्या जातींनी केवळ आपले असे चित्र निर्माण केले त्यातून ते ते युग पुरुष त्या त्या समाजापुरते मर्यादित झाल्याने एकमेकातील तेढ वाढविण्याचे अतिशय मोठे पाप राज्यातल्या जात्यंधांनी विशेषतः नालायक नेत्यांनी करून ठेवले, आजही हे विष पेरण्याचे काम या हलकट मंडळींकडून सुरूच आहे…

आम्ही अतिशय डिस्टरब झालो तेव्हा जेव्हा शरद पवार यांच्यासारख्या मूठभर नेत्यांनी केवळ सत्तेच्या मोहापायी किंवा काळी संपत्ती जमविण्याचा नादात शिवाजी महाराजांना केवळ मराठ्यांचे हे चित्र या स्वार्थी मंडळींनी उभे केले त्याचवेळी म्हणजे जसे शिवाजी महाराजांना मराठेतर मंडळींपासून दूर नेले तसे महाराजांच्या मराठ्यांना देखील मराठेतर आणि ब्राम्हण समाजापासून दूर नेले, शेकडो वर्षे ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या समस्त विद्वान देशभक्तब्राम्हणांनी त्यांच्यातल्या शिक्षकांनी विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रखर हिंदू संघटनांनी मर्द मराठा समाज आणि शिवाजी महाराज यांच्या शेकडो सत्यकथा सांगून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला घरा घरातील प्रत्येक सदस्याला मर्द मराठा समाज आणि शिवाजी व संभाजी सारख्या शेकडो पराक्रमी मराठ्यांना देवघरात आणि हृदयात स्थान निर्माण केले, मराठ्यातल्याच काही उपटसुम्भानी त्यांच्यातल्या तरुणांची डोकी भडकावून आधी त्यांना मराठेतर मंडळींपासून दूर नेले आणि आता मराठेतर देखील मरठ्यांचा पराक्रमी इतिहास सांगायला त्यांच्या घरादारात टाळू लागलेले आहेत हि वस्तुस्थिती आहे. मराठा आणि मुस्लिम हि एकगठ्ठा मते आपल्याकडे ठेवायची असतील तर मोठ्या खुबीने त्यांना आपल्याकडे वळविण्याचे पाप शरद पवार आणि त्यांच्या काही लबाड अनुयायांनी करून ठेवल्याने समस्त मराठी समाजामध्ये पवारांनी वर जाण्यापूर्वी हे चुकीचे काम करून ठेवले. या तीन वर्षात एकही एकदाही विशेष त्रासदायक मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेवर होते तेव्हा दरक्षणी त्यांच्या काळजाचे ठोके याच मोर्चांनी चुकविण्याचे काम केले हे काय इतरांच्या लक्षात येत नाही, लक्षात येते आणि आले आहे म्हणून महाआघाडी लोकांच्या मनातून उतरली आहे हे नक्की आहे. मराठेतर प्रत्येकाच्या मनात काय असते सांगू, आम्हा प्रत्येकाला हि मोठी खात्री असते कि जेव्हा केव्हा या राज्यातले पाक विचारांचे जात्यंध मुस्लिम समस्त सर्वत्र भावनाप्रधान हिंदूंवर अचानक चाल करून येतील त्यावेळी साऱ्यांना वाचविण्याचे काम सर्वप्रथम या राज्यातले कानाकोपऱ्यातले मर्द मराठेच करतील आणि हेच महत्व आमच्यातले वर्षानुवर्षे जेव्हा शाळेतून महाविद्यालयांमधून प्रत्येकाला पटवून देत होतो त्याचवेळी आवडत्या मराठा तरुण वर्गाला समाजाला आमच्यापासून खूप दूर नेण्याचे काम हे असले संधीसाधू मूठभर अधिकारी व नेते करीत होते जे राज्याच्या उज्वल भवितव्यासाठी अजिबात चांगले घडलेले नाही आणि नेमके हेच पण वेगवेगळी उदाहरणे देऊन राज ठाकरे यांनी उत्तर सभा गाजवून सोडली….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top