राज हेअर कटिंग सलून…
-हेमंत जोशी
आमच्या या राज्यात काही चांगले हेअर कटिंग सलून आहेत जेथे उत्तम भाद्रवून मिळते. जसे हेमंत जोशी केश कर्तनालय, विक्रांत हेअर कटिंग सलून, भाऊ तोरसेकर तर घरोघरी जाऊन हजामत करून देणार्या गावठी न्हाव्यासारखे गाव न्हाव्यासारखे कायम दिसतात आणि वागतात. निखिल वागळे आणि अनिल थत्ते असे दोन एकेकाळी उत्तम हजाम होते पण वाया गेले आता त्याच्याकडे सहसा कोणी केस कापायला जात नाही कारण त्या दोघांच्याही कारागिरीवर मराठी माणसाचा अजिबात विश्वास उरलेला नाही तिकडे ठाण्यात एक बऱ्यापैकी उलटी सुलटी भाद्रवून ठेवणारा कैलास म्हापदी नावाचा न्हावी आहे तोही चांगली भाद्रवून ठेवतो देतो पण आमच्यात एकदम जोमात आणि जोरात ज्याचे हेअर कटिंग सलून चालते तो एकमेव राज, एकदम दिवंगत काकांच्या पावलावर पाऊल. आम्हा सार्या हजामत करणार्यात आज सर्वाधिक दुकान त्या राजचे चालते, ग्राहक प्रचंड गर्दी करून राज एखाद्याची किंवा अनेकांची हजामत करतांना तीही बिना पाण्याने, दूरदूरवरून बघायला येतात. राजच्या चुलत भावाचे हेअर कटिंग सलून अचानक कायम दिवाळखोरीत निघाले आहे आणि गिरीश कुबेर नावाच्या न्हाव्याला कुठल्याशा रोगाने पछाडल्यामुळे तो आजकाल रस्त्याने सैरावैरा म्हणे पळत सुटतो त्या केतकर आडनावाच्या म्हातार्या हजामती करणाऱ्या सारखा. राज ठाकरे यांनी अलीकडे ठाण्यात आपल्या उत्तर सभा नावाच्या केश कर्तनालयात एकेकाची जी बिना पाण्याने आणि धारदार वस्तऱ्याने भाद्रवून ठेवली, अशी हजामत काही वर्षात निदान या हेमंत न्हाव्याने बघितलेली नाही, आम्ही इतर हजामत करणारे त्यातून बरेच काही शिकून गेलो…
राज्यातले राजकारण, माझी तुझी रेशीमगाठ या रटाळ मालिकेसारखं पुढे सरकतच नव्हतं. एका मोठ्या उद्योगपतीच्या घरात दोन सुमार दर्जाच्या खलनायिका एक भावजयी आणि दुसरी होणारीजाऊ ज्या खालच्या पातळीवर येऊन धुमाकूळ घालतात आणि सारे सहन करतात असे वाटते आपणच जावे आणि त्या दोघींच्या थोबाडात मारून त्यांचा बालिश अभिनय कचऱ्यात टाकून मोकळे व्हावे, होते काय असे टुकार कथानक पुढे सरकत नसल्याने एक चांगली मालिका अशाने झपाट्याने मागे पडेल त्यात आमचे मित्र मोहन जोशी आजारी पडले असल्याने त्यांच्या अस्सल अभिनयाला प्रेक्षक मुकले आहेत कारण प्रदीप वेलणकर कोणत्याही अँगलने मोठा उद्योगपती वाटत नाहीत ते एखाद्या स्टॅम्प व्हेण्डर सारखे दिसतात आणि अभिनय करतात. निदान मी तरी आता पुढे सरकतो नाहीतर माझा पण माझी तुझी रेशीमगाठ होईल आणि माझ्या समस्त वाचकांना उगाचच जांघेत गाठ झाल्याचे फील येईल. नेता असो कि मीडियातला, मिळमिळीत भूमिका न घेता प्रत्येकाने मराठी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर अभिमान काय असतो हे विरोधकांना दाखवून द्यायलाच हवे जे नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाण्यातल्या उत्तर सभेतही दाखवून दिले. माझ्या विक्रांतने त्याचे काम चोख केले, राज यांची उत्तर सभा काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत कशी कित्येक चौकाचौकात दाखविल्या जाते आहे ते पुरावे सभेआधी राज यांच्याकडे पाठवून दिले ज्याचा सर्वात आधी उल्लेख करून राज यांनी त्यांचे पुढले भाषण गाजवून सोडले. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमते पण मतदार निवडणुकीत मात्र राज यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा कायम अटल बिहारी वाजपेयी करतात हे टोमणे कायम अगदी उघड जसे वाजपेयी यांच्या बाबतीत मारले जायचे पण एक दिवस याच वाजपेयी यांच्या पारड्यात जसे भारतीयांनी भरभरून मते टाकली होती, वाचकांनो माझे पुढले वाक्य संग्रही ठेवा म्हणजे यापुढे राज यांचा देखील यापुढे सुरुवातीचा वाजपेयी होणार नाही, उत्तर सभेनंतर मी विश्वासाने सांगतोकि पुढल्या महत्वाच्या निवडणुकात भाजपा मनसे युती होईल आणि राज यांच्या पारड्यात उभा महाराष्ट्र भरभरून मते टाकून मोकळा होईल, राज यांच्या नेतृत्वाला यापुढे फार मोठा प्रतिसाद मिळेल, राज हेअर कटिंग सलूनने लोकांची मने नक्की जिंकलेली आहेत…
अपूर्ण : खळबळजनक पुढल्या भागात : हेमंत जोशी