राहुल कांबळेचं काय करायचं ?
राहुल कांबळे माझा चळवळीतला तरुण मित्र, व्यवसाय करतो पण आजही घाटकोपरच्या त्या प्रामुख्याने दलित रहिवासी असलेल्या वस्तीत आजही राहतो कारण तो आज उत्तम व्यावसायिक झालेला असला तरी त्याला पूर्वीचे ते रमाबाई वस्तीतले संघर्षाचे दिवस आठवतात त्यातून तेथून त्याचा पाय निघत नाही. माझे अलीकडले नवबौद्ध व दलितांवरील केलेले लिखाण त्याने वाचले आणि फोन करून म्हणाला, आपण भेटूया. आम्ही भेटलो आणि कॉफी घेण्यासाठी म्हणून माझ्या नरिमन पॉईंट ऑफिस जवळच्या ब्ल्यू टोकाय मध्ये गेलो, गप्पांना सुरुवात झाली तेवढ्यात माझे दोन अत्यंत आवडते पत्रकार तेथे कोणाला तरी भेटण्यास आले त्यातल्या एकाची पलीकडल्या टेबलवर मिटिंग सुरु झाली आणि दुसरा अत्यंत अभ्यासू विद्वान इंग्रजी पत्रकारिता करणारा पत्रकार आमच्या गप्पात सामील झाला. जेव्हा राहुल कांबळे याने दलित व बौद्ध या महत्वाच्या विषयावर बोलणे सुरु केले तो पुढल्या दोन मिनिटात उठून जाणारा पत्रकार त्याची मिटिंग सोडून जागच्या जागी खिळून ऐकत बसला आणि चळवळीतल्या राहुलचे अगाध ज्ञान बघून ऐकून मित्राच्या तोंडून कित्येकदा कौतुकाचे फुत्कार व उद्गार बाहेर पडले एवढे राहुलचे बोलणे तळमळीने सांगणे प्रभावी होते. ते दोघेही पत्रकार एकमेकांचे एवढे जिवलग आहेत कि त्या दोघांच्याही बायकांना अलीकडे भलताच म्हणे संशय येऊ लागला आहे पण ते खरे नसावे कारण त्यातला एक निष्णात लेडी किलर असल्याने त्याच्यावर एवढी वाईट वेळ नक्की आलेली नसावी कि मित्राचे ओठ आपल्या ओठात घेऊन मस्त चमत्कारिक फुत्कार काढावेत, एवढेच काय कोरोना काळात देखील त्याला एकटेपण जाणवले नाही कारण त्याच्या इमारतीत मधली वसुंधरा पण घरी असायची आणि एकटी असायची. गंमतीचा भाग सोडा, पण राहुलच्या मनातली व्यथा आणि नवबौद्धांची त्याने सांगितलेली सत्यकथा येथे मांडायलाच हवी…
माझा जाहीर सवाल राज्यातल्या भाजपा आणि शिवसेना या दोन्ही हिंदुत्व मानणार्या राजकीय पक्षांना असा आहे कि देशभरात आणि आपल्या या महाराष्ट्रात देखील जे घडते आहे घडत आले आहे त्यात तुम्ही दोघेही किंवा तुमच्यापैकी निदान एकाने तरी ते बदल घडवून आणू नयेत म्हणजे अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात देखील एखादा अपवाद वगळता कायम जी नवबौद्धांना दलितांना कायम मुस्लिम धार्जिण्या राजकीय पक्षाशी युती करावी लागते त्यात बदल आणून शिवसेना किंवा भाजपा किंवा दोघांनीही एखाद्या दलित चळवळीशी युती न करता समस्त दलित किंवा नवबौद्धांना स्वतः सोबत जोडून निवडणुकांना का सामोरे जाऊ नये? हा प्रयोग या राज्यात जो भाजपाने रामदास आठवले यांना सोबत घेऊन यशस्वी केलेला आहे पण शेवटी ती युती असल्याने केव्हाही तुटू शकते त्याऐवजी भाजपाने आपले स्वतःचे दलित कार्यकार्ते आधी जोडावेत नंतर त्यांना पुढे नेऊन त्यांच्यातले काही रामदास आठवले म्हणून पुढे आणावेत तसेही रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर प्रकृती स्वास्थ्यामुळे पुढली फार काही वर्षे राजकारणात राहतील, तशी शक्यता नाही आणि आठवले व आंबेडकर यांच्यानंतर ढसाळ, आठवले, आंबेडकार, ढाले, अरुण कांबळे, महातेकर इत्यादी सारेच मान्यवर नेते त्यातले काही थकले; काही वर गेल्याने पुढे दलित व नवबौद्धांची चळवळ चालविणारे निदान मला तरी या महाराष्ट्रात दूरदूर पर्यंत कोणीही फारसे यशस्वी किंवा प्रभावी दिसत नाहीत. शिवसेनेने तसेही अगदी सुरुवातीपासून नवबौद्धांच्या बाबतीत कायम सोवळे पाळले आहे म्हणजे त्यांनी बौद्धतेतर दलितांना नक्की जवळ केले पण बौद्ध जणू आपले किंवा आपल्यातले नाहीत या भावनेने कायम त्यांच्याकडे बघितले थोडक्यात जसे सेनेला राज्यातल्या बौद्धांविषयी आपलेपणा नाही तीच मनस्थिती राज्यातल्या कोटी दोन कोटी एक गठ्ठा मतदान करणाऱ्या नवबौद्धांची शिवसेनेबाबत आहे त्यांना सेनेविषयी अजिबात आस्था प्रेम आदर नाही हेही विशेष…
नेमकी हीच नामी संधी भाजपाला चालून आलेली आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या समस्त दलितांना इतर राज्यातील दलितांप्रमाणे मुसलमानांविषयी आदर नाही तेढ आहे अजिबात प्रेम नाही कारण राज्यात ज्या वेळोवेळी मुसलमानांनी दंगली घडवून आणल्या त्यात हिंदूंपेक्षा नवबौद्ध वस्त्या अधिक होरपळल्या गेल्याने त्यांच्या मनात कायम सतत मुसलमानांविषयी मनापासून नफरत आहे ज्याचा मोठा फायदा मन मोठे करून भाजपाला घेता येतो त्यांना आपल्या राज्यातल्या समस्त नवबौद्ध तरुणांना आपल्यासोबत घेऊन त्यातले जे राहुल कांबळे यांच्यासारखे असंख्य तडफदार आणि हुशार उत्साही तरुण आहेत त्यांना उद्याचा रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, नामदेव ढसाळ म्हणून पुढे आणता येईल, अत्यंत महत्वाचे म्हणजे हे परिवर्तन घडून यावे असे बौद्ध समाजातील साऱ्याच राजकीय जाणकारांच्या मनात आहे म्हणूनच अलीकडे मी भाजपाला डॉ सुनील गायकवाड यांच्यासारख्या नवबौद्ध नेत्यांना दुखवू नका त्यांना चिपकून राहा वरून त्यांच्यातले अनेक नेते तयार करा असे आव्हान भाजपाला दिलेले आहे. राज्यातले समस्त नवबौद्ध हे अजिबात हिंदू द्वेषी नाहीत ते हिंदू प्रेमी आहेत आणि त्यांना हिंदूंचे प्रेम व हिंदू धार्जिण्या राजकीय पक्षांचा थेट त्यांच्या हृदयापासून पाठिंबा हवा आहे सहकार्य हवे आहे. महत्वाचे सांगतो महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे हिंदू महार आजचे बौद्ध नवबौद्ध हे बाबासाहेब आंबेडकरांना थेट परमेश्वर मानणारे असल्याने त्याच बाबासाहेबांचे पराक्रमी संस्कार निस्सीम देशभक्ती किंवा अन्याय अत्याचार विरुद्ध थेट रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची चांगली सवय या समस्त मंडळींमध्ये उतरलेली असल्याने भाजपाने त्यांच्या या अनेक सद्गुणांनाचा सकारात्मक उपयोग करवून घ्यावा राज्यातल्या संपूर्ण नवबौद्धांना बौद्धांना छातीशी कवटाळून त्यांना सतत आणखी पुढे न्यावे…
अपूर्ण : हेमंत जोशी