पुन्हा एकदा : उद्धवा अजब तुझे सरकार…
-हेमंत जोशी
उद्धवच्या जन्माच्या वेळीच म्हणे कवीला पुढले दिसायला लागले होते म्हणून त्यांनी त्याचवेळी गीताची प्रत्येक ओळ साजेशी लिहून ठेवली, उद्धवा अजब तुझे सरकार !! पुढल्या साऱ्याच ओळी देखील उद्धव सरकारला तंतोतंत लागू पडणाऱ्या, हे तर चक्क रामायण लिहिण्यासारखे घडले म्हणजे रामायण देखील रामाचा जन्म होण्यापूर्वीच लिहिल्या गेले होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्यावर आजीबात राग नाही रुसवा फुगवाही नाही, उद्धव यांनी मुख्यमंत्री पद हाती घेतले वरून करोना महामारी, जणू पायगुण आडवा आला आणि या 30 महिन्यात महाराष्ट्र खूप मागे गेला, राज्याचे सर्वार्थाने वाटोळे झाले वरून पाकिस्थानी विचार सरणीचे जे काही मुसलमान या राज्यात आहेत त्यांचा दबदबा वाढला दादागिरी वाढली, हुसेन दळवी यांच्यासारख्या मुसलमानांचे स्तोम माजले वाढले असते तर हरकत नव्हती पण बहुसंख्य बेधुंद पाक विचार सरणीच्या मुसलमानांचे महत्व वाढल्याने राज्यातले हिंदुत्व संकटात सापडले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांचे वर्णन करायचे झाल्यास नवरा तीन वर्षे झाले दुबईत आणि इकडे बायकोला तेवढ्यात दोन मुले झाली तसा हा प्रकार, आजारी अशक्त आणि कृश मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही त्यातून त्यांना मंत्रालयात बसून राज्य हाकणे अजिबात शक्य न झाल्याने, महाआघाडी भोवताली असलेले दलाल, अधिकारी, मंत्री, नेते आणि इतर संबंधित हात धुवून घेताहेत, या राज्यातले असे एकही क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार नाही, महाराष्ट्राचा भ्रष्टाचार आणि जातीयवाद दोन्ही बाबत मिनी पाकिस्थान झाला आहे कारण बाप नसलेल्या आणि नासलेल्या आईच्या लेकरांसारखी आजची आपली अवस्था आहे…
www.vikrantjoshi.com
आमचे आमदार आशिष शेलार, अलीकडे त्यांनी मोठ्या मनाने आमच्या या सांताक्रूझ विधान सभा मतदार संघात ठिकठिकाणी महसूल मंत्री बाळासारब थोरात यांचे आभार मानणारे अनेक होर्डिंग्स लावले आहेत कारण शेलार यांच्या मतदारांचे गृहनिर्माण संस्थांबाबत थोरात यांनी कुठलेसे चांगले काम करून दिले आहे त्यावर थोरात यांचेही आणि शेलार यांचे देखील करावे तेवढे कौतुक कमी म्हणजे काम घेऊन आलेला आमदार कुठल्या पक्षाचा हे थोरात यांनी न बघता योग्य निर्णय घेतला आणि मतदारांचा त्यातून फायदा ज्यांनी केला त्या थोरात यांचे तेही भाजपच्या लिडिंग नेत्याने असे जाहीर आभार मानले. हे असे कायम घडले तर सत्तेवर कोण, हे अजिबात महत्वाचे ठरणार नाही, पण असे सहसा घडत नाही कारण द्वेषाच्या व पैशांच्या राजकारणाला सुगीचे दिवस आलेले आहेत. जे पूर्वी एकदा मी लिहिले होते तेच पुन्हा एकवार सांगतो कि आमच्या या पश्चिम उपनगरातून विनोद तावडे भाजपातून लिडिंग नेते होते आणि आशिष शेलार कार्यकर्त्याच्या भूमिकेत असायचे त्याचवेळी मी विनोद तावडे यांना निक्षून सांगितले होते कि तुमच्या संगतीने या वकील पोराचे उगाच महत्व वाढवू नका, एक दिवस आशिष तुमच्या खूप पुढे निघुन जातील, माझे हे सांगणे त्यावेळी तावडे हसण्यावारी न्यायचे पण आज तेच सांगणे खरे ठरले, आशिष शेलार पुढे खूप मोठे झाले तावडे घरी गेले शेलार मंत्री झाले, भाजपाचे मुंबईतले शरद पवार ठरले ते आणखी पुढे जातील पण याच आशिष शेलार यांना देखील मी जे सांगितले तेच त्यांच्याही बाबतीत घडले म्हणजे पूर्वी आशिष हे तावडे यांचे बोट धरून सर्वत्र फिरायचे तेच शेलार बाबतीत देखील घडले जेव्हा आशिष मोठे झाले आणि मोहित कंबोज आशिष यांचे जेव्हा बोट धरून सर्वत्र सतत संचार करायला लागले, तेव्हाही मी आशिष यांना देखील तेच सांगितले कि एक दिवस मोहित तुमच्या पुढे निघून जाईल…
www.vikrantjoshi.com
माझे हेही सांगणे तंतोतंत खरे ठरले कदाचित अति चतुर असूनही आशिष शेलार गाफील राहिले असावेत किंवा मोहित यांच्या दिलदार स्वभावाला भाळले असावेत पण पुढे नेमके तेच घडले, आज जगात जेव्हा केव्हा मुंबई भाजपाचा विषय निघतो, सर्वप्रथम मोहित कंबोज यांच्याच नावाची चर्चा होते नंतर आशिष यांच्या नावाची व नेतृत्वाची आणि चुकून माकून कधीतरी विनोद तावडे यांच्या नावाची पण ज्या नावाची सर्वाधिक चर्चा व्हयला हवी त्या आमदार व मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे नाव देखील कुठे निघत नाही आणि आज नेमकी आयती सुरेख संधी विशेषतः मुंबई भाजपाला चालून आलेली असतांना मंगलप्रभात लोढा या हिशेबी बिल्डरला आणि मूग गिळून बसणाऱ्या नेत्याला भाजपाने का म्हणून मुंबई अध्यक्ष केले न उलगडलेले हे कोडे आहे वास्तविक या दिवसात महत्वाच्या लढाईत आमदार आशिष शेलार किंवा मोहित कंबोज या दोनपैकी एक कोणीतरी अध्यक्ष म्हणून नेमणे आवश्यक असतांना मला वाटते लोढा यांच्यावर ऐन महत्वाच्या लढाईत सेनापतीची जबाबदारी टाकून भाजपाने स्वतःचे हसे करून घेतलेले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, बोलका आणि पुढे येऊन मारामार्या करणारा कप्तान आज मुंबई भाजपाची मोठी गरज आहे पण हे बदल घडले नाहीत तर मुंबई भाजपाला त्यातून मोठी किंमत मोजावी लागले असे दिसते. अत्यंत महत्वाचे म्हणजे सेनेच्या पावलावर पाऊल ठेवून संघटना बांधणे किंवा पक्ष मजबूत करणे, का कोण जाणे पण समस्त मुंबईकरांचा सर्वमान्य नेता हीच मोहित कंबोज यांची पुढली तयारी असल्याचे मला समजले, हिंदूंचा दमदार ताकदवान दिलदार नेता म्हणून कंबोज यांनी तशी तयारी सुरु केल्याचे दिसते…
अपूर्ण : हेमंत जोशी