आयकर खात्याच्या धाडीत मीडियाही अडचणीत…
पुढले तीन महिने सत्तेतले विरुद्ध विरोधातले असे धमासान तुम्हाला बघायला मिळेल कारण राजकीय टोळीयुद्ध आता शिगेला पोहोचले आहे आणखी पोहोचणार आहे.महाआघाडी विरुद्ध भाजपा असा हा जीवघेणा खेळ अधिक रंगणार आहे अनेकांसाठी जीवघेणा किंवा त्यांचे व कुटुंबाचे आयुष्य फार मोठ्या अडचणीत टाकणारा ठरणार आहे. हे सारे एकमेकांची जेव्हा आणखी आणखी उणी दुणी काढतील सर्वसामान्य जनतेला बघतांना ते नक्की सुखावह ठरेल. युक्रेन रशिया सारखे या राज्यात राजकीय युद्ध केवळ स्वार्थापोटी सुडापोटी पेटलेले आहे अशा वेळी आपण सामान्यांनी फक्त बघ्याची भूमिका स्वीकारायची असते आहे. अलीकडे शिवसेनेचे अत्यंत खादाड नेते महापालिकेतले एक भ्रष्ट पुरुष यशवंत जाधव यांच्यावर आयकर खात्याने मोठी धाड घातल्याचे सर्वश्रुत आहे, आयकर खात्याचा जाधव विषयी तपास पूर्ण झाला कि माझी पक्की माहिती अशी कि ते जाधव कुटुंब व आप्त यांच्या पुराव्यांची नस्ती शंभर टक्के ईडी कडे सुपूर्द करणार आहेत. जाधव प्रकरणी अत्यंत खतरनाक पुरावा असा कि त्यांच्याकडे पडलेल्या धाडीत मुंबईतल्या दोन चोर वादग्रस्त ब्लॅकमेलर नीच नवश्रीमंत पत्रकारांशी केलेल्या मोठ्या आर्थिक व्यवहाराचे अनेक विविध पुरावे आयकर खात्याला मिळाले आहेत. दोघांचीही नावे आणि त्यांच्याच टोळीतले त्यांच्याच सारखे त्यांचे मित्र व प्रतिस्पर्धी या साऱ्यांची नावे टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने शंभर टक्के पुढे येणार आहेत, माझ्या या वाक्याची नोंद आजच करून ठेवा, महत्वाचे म्हणजे जाधव यांच्याकडल्या मोठ्या आर्थिक नोंदीत जी नावे पुढे आली आहेत त्यांचे व त्यांच्यासारख्या नालायक मीडियातल्या मंडळींची पुरावे मी नक्की तुमच्यासमोर सादर करणार आहे. मराठी मीडियात काम करणाऱ्यांचा महिन्याकाठी पगार एक लाखाच्या पुढे कधीही नसतो अगदी अनेकांचा पगार जेमतेम दहा ते वीस हजार असतो, क्वचित काही संपादकांचा पगार एखाद्या लाखात असतो किंवा इंग्रजी मीडियात काम करणाऱ्यांचा पगार देखील फारतर एक ते दिड लाखापलीकडे नसतो पण मुंबईतल्या ठाणे जिल्ह्यातल्या अशा अनेक भिकारड्या चोर हलकट देशद्रोही मीडियातल्या माझ्या यादीतल्या मंडळींची मालमत्ता व आर्थिक उलाढाल जर तुमच्यासमोर उघड केली तर पुढल्या क्षणी तुमचे डोळे पांढरे होतील, केवळ वार्ताहर म्हणून काम करणारे जाधव यांच्या डायरीतले हे दोन मराठी या अशा मीडियातल्या वादग्रस्त कमाईचे कळस आहेत ज्यांची मला कायम किळस येते. सहजगत्या जी वरकमाई मीडियातल्या मंडळींची होते त्यावर आक्षेप असण्याचे अजिबात कारण यासाठी नाही कि त्यांच्यावर अमुक एखादे संकट जेव्हा कोसळते तेव्हा त्यांचे कोणीही नसते ज्याचे हृदयद्रावक प्रसंग विशेषतः कोरोना काळात मी अगदी जवळून बघितले, काही हरामखोर वृत्तपत्रांच्या मालकांनी तर आर्थिकदृष्ट्या ते स्वतः अतिशय सक्षम असतांना देखील त्यांच्याकडे ढोर मेहनत करणाऱ्यांना एका क्षणात नोकरीतून घरी बसविले, ते व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना देशोधडीला लावले त्यामुळे थोडीफार वरकमाई करणाऱ्यांना उलट माझा पाठिंबा असतो कारण त्यांची झालेली वाताहत मी अगदी जवळून बघत असतो पण डाके घालणारे मीडियातले डाकू केवळ मीडिया आपल्या हाती त्याचा गैरफायदा घेऊन जो हैदोस घालतात, विविध किस्से जर तुम्हाला पुराव्यांसहित कथन केले तर तुम्ही यापुढे बातम्या बघणे किंवा वृत्तपत्रे वाचणे सोडून द्याल. आम्ही म्हणजे वाईट गोष्टींवर तुटून पडणारे सिनेमातले अमिताभ अशा थाटात वावरणारे हे विविध मीडियात काम करणारे वरकरणी त्यांचा मुखवटा जरी देशभक्त देशप्रेमी समाजसेवी असा दिसत असला वास्तवात मात्र ते सिनेमातल्या खतरनाक खलनायकासारखे अत्यंत गलिच्छ घाणेरड्या विचारांचे आचारांचे असतात हे मी पुरावे देऊन छातीठोकपणे सांगू शकतो. चला, यशवंत जाधवयांच्यापासून सुरुवात तर चांगली झाली आहे, बघूया पुढे काय घडते ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी