भिडे दाम्पत्य मनाला मनापासून भिडे!
-हेमंत जोशी
व्यक्तिविशेष या विषयाला जरी मी अधून मधून हात घालत असलो तरी या विषयवार सलग लिखाण करण्याचा माझा गेल्या अनेक वर्षांपासून मानस आहे बघूया केव्हा जमते ते. श्रीमान सतीश भिडे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून ऐन उमेदीच्या काळात स्वच्छानिवृत्ती स्वीकारली, विशेष म्हणजे ते पुन्हा कोठेही इतर अनेकांसारखे नोकरीच्या भानगडीत पडले नाहीत काही सरकारी अधिकारी प्रशाकीय अधिकारी ते रग्गड पैसे मिळवून देखील निवृत्तीनंतर लाचारी स्वीकारून केवळ पैशांच्या हव्यासापोटी पुन्हा एखाद्या नोकरीत रुजू होतात म्हणजे एक सरकारी नोकर शासकीय सेवेत असतांना प्रचंड पैसे मिळवायचा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर देखील त्याचा लोभ सुटला नाही, आज तो तब्बल बहात्तर वर्षांचा असूनही रस्ते विकास महामंडळात केवळ काळे पैसे मिळविण्यासाठी लाचार होऊन पुन्हा नोकरी करतो आहे किंबहुना तो अधिकारी म्हणजे अनिल गायकवाड किंवा राधेश्याम मोपलवार यांच्या रांगेत बसणारा नाही कि शासनाला त्याच्या सेवेची गरज भासावी, मी तर अनेकांना सांगतो कि मोपलवार गायकवाड नसते तर माझे स्वप्न आमचा विदर्भाचा चौफेर विकास साधणारा अत्यंत गुंतागुंतीचा कटकटीचा समृद्धी महामार्ग कधीही पूर्णत्वाकडे गेला नसता, हा लेख लिहीत असतांना महत्वाची कानावर बातमी पडली कि मोपलवार यांना पुन्हा सहा महिने शासनाने समृद्धी म्हणजे रस्ते विकास महामंडळात मुदतवाढ दिली आहे, माझ्यासाठी हि मनाला आनंद देणारी बातमी, मोपलवार साहेब समृद्धी महामार्ग आता जून पर्यंत आम्हाला पूर्ण करून हवा हा हट्ट आणि आग्रह, तुमचे अभिनंदन!! मे जून दरम्यान सम्रुद्धीचे काम पूर्ण होऊन त्यावर नक्की वाहतूक सुरु होईल असे मला यासाठी वाटते कारण मी सम्रुद्धीच्या प्रगतीकडे कायम नजर लावून असतो. ज्यांची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला खर्या अर्थाने गरज आहे त्यांनी तेथे निवृत्तीनंतर देखील पुन्हा नोकरी करण्यास कोणाचीही हरकत नसेल पण असे तेथे अगदी मोजके आहेत, लाचार भ्रष्ट लोभी निवृत्त सरकारी कर्मचारी व अधिकारी मात्र तेथे मोठ्या प्रमाणात घुसले असून ते सरकारी पैशांचा अपव्यय करतात असे माझे स्पष्ट मत आहे त्यावर एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून अशा नीच निवृत्त भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या ढुंगणावर तातडीने लाथ मारून अशांना तेथून हाकलून लावणे मला वाटते अत्यंत गरजेचे आहे….
श्री सतीश भिडे स्वयंभू आहेत अत्यंत देखणे व रुबाबदार आहेत केवळ बोलण्यातून ते एखाद्याला क्षणात आपलेसे करून घेतात, जगातल्या कुठल्याही व्यक्तीचा विश्वास संपादन करण्याची त्यांची हातोटी असल्याने नोकरीचा राजीनामा दिल्यांनतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला त्यात मोठे यश संपादन केले ते एवढे देखणे आहेत कि समजा मी मुलगी असतो तर अश्विनीताई यांचा पत्ता काहीही करून कट केला असता आणि आयुष्यभर मिसेस भिडे म्हणून स्वतःला आनंदाने मिरवून आणले असते, एकदा माझी आणि या कर्तबगार जोडप्याची एका आमच्या कॉमन मित्राकडे अचानक भेट झाल्यानंतर मी त्यांना ऑफ द रेकॉर्ड विचारले कि खरे सांगा तुम्हाला प्रशासकीय नोकरीतून कायम बाजूला झाल्याचा खूप पश्चाताप होतो का ? त्यांनी अगदी शपथेवर नाही सांगितले, अजिबात पश्चाताप होत नाही ते म्हणाले. असेही नाही कि नोकरीतून बाहेर पडल्यानंतर ते इतर काही अधिकाऱ्यांसारखे कर्तबगार प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे यांच्या कामात ढवळाढवळ करून काही आर्थिक गणिते जमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा होता.नाय, नो, नेव्हर, कारण त्या दोघांनीही नोकरीत असतांना किंवा नसताना आयुष्याला एक छान शिस्त नी वळण लावूनघेतले असल्याने या जोडप्याकडे एक आदर्श म्हणूनच कायम बघितल्या जाते. युती सरकार सत्तेत असतांना मेट्रो शेड वरून आदित्य ठाकरे आणि मिसेस भिडे या दोघातला संघर्ष त्या दिवसात कायम चवीने चघळण्याचा विषय होता पण आदित्य यांचे मोठेपण असे कि ते व त्यांचे पिताश्री सत्तेत आल्यानंतर त्यांनी या कर्तबगार प्रशासकीय महिला अधिकाऱ्याला अत्यंत सन्मानाने मुंबई महापालिकेत महत्वाच्या पदावर नियुक्त केले. यात आदित्य आणि अश्विनीताई दोघांचेही करावे तेवढे कौतुक कमी. मी तुम्हाला कायम सांगतो कि आयुष्यात सारे काही अविचाराने करा पण लग्न विचारपूर्वक करा म्हणजे प्रत्येक जोडपे असे असावे कि त्यांना सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत असे वाटावे कि आमचे लग्न कालच झाले. अर्थात अश्विनीताई आणि सतीशजी या दोघांमधले म्हणाल तर ट्युनिंग म्हणाल तर एकमेकातील खेळीमेळीचे नाते, हे असेच ज्यावर करावे तेवढे कौतुक कमी. त्यामुळेच दोघेही अति व्यस्त असूनही त्यांची मुले उत्तम घडली पुढे जाताहेत. असे अधिकारी बघितले कि नकळत मराठी माणसाची मान नक्की उंचावते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी