गली गली में शोर है …
-हेमंत जोशी
या दिवसात राज्यातले राजकारण बंबातल्या पाण्यासारखे प्रचंड तापले आहे आणि अत्यंत अस्थिर असे वातावरण आहे त्यामुळे पुढल्या काही महिन्यानंतर राहिलेला विषय पुन्हा लिहीन म्हणजे कोण कोण बाहेरून भाजपामध्ये आले कोण कोण राहणार आहे आणि कोण का बाहेर पडणार आहे त्यावर मी नक्की लिहिणार आहे. दिवसातून अनेकदा ज्या दोन कमेंट्स मला माझ्या विषयी कायम कानावर पडतात त्यातली पहिली कमेंट अशी कि तुम्ही भाजपावाले आहात, मी कधीही माझ्या आईची खोटी खोटी शपथ घेत नाही, आईची शपथ घेऊन सांगतो कि मी अजिबातच भाजपावाला नाही मात्र मी कट्टर हिंदुत्ववादी आहे अलीकडे शिवसेनेने बऱ्यापैकी हिंदुत्व आणि मराठी बाणा हा मुद्दा दूर केला असल्याने तुम्हाला तसे कदाचित वाटत नाही अन्यथा माझ्यावर हे देखील आरोप झाले असते कि मी शवसैनिक सॉरी शिवसैनिक आहे म्हणून. दुसरी कमेंट माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या जगातल्या मराठी वाचकांकडून केली जाते ती अशी कि मी वाजवीपेक्षा अधिक स्पष्ट व सत्य लिहितो ज्याची एवढी गरज नाही किंवा नसते अर्थात हा माझा दोष कि गुण मला नेमके कळत नाही पण माझा आणि केवळ माझ्याचसारख्या स्पष्ट व पारदर्शी चिरंजीवाच्या प्रसंगी जीवाला जरी धोका निर्माण झाला तरी आम्हाला असत्य बेगडी खोटी सुपारीबाज हलकट पत्रकारिता आयुष्यच्या शेवटच्या श्वासापर्यंत अजिबात करायची नाही त्यामुळे काही विषय किंवा काही व्यक्तींविषयी तंतोतंत माहिती आणि पुरावे आमच्याकडे आल्यानंतर कदाचित आम्ही त्यावर लिखाण विविध कारणांमुळे टाळतो त्यातले भीती हे एक अजिबात कारण नाही नसते पण ज्या मुद्द्यांना हात घालतो ते सत्य आणि स्पष्ट असेल होईल याची मात्र कायम काळजी घेतो, घेत आलेलो आहे…
जसे अलीकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय व सरकारी क्षेत्रात आर्थिक उलाढाल्या करणाऱ्या प्रशांत निलावार या अत्यंत चाणाक्ष बुद्धिमान मेहनती आणि भाषाप्रभू व्यवसायिकावर आयकर खात्याने फार फार मोठी धाड घातली होती त्यात ज्यांचे मोठे आर्थिक संबंध आयकर खात्याकडे उघड झाले त्यातील प्रत्येक राजकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे आणि नेमके आर्थिक व्यवहार मला सपुरावा माहित आहेत पण मी ते उघड कारणार नाही कारण माझी अनेकदा रणांगणावरल्या अर्जुनासारखी अवस्था होते काही पुरावे किंवा असे कितीतरी पुरावे मला माहित असतांना देखील मी ते मांडणे टाळतो अन्यथा या दिवसात जर मी नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित ज्या काही मंडळींनी दुबई फेस्टिवल ची वारी ज्या पत्रकारांची सहकुटुंब घडवून आणली ते मी जर लिहिले तर मला वाटते ते पत्रकार देखील नक्की गजाआड होतील पण काही प्रकारणांवर जीव गेला तरी निदान माझ्यासारख्या काहीशा हळव्या पत्रकारांनी लिखाण करणे टाळायचे असते. त्यातला एक हिंदू पत्रकार तर नवाब मलिक यांच्या पाया पडून पुढल्या कामाला सुरवात करतो ते देखील मला माहित आहे. मी मोहित कंबोज नेमके कसे बऱ्यापैकी जवळून ओळखतो त्यामुळे जेव्हा संजय राऊत यांनी शिवसेना भवनात त्यांच्यावर आरोप केले तेव्हा मी एका फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गप्पा मारत बसलो होतो, राऊत यांचे आरोपांवर बोलणे सम्पल्यानंतर, राऊत कंबोज यांच्यावर आरोप करून चुकले हेच मी म्हणालो आणि कंबोज पुढल्या केवळ तास दोन तासात पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करतील त्या अधिकाऱ्याला मी सांगितले नेमके तेच घडले. ज्या दिवशी लता मंगेशकर यांची शिवाजी पार्कात शासकीय समारंभपूर्वक अंत यात्रा होती त्यादिवशी जेवढे कॅमेरे लता मंगेशकर यांच्या शवावर किंवा नरेंद्र मोदी शरद पवार देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रित नव्हते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अख्ख्या वाहिन्यांचे कॅमेरे मिलिंद नार्वेकर यांच्यावर फिरत होते ते बघून मला दोन मोठ्या नेत्यांनी फोन करून सांगितले कि आज नक्की मिलिंद नार्वेकर यांचा मनोहर जोशी झाला आहे किंवा होणार आहे म्हणजे याच शिवाजी पार्कात जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे उन्मेष यांनी पंतांचा बाळासाहेबांच्या उपस्स्थितीत जाहीर सत्कार घडवून आणला होता आणि मनोहर जोशी यांचे भाषण संपताच माझ्या शेजारी बसलेले भाऊ तोरसेकर मला म्हणाले होते कि आजच्या भाषणात पंतांनी आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे नेमके तेच घडले पुढल्या काही दिवसात बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले, ते तसेच आता मिलिंद नार्वेकर यांचे होईल असे जेव्हा मला ते दोघे नेते म्हणाले त्यावर मिलिंद यांचा अजिबात पंत होणार नाही हे मी त्यांना शर्यत लावून सांगितले, पुढे आजतागायत मिलिंद यांच्याबाबत तेच घडते आहे, अनेकांनी मिलिंद नार्वेकर यांना संपविण्याचा प्रयत्न केला पण जे असा प्रयत्न करतात त्यांचाच नारायण राणे होतो…
या दिवसात नावडते अधिकारी दलाल नेते मंत्री नवाब मलिक यांच्यासारखे अडचणीत यावेत म्हणून आमच्याकडे विविध पुरावे सांगितले दिले जातात ते नेमके खरे कि खोटे हे निदान आम्ही तरी त्यावर नेमकी खात्री करून घेत असतो. जसे मला अलीकडे राष्ट्र्वादीतल्याच एकाने असे सांगितले कि धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला घेतलेला नाही ते मलबार हिलच्या सह्याद्री या शासकीय विश्राम भवनातच मुक्कामाला असतात कारण त्यासमोर असलेल्या राज-महल या इमारतीमध्ये एक महिला मुक्कामाला असते ज्यांच्याकडे त्यांचे येणे जाणे असते दुसरा आणखी एक आरोप असा होता कि धनंजय मुंडे हे बीडला कायम हेलिकाफ्टरने जातात, मी त्यानंतर मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू व जवळच्या व्यक्तीकडे त्यावर विचारणा केली आणि माझी मान खाली गेली कारण राज महाल या इमारतीत जी सदनिका मुंडे यांनी भाड्याने घेतलेली आहे तेथे त्यांच्या दोन मुलींसहित पत्नी राहते आणि त्यांची एक मुलगी सध्या अमेरिकेत शिकायला असते. हेलिकॅफ्टरचा वापर त्यावर देखील तो हे साफ खोटे आहे म्हणाला आणि लवकरच तुम्हाला त्यावर देखील पुरावे देतो, आत्मविश्वासाने सांगून मोकळा झाला. थोडक्यात येणाऱ्या किंवा कानावर पडणाऱ्या साऱ्याच बातम्या किंवा माहिती खरी असते असे अजिबात नसते विशेषतः मोठी माणसे अतिशय कष्टातून यशाचे शिखर गाठत असतात त्यामुळे केवळ खोट्या किंवा ऐकीव माहितीवर लाखो वाचक असणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारांनी अशा बड्या मंडळींना विनाकारण बदनाम करणे अजिबात योग्य नसते, देवाला हात जोडून प्रार्थना निदान माझ्या हातून अशी चूक न घडो !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी