लता दीदी आणि माझ्या आठवणी…
-पत्रकार हेमंत जोशी
केलेले उपकार न जाणणाऱ्या कोणत्याही कृतघ्न व्यक्तीला शिक्षा झालीअसे क्वचित बघायला मिळते उलट कृतघ्न माणसे अधिक आरामदायी आनंदी जीवन जगतांना या कलियुगात पाहायला मिळतात म्हणून उपकार करणार्याने अपेक्षाविरहित जगावे म्हणजे मनाला यातना होत नाहीत, बहुतांश नेत्यांमध्ये तर कृतघ्नता सतत ठायी ठायी भरलेली असतानाही बघा त्यांच्या अनेक पिढ्या कशा आनंदाने जीवन कंठतांना दिसतात. आमच्यातले अनेक कित्येक पत्रकार त्यांच्या लिखाणाव्यतिरिक्त सोशली देखील खूप व्यस्त असतांना मी बघतो किंबहुना एका जमान्यात तर मी त्यांच्या फार पुढे होतो पण काही झटके असे बसले कि त्यातून बाहेर पडलो विशेषतः 1992 नंतर विशेषतः पत्रकारितेकडे आयुष्याकडे खूपच प्रोफेशनली बघायला लागलो म्हणजे बाहेर पडल्यानंतर नेमके व्यवसायाचे पत्रकारितेचे तेवढे बघायचे आणि न चुकता सहा वाजेपर्यंत घरी परतायचे हा नेम मी अलीकडे अनेक वर्षात मोडलेला नाही, घरी परतायला कधीतरी क्वचित उशीर होतो. पत्रकारिता करता करता जर सोशली मी अधिक व्यस्त राहिलो असतो तर आणखी खूप खूप पैसे मिळविले असते विशेष म्हणजे सत्तेत एखादे पद मिळवून तेथेही भानगडी करत्या आल्या असत्या पण सांगतो ना कि 90 च्या दशकात काही फार मोठ्या नेत्यांकडून जे त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हते पदरात पडले आणि मी सोशल लाईफ पासून अलिप्त राहण्याचे ठरविले. पत्रकारितेकडे देखील प्रोफेशनली बघायचे ठरविले ज्यात मला यश मिळालेही. समाजाकडे मित्रांकडे नातलगांकडे अगदीच स्वार्थी नजरेने बघतो असेही अजिबात नाही, आपणहून तुम्हाला काय हवे आहे असे विचारायला जात नाही पण ज्यांना सहकार्य हवे असते या कानाचे त्याकानाला कळू न देता मी मदत सहकार्य करून मोकळा होतो. माझ्या प्रत्येक संकटात सुखदुःख्खात हेमंत जोशी नक्की धावून येईल असे म्हणणाऱ्यांची मोठी संख्या आहे पण उठसुठ अशा जोडलेल्या मंडळींना भेटायचे ते मात्र मला जमत नाही, आपली कामें आटोपली कि घर गाठायचे हे जे आवश्यक होते ते मी केले…
पण लुडबुड न करण्याच्या स्वभावातून मला तेवढे मोठे सोशल आयुष्य नसल्याने इतर अनेक मंडळींसारखे माझे मान्यवरांसोबत फारसे फोटो देखील काढलेले नाहीत. जसा अनेकांशी जिव्हाळा आहे तसा अपेक्षाविरहित जिव्हाळा दिवंगत गीतकार जगदीश खेबुडकर यांच्यासंगे देखील होता. माझ्या माहीमच्या ऑफिस मध्ये एकदा ते आले असता मी त्यांच्यासमोर मनातली इच्छा सांगितली कि मला लतादीदी प्रत्यक्ष गाणे गातांना बघायच्या आहेत आणि खेबुडकर यांनी इच्छा पूर्ण केली, त्यांचा एक दिवस सकाळीच घरी फोन आला, म्हणाले, मला तुम्ही वरळीला माझ्या राहण्याच्या ठिकाणाहून पीक अप करा, आपण अमुक रेकॉर्डिंग स्टुडिओला जाऊ कारण तेथे माझे एक गाणे लतादीदी प्रत्यक्ष रेकॉर्ड करणार आहेत, गाणार आहेत आणि मी खुश झालो, खेबडुकरांना घेऊन आम्ही ठरलेल्या स्टुडिओ मध्ये गेलो, लतादीदी थोड्या उशिरा आल्या पण ठरलेल्या वेळेत आपले गाणे म्हणून रेकॉर्डिंग करून निघूनही गेल्या. जाताना जगदीशखेबडुकरांनी माझी त्यांच्याशी ओळखही करून दिली अर्थात अशा ओळखी दाट मैत्रीत क्वचित बदलणाऱ्या असतात. मी ज्या वातावरणात मुंबईत राहतो तेथे प्रत्येक कित्येक ग्लॅमर असलेल्यांना बघायला मिळते मात्र अशावेळी नजर टाकून पुढे जायचे असते ओळखी वाढविणे तसे कठीण असते किंवा गरजही नसते म्हणजे आलिया भट, मी आणि माझी मुले काही वर्षे जुहूच्या सन अँड सँड हॉटेलात एकत्र स्विमिंग करत असू किंबहुना अनेक मोठ्या हिंदी कलाकारांसोबत तेथे स्विमिंग करता आले, करतो, अलीकडे कोरोनामुळे ते बंद झाले आणि आता तर माझ्या घरीच टेम्परेचर मेंटेन स्विमिंग पूल असल्याने हॉटेलात जाऊन स्विमिंग करावे लागणार नाही आणि आता अशा स्टेजमध्ये आलो कि ग्लॅमरचे आकर्षण राहिलेले नाही, ज्या अनेक मोठ्या व्यक्तींना आपण भेटावे असे वाटते त्यातले बहुतेक मला माझ्या एका वेगळ्या व्यवसायातून आणि लिखाणातून ओळखतात, आयुष्य समाधान पावते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी