आदित्य ठाकरे आणि गजानन देसाई…
-पत्रकार हेमंत जोशी
बहुतेकांच्या जीवनात हे घडते किंवा घडलेले आहे किंवा घडणार आहे. तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडणे आजकाल गाडीचे टायर पंचर होण्यासारखे कॉमन झाले आहे किंवा ताबा न राहिल्याने भारतीयांना रस्त्यावर मुतणे जसे कॉमन तसे आम्हा भारतीयांचे झालेले आहे, जो उठतो तो प्रेमात पडतो त्यातले काही यशश्वी ठरतात पण बहुतेक प्रेमप्रकरणे आणा भकांनी सुरु होतात आणि सेक्स मधला इंटरेस्ट संपला कि भारतीय दुसरा किंवा दुसरी शोधायला लागतात. पण बहुतेक साऱ्याच पहिल्या प्रेमप्रकरणात जरी ते यशस्वी ठरले नाही आणि कालांतराने त्यातल्या दोघांचीही लग्ने जरी तिसरीकडेच लागली तरी कालांतराने हे पूर्वीचे प्रियकर प्रेयसी एकमेकांना पुन्हा आपापल्या पती आणि पत्नीच्या चोरून भेटायला लागतात कारण पहिले प्रेम काही केल्या विसरणे शक्य नसते. अनेकदा तर असे घडते कि नवरा आपल्या प्रेयसीला भेटायला लागतो आणि बायको पूर्वीच्या पहिल्या प्रियकराला. गजानन देसाई सध्या राष्ट्रीय काँग्रेस मध्ये आहेत पण तत्पूर्वी ते राष्ट्रवादी मध्ये होते शरद पवारांनी त्यांना बऱ्यापैकी वरच्या स्थानावर नेऊन ठेवले आणि आर्थिक दृष्ट्या श्रीमंत देखील करून ठेवले होते अशा या उत्साही हसतमुख बोलख्या फ्रेंडली चतुर मित्रांचा मोठा गोतावळा असलेल्या गजानन देसाई यांचा 5 फेब्रुवारी हा जन्म उर्फ वाढदिवस त्यानिमीत्ते त्यांचा अजित पवारांसंगे म्हणजे अजितदादा त्यांना फुलांचा गुच्छ देतानाचा फोटो बघितला आणि न विसरणारी प्रेमप्रकरणे आठवलीत कारण गजानन देसाई यांचे देखील हे असेच आहे म्हणजे त्यांची आधीची प्रेयसी राष्ट्रवादी ते आजही एकदाही विसरायला तयार नाहीत जरी आज देसाई तनाने आणि मनाने राष्ट्रीय काँग्रेस मध्ये असलेत तरी. त्यांचे सोशल मीडियावर काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा सतत कायम राष्ट्रवादीच्या नेत्यांसंगे मी कायम फोटो बघतो म्हणून सांगतो देसाई यांचे न विसरता येणारे पहिल्या प्रेमासारखे झालेले आहे म्हणजे वरकरणी वाटते एखादीला जसे तिला झालेले मूल तिच्या सद्द्य नवऱ्यापासून झालेले आहे पण ते खरे नसते ते मूल आधीच्या प्रियकरापासून झालेले असतेत तसे देसाई यांचे होते म्हणजे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसला जरी या दिवसात बाहुपाशात घेतलेले असले तरी देसाई यांचा दररोज पहिला मुका राष्ट्रवादीच्या खोडकर सेक्सी मिश्किल बाप्पा देसाई यांनाच असतो. आज ना उद्या देसाई यांना त्यांच्या आधीच्या प्रियकराने म्हणजे राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वाने नक्की त्यांच्या मनातल्या त्यांच्या स्वप्नातल्या मोठ्या स्थानावर एक दिवस नक्की नेऊन ठेवले असते देसाई यांनी विनाकारण राष्ट्रवादी सोडली आणि स्वतःचे विनाकारण राजकीय वाटोळे करून घेतले आणि त्यांच्या आयुष्यातली घालमेल सुरु झाली, लग्न जरी भलतीकडे केले तरी गजानन देसाई यांचा आजही सतत राष्ट्रवादीसाठी म्हणजे पूर्वीच्या प्रियकरासाठी जीव कासावीस होतो, देसाई यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!
पुढला विषय आदित्य ठाकरे यांचा, मी म्हणजे उद्धव किंवा रश्मी ठाकरे नाही, आदित्यला हे कर ते करू नको असे सांगायला तरीही एक सूचना करण्याचा मोह मला टाळता आलेला नाही म्हणून आदित्य यांना येथे याठिकाणी मी जाहीर सांगणार आहे कि तुम्ही तुमच्या आयुष्यात हा निर्णय घ्यायलाच हवा. कामानिमित मला अख्या मुंबईत नेहमीच फिरावे लागते विशेषतः आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रातून तर जवळपास दररोज जावे लागते. राज्यातल्या विधान सभा निवडणुका पार पडून जवळपास अडीच वर्षे उलटलेली आहेत आणि इतर विधान सभा क्षेत्राच्या तुलनेत जर आदित्य यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ तुम्ही पालथा घातला तर इतरांच्या तुलनेतअमुक एखाद्या विधान सभा मतदार संघांचा सर्वांगीण विकास जर तुम्हाला बघायचा असेल तर आदित्यचे बोट पकडून त्यांच्या मतदार संघात फेरफटका मारा, झपाट्याने आपल्या मतदार संघाचा विकास कसा करायचा असतो यास्तव वरळी सारखे दुसरे उदाहरण मला खात्री आहे उभ्या राज्यात आज सापडणार नाही म्हणून आदित्य यांना अगदी हात जोडून सूचना कि त्यांनी दरवेळी आपला मतदार संघ बदलत राहावा म्हणजे प्रत्येक मतदार संघाचा वरळी होईल झपाट्याने विकास होईल. जसे मला वाटते कि टी चंद्रशेखर सारखे सनदी अधिकारी किंवा नितीन गडकरी यांच्यासारखे बांधकाम मंत्री किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री या राज्याला कायमस्वरुपी लाभावेत असावेत त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे किंवा अजित पवार यांच्यासारखे नेते आलटून पालटून या राज्यात विविध ठिकाणी आमदारकीला उभे राहावेत. बघा, सत्तेचे स्रोत अनेकांकडे चालून येतात पण आपल्या मतदारसंघांचे भले साधण्याची मानसिकता बहुतेकांची नसते पण त्यातले उत्कृष्ट उदाहरण अगदी लहान आणि तरुण वयात अननुभवी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यासमोर यांनी उभे केले. ज्याचे जे चांगले ते आम्ही पत्रकारांनी सांगायला लिहायलाच हवे आणि तुम्हाला तर ते आठवतच असेल कि जेथे जेथे आदित्य घाणेरडे वागले मी त्यांच्यावर देखील अगदी थेट शब्दांचे आसूड सोडून मोकळा झालो, आज मात्र कौतुक अगदी मनापासून करावेसे वाटले…
तूर्त एव्हढेच : हेमंत जोशी