बदल बदला कि बादल…
-पत्रकार हेमंत जोशी
आमच्या विदर्भात विशेषतः पावसाळ्यात बादल दाटून येतात मेघगर्जना होतात दिवसा काळोख होतो वादळ फोफावते असे वाटते कि थोड्याच वेळात प्रचंड पाऊस पडेल आणि बळीराजा शेतकरी राजा सुखावेल पण कसलं काय आणि कसचं काय, मेघगर्जनेसह पाऊस तर पडत नाही पण साधी रिमझिम देखील होत नाही, म्हातारचळ लागलेल्या अनेक पुरुषांचे हे असे विदर्भातल्या पावसासारखे होत असते, अनेक म्हातारे पुरुष इकडे तिकडे डुबकी मारायला जातात खरे पण रात्रभर वाट पाहूनही काही घडत नाही सकाळी सकाळी कुठेतरी कसेतरी या वर्हाडी पावसासारखे चार थेम्ब पडतातही त्यातून समोरच्या व्यक्तीकडे नाक मुरडून आदळआपट करण्या पलीकडे काहीही हाती लागलेले नसते. म्हाताऱ्याच्या गप्पा तेवढ्या सुखावणाऱ्या असतात अंथरुणावरच्या लढाईत मात्र त्याचा क्षणार्धात पराभव झालेला असतो आणि बहुतेकवेळा तो पुढल्या पाच मिनिटात पाठ करून घोरायलाही लागलेला असतो.
यावेळी श्रीमान नारायण राणे यांनी जे जाहीर विधान अगदी अलीकडे केले आहे कि मार्च मध्ये हे महाआघाडी सरकार गडगडेल आणि भाजपा माआघाडीतल्या एकाला किंवा त्यांचे आमदार फोडून सत्तेवर येईल नेहमीप्रमाणे भाजपा नेत्यांचे निदान हे विधान तरी म्हाताऱ्या पुरुषाच्या सेक्स सारखे हवेत विरणारे किंवा विदर्भातल्या नुसताच गडगडाट पण पाऊस आलाच नाही हे असे ठरता कामा नाही अन्यथा राज्यातल्या प्रमुख भाजपा नेत्यांकडे सारेच कोल्हा आला रे आला कथेतल्या गुराख्याच्या उनाड मुलासारखे बघून मोकळे होतील. जनतेचं तर या दिवसात भाजपा बाबतीत घरातल्या सतत पाळी टाळणार्या तरण्या बाईसारखे झाले आहे म्हणजे पाळी थोडीफार मागेपुढे होतच असते पण 20 तारखेची पाळी 25 तारखेपार्यंत आली नाही कि लगेच घरातल्यांना वाटते यावेळी दिवस गेले वाटते आणि हा केवळ चुकीचा अंदाज असतो ठरतो कारण पुढल्या दोन दिवसात तिची चिडचिड सुरु होते आत, हि उदाहरणे या राज्यातल्या भाजपाला गेली दोन वर्षे तंतोतंत लागू पडताहेत केवळ चिल्लाना ज्यादा पध्दतीने त्यातून राज्यातल्या प्रमुख भाजपा नेत्यांकडे बघितल्या जाते आहे म्हणून त्या परमेश्वराला हात जोडून विनंती कि निदान यावेळी तरी भाजपा फॉलोअर्सची निराशा करू नका जे राणे म्हणालेत ते घडू द्या…
मात्र राण्यांच्या विधानाला महाघाडीतल्या या दिवसातील अस्वस्थतेला आणि एकंदर राजकीय हालचालींना बघता, यावेळी नक्की काहीतरी नेमके घडते आहे असे वाटू लागलेले आहे. शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र थोडाथोडका नव्हे तर किमान दहा वर्षे मागे गेलेला आहे थोडक्यात प्रगती ठप्प सत्ता ज्यांच्या हाती ते फक्त पैसे खाण्यात गुंतलेले वरून कोरोनाचा कहर, सामान्य जनता अक्षरश: भिकेला लागलेली आहे वरून अतिप्रचंड महागाई बोकाळली आहे तरीही पवारांचे डोळे उघडले नाहीत त्याचे मोठे आश्चर्य वाटते म्हणजे पवारांनी केवळ डोळे वटारले तरी या राज्यातल्या सत्तेतल्या आणि विरोधातल्या एकही नेत्याची अधिकाऱ्याची दलालांची पैसे खाण्याची हिम्मत होणार नाही पण शरदरावांनी हे असे कधी केलेच नाही म्हणजे त्यांनी एकही आर आर पाटील घडवला नाही जो तो त्यांच्या नेतृत्वाखाली अनिल देशमुख छगन भुजबळ संजीव पलांडे म्हणूनच घडल्या गेला. अशी हि सत्तेतली बदमाश माणसे सत्ता आणि जात या भरवशावर वाईट पद्धतीने मोठी होतांना आणि ते उघड्या डोळ्यांनी बघतांना पवार दुर्दैवाने मनातल्या मनात खुश होत होते. सामान्य माणसातला सत्तेत कोण त्याशी फारसे घेणे नसते केवळ ज्यांच्या हाती सत्ता त्यातले किमान ७५% तरी उत्तम संस्कारित असावेत असे त्याला वाटत असते पण १९८० दरम्यान अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या राज्याचे भ्रष्टाचारात जे रूपांतर झाले ते रूप एकही मुख्यमंत्र्याला बदलता आलेले नाही अल्प अपवाद अर्थात फडणवीस आणि पृथ्वीराज यांचा. ज्या प्रमुख मंडळींच्या हाती १९८० नंतर सत्ता आली आणि त्यांनी दरोडे टाकले त्या साऱ्याच मंडळींचे अख्खे कुटुंब मला पाठ असते आणि आहे, विशेष म्हणजे त्यातल्या बहुतेक साऱ्यांचा त्यांच्या कुटुंबाचा प्रमोद महाजन झाला आहे त्यांच्या पुढल्या पिढीने वाटोळे करून ठेवले आहे, देवाची काठी आवाज न करता कशी जोरात बसते हे मी या प्रत्येक लुटारुंच्या घरात बघत आलो आहे. माझे हे सांगणे तुम्हाला खोटे वाटत असल्यास ज्यांनी म्हणून अधिकारात असतांना सत्तेचा दुरुपयोग करून जनतेच्या तोंडचा घास पळवला त्यातले काही तुमच्याही आसपास राहायला असतील त्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही डोकावून बघा तुमच्या ते लक्षात येईल कि त्या साऱ्यांना काळ्या पैशातून क्षणिक सुख मिळाले पण कायमस्वरूपी मोठे दुःखच वाट्याला आले. अगदी नितीन राऊत यांच्या सारख्या नेत्यांच्या नेमक्या म्हणजे ओरिजनल बायकांना विचारा कि त्यांचे कुटुंब काळा पैसा घरात आल्याने खूप खूप सुखी झालेले आहे का ?
उद्धवजी कोणत्या वाईट मुहूर्तावर आणि नेमके कोणत्या पुण्यवान व्यक्तीचे शाप घेउन गादीवर बसले मुख्यमंत्री झाले कळत नाही कळलेले नाही पण ते सत्तेत आल्या दिवसापासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याने राज्याला कोरोना महामारीने असे काही घेरले आहे कि त्यांनाच म्हणे अलीकडे सतत वाटत राहते कि आपण उगाच मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि स्वतःची कुटुंबाची बदनामी व सेनेची हानी ओढवून घेतलेली आहे. विजोड जोडप्यासारखी हि महाआघाडी आहे एकतर सत्तेत सेना भाजपा युती हवी होती किंवा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी पण पवारांनी चुकीचे भलतेच घडवून आणले आहे त्यांनी विचित्र महाआघाडी जन्माला घातली आणि निवृत्त होतांना राज्यातल्या सामान्य मराठी माणसाचे मोठे नुकसान करून ठेवले कारण मुसलमानांचे वर्चस्व वाढवले आणि हिंदू मनातून घाबरले आहेत. काहीही झाले तरी एकमेकांचा हात एकमेकांच्या हातातून काढून घ्यायचा नाही त्यांनी दिलेला हा मंत्र महाआघाडीतल्या मंडळींनी फॉलो केला आणि राज्य लयाला गेले आता तर वीस ते तीस टक्के प्रत्यक्ष विकास कामांवर खर्च होतो इतर सारे पैसे संबंधित हडप करून मोकळे होतात. आज दोन तीन आठवडे उलटून गेलेत पण उद्धव यांना नेमके काय झालेले आहे ते मुख्यमंत्री असूनही ऑफिशियल बाहेर येत नाही. वास्तविक त्यांच्या मणक्याची सर्जरी झाली असल्याने वरून ते हृदय रोगी असल्याने आणि त्यांच्या किडनीमध्ये सात ते आठ खडे असल्याने ते एवढ्यात सहजासहजी बाहेर येऊन कामाला लागतील असे शंभर टक्के निदान पुढे काही महिने घडणारे नाही आधी आणि आताही राज्यकारभार जवळपास शरद पवार अप्रत्यक्ष हाकतात आणि अजितदादा आपल्या दादागिरीच्या भरवशावर सारे काही मनासारखे करवून घेतात पण त्यातून ताळमेळ केवळ पैसे खाण्यात आहे प्रगतीच्या बाबतीत खोटी आकडेवारी सामान्यांसमोर येत आहे येत असते. एक मात्र नक्की बदलाचे वारे राणे म्हणालेत तसे जर वाहायला लागले असतील तर यापुढे किमान काही वर्षे रामराज्य करणारे सत्तेत यावेत मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असलेत तरी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी