गंदा है पर धंदा है : पत्रकार हेमंत जोशी
सलून ओस पडले कारण पार्लर्स चे महत्व वाढले आहे. सलून पेक्षा काय तर जरा उत्तम दर्जा पण त्यासाठी पार्लर्स कितीतरी ज्यादा पैसे वसूल करतात. समजा अमुक एखाद्याला केसांचा कलर करायचा आहे त्यासाठी तो घरून शॅम्पू करून गेला तरी त्यांना चालत नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी ग्राहक केस कलर करतो त्यादिवशी म्हणजे केस कलर केल्यानंतर ते लगेच नव्हे तर दुसरे दिवशी शॅम्पू लावायचा असतो कलर केल्यानंतर केस केवळ पाण्याने धुवायचे असतात पण पार्लर्स लुटायलाच बसले असल्याने ते लगेच शॅम्पू करून मोकळे होतात ज्यामुळे वास्तविक केसांचा कलर ज्यादा टिकत नाही ग्राहकाला पुन्हा लगेच काही दिवसात पार्लरमध्ये जावे लागते आणि हे सिक्रेट मला एका पार्लर चालविणाऱ्यानेच सांगितले आहे. बोलायचे झाल्यास न्हावी समाज केस कर्तनालयापासून दूर जातो आहे आणि न्हावी नसलेलेच हजामत करायला लागले आहेत. उद्या ते कसाई पण होतील काहीच सांगता येत नाही….
पूर्वी कुठे हो होते हे पार्लर चे फॅड तरीही आमचे शिक्षक एखाद्या हिरोसारखे दिसायचे कि, म्हणजे आमचे कोल्हटकर सर खलनायक मनमोहन सारखे दिसायचे सुरेश कुलकर्णी सरांना आम्ही जॉय मुखर्जी तर गोविंद देशपांडे सरांना विश्वजीत तर दूरदूरपर्यंत हि मंडळी सेम टू सेम नसायची तरी माझ्या वडिलांना विद्यार्थी दिलीपकुमार म्हणायचे. हे असे केवळ त्या त्या शिक्षकांच्या हेअर स्टाईल वरून म्हटल्या जायचे. माझ्या वर्गातली जी मुलगी मला साक्षात आशा पारेख आणि आणखी एक मुलगी थेट झीनत अमान वाटायची, आज त्या मुलींना तुम्ही चुकून बघितले तर मला नक्की एखाद्या झाडाला बांधून पोकळ बांबूचे फटके द्याल. तुम्हाला तर मी हे सांगितलेच आहे कि माझ्या ओळखीचे एक शासकीय अधिकारी बायकोला जवळ घेतल्यानंतर म्हणायचे कि मला तुझ्यात शेजारच्या इमारती मधली मिसेस साळुंखे दिसते मग त्यांची बायको पण एक दिवस त्यांना म्हणाली कि मला पण तुमच्यात हेमंत जोशी दिसतो. एक सूचना तर तुम्हाला विशेषतः चावट पुरुषांना मी कायम करत आलोय कि तुम्ही फेस बुक वर टाकलेल्या फोटोंवर फिदा होऊन एखादीच्या मागे लागू नका फजिती हमखास होते…
जी फेस बुक वर साक्षात दीक्षितांच्या माधुरीसरखी वाटते दिसते प्रत्यक्षात तिच्यापेक्षा एखादी युगांडाची मुलगी बरी म्हणायची वेळ तुमच्यावर नक्की येते. माझा एक मित्र जुहू चौपाटीवर फिरतांना एक दिवस अचानक पळायला लागला काय तर त्याला पुढे पळणारी तरुणी खूप खूप देखणी चिकणी आणि एकदम षोडशा असावी असे वाटले. याला धाप लागली तरी हा पळत होता शेवटी त्याने तिला गाठलेच, मित्रहो येथे नाव सांगत नाही पण ती पाठमोरी सेक्सी खूबसूरत वाटणारी किशोरी चक्क जख्खड म्हातारी आणि एके काळची मराठी सिनेमातली गाजलेली नटी निघाली जी म्हाताऱ्या पण आडदांड नवऱ्याला कायम घेऊन वॉकला येत असते. आमच्या सांताक्रूझ परिसरात रात्रीच्या अंधारात त्या पवन हंस जवळ हिडीस मेकअप आणि उत्तान कपडे घालून काही बायका उभ्या राहतात, पिणारे पुरुष त्यांना रात्री एकदा का झिंगले कि पिकअप करतात, उतरल्यानंतर आणि खिशातले पैसे काढून घेतल्यानंतर या आंबट शौकिनांच्या ते लक्षात येते कि स्त्रीवेषातले तेही पुरुषच असतात, मग काय, सारे लुटल्यानंतर ग्राहक आल्या पावली आरडा ओरड करत अक्षरश: पळत सुटतात. कशाला म्हणून अशा सवयी लावून घ्यायच्या आम्ही पुरुषांनी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी