हा पवारांचा पराभव कि पवारांमुळे पराभव…
-पत्रकार हेमंत जोशी
यादिवसात मीडिया असेल किंवा मतदार किंवा नेते ते आपल्याकडे निदान पुढल्या विधान सभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवणे हे भाजपासमोर खरे आव्हान आहे, मीडियातले संधीसाधू नेहमीप्रमाणे भाजपा पेक्षा देवेंद्र फडणवीसांपासून केव्हाच दूर झाले दूर पळाले, प्रेयसीला स्तनांचा कर्करोग झाला कि स्वार्थी प्रियकर सर्वात आधी तिच्यापासून अगदी ढुंगणाला पाय लावून दूर होतो दूर जातो दूर पळतो तसे फडणवीस आणि राज्यातल्या भाजपाबाबत मीडियाचे झाले आहे म्हणजे भाजपा सत्तेत नाही लक्षात येताच या मीडियाचा देखील ” सुरेखा ” झाला म्हणजे मालकाचा खिसा रिकामा होताच अशा बायका जशा क्षणार्धात मालक बदलतात तसे आमच्यातल्या बहुतांश मीडियाचे होतच असते. 19 नोव्हेंबर रोजीचे पत्रकार यदु जोशी यांचे लोकमत दैनिकातील त्यांनी अत्यंत महागड्या झालेल्या दुबईत बसून केलेले लिखाण याच मालक बदलणाऱ्या पद्धतीचे होते. पूर्वी माझ्या बाकावर बसणारा देवेंद्र ते आज पवार कसे महान असे बदलत जाणारे यदु जोशी यांचे लिखाण म्हणजे त्याच संधीसाधु मीडिया पद्धतीचे. मला वाटते परदेश प्रवास किंवा दुबई प्रचंड प्रचंड यादिवसात महागडे तरीही जेमतेम पगार घेणारे यदु जोशी सहकुटुंब दुबईत जाऊन दुबईत बसून पवारांची भलामण आणि फडणवीसांच्या भाजपाला आडवे तिडवे घेतात तेव्हा या टूरचा स्पॉन्सरर बदलला असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही किंवा यदु जे सांगताहेत कि त्यांचा सुपुत्र तेही शेअर मार्केट मध्ये मोठी कमाई करायला लागल्याने तो जर दुबईचा त्यांचा श्रावण बाळ ठरला असेल तर अशा पुतण्याच्या भरवशावर प्रसंगी मी कर्ज घेऊन लाखो रुपये शेअर मार्केट मध्ये गुंतवायला एका पायावर तयार आहे अर्थात ज्यांना अशा थापा पचतात मीडियातल्या बाळबोध मंडळींसमोर मारलेली हि लोणकढी थाप आहे हे आमच्या सारख्या अनुभवींना लगेच लक्षात येते….
चला या निमित्ताने फडणवीसांच्या राज्यातल्या अनेक भाजपा नेत्यांच्या हे नक्की आता लक्षात आले असेल कि मीडिया मैत्रीला तत्वांना फारशी जागणारी नसते तर सोयीनुसार स्वार्थी मीडिया ची भूमिका सतत बदलत असते, हेच पवारांनी ठाकरे किंवा महाआघाडीतल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी देखील लक्षात घेण्यासारखे आणि लक्षात ठेवण्यासारखे. शरद पवारांचे कौतुक करावे कि त्यांना सत्तेचा मोह सोडवत नाही म्हणावे नेमके माझ्या लक्षात येत नाही पण यादिवसात त्यांच्या तोंडाचा गळू एवढा वाढलाय कि प्रेमापोटी कोणालाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघवत नाही किंवा त्या गळूमुळे त्यांचे जवळपास बंद होत आलेले तोंड कोणत्याही क्षणी पूर्णतः बंद होण्याची. शक्यता अगदी उघड दिसत असताना हेच शरद पवार कुठेही न थांबता विविध राजकीय आव्हाने स्वीकारत जेव्हा राज्याचे दौरे काढताहेत कौतुक नव्हे राग येतो कि पवारसाहेब तुम्हाला तुमच्या पक्षात किंवा तुमच्या गादीवर जर आणखी निदान एक जरी शरद पवार तयार करता आला असता तर आज हि कठीण वेळ नक्की तुमच्यावर आली नसती. अधिक आक्रमक होत पवार अजितदादा आणि अनिल देशमुख यांचा संदर्भ घेत विशेषतः ज्या पद्धतीने थेट नरेंद्र आणि देवेंद्र या दोघांवर ज्या पद्धतीने उखडले त्यांना देखील असे सतत वाटत राहते का कि या पद्धतीचे भाषण ठोकल्यास आपलाही ममता बॅनर्जी होईल कि मागल्या वेळी जशी पावसातल्या भाषणाने त्यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली अशा भाषणांनी इतिहासाची पुनरावृत्ती होईल ? दोन पैकी एक नक्की कि महाआघाडीतल्या नेत्यांवरील मंत्र्यांवरील संकट अधिक गडद झाल्याचे पवारांच्या ते लक्षात आले असावे किंवा बंगालचा विजय शेतकऱ्यांचे दिल्लीतले अलीकडले यशस्वी आंदोलन पद्धतीने वागल्यास सत्ता सहज टिकवता येते कदाचित हे पवारांच्या लक्षात आले असावे. पवारांच्या या हिम्मतीला दाद देत असतांना मला वाटते भाजपा नेत्यांना किमान महाराष्ट्राविषयी चिंतन करून धाडसी व योग्य निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. या राज्यात भाजपा आणि महाआघाडी असे घनघोर युद्ध पेटलेले असल्याने मूळ सामान्य माणूस हा विषय नेहमीप्रमाणे बाजूला पडला आहे आणि नेहमीप्रमाणे वाहत्या गटारगंगेत हात धुवून घेणारे मोजके मजा मारताहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी