हे अभियंते भ्रष्ट तरीही श्रेष्ठ !
-पत्रकार हेमंत जोशी
चूक तुमची आमची आहे चुका करणाऱ्यांची नाही कारण त्यांच्या गंभीर चुका आधी आम्ही पदरात घेतो नंतर पोटच्या मुलाने चोरी केल्यानंतर पदराखाली घेणाऱ्या त्या कथेतल्या आई सारखे या राज्यात अतिशय गंभीर चुका करणाऱ्यांचे आम्ही अगदी उघड कौतुक करून मोकळे होतो. जे जोडपे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहे ज्यांचा आर्यन ड्रग्स घेतो आणि विकतोही तो जेव्हा आमच्या पोटच्या मुलांना byjus च्या माध्यमातून करिअर कसे घडवायचे त्यावर त्याचे ज्ञान पाजळतो आणि आम्ही त्या जाहिरातींकडे कौतुकाने बघतो. पॉर्न फिल्म्स बनविणाऱ्याच्या बायकोकडे आम्ही ती योगा आणि संस्कृतीचे डोस पाजताना सहन करतो किंवा हरणांची शिकार करणारा आम्हाला बीइंग ह्युमनच्या माध्यमातून उपदेश करतो आणि अशा नालायकाच्या ब्रँडमध्ये आम्ही कौतुकाने खरेदीला जातो किंवा तीन तीन हिंदू मुलींशी निकाह करणाऱ्या बांड्याकडे आम्ही सत्यमेव जयतेच्या माध्यमातून ओढल्या जातो, या देशाला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात घालणाऱ्या हरामखोराची किंग फिशर बिअर आम्ही चवीने चघळतो, अर्थात अशा कितीतरी गंभीर चुका सतत आपल्या हातून यासाठी घडतात कारण वाईटांची गुलामगिरी करण्यात त्यांची हुजरेगिरी करण्यात आम्हाला विकृत आनंद मिळतो. देशाला विकायला काढणारे दुर्दैवाने आपले हिरो आहेत….
या राज्यातले दोन अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प त्यातला पहिला मुंबई मेट्रो जेथून महाआघाडी सरकारने प्रशासकीय अधिकारी आणि मेट्रो वूमन अश्विनी भिडे यांना हलवायला नको होते, अर्थात कौतुक त्या आदित्य ठाकरे यांचे वाटते कि कार शेड वरून ज्या अश्विनी भिडे यांनी थेट आदित्य यांच्याशी पंगा घेतला होता त्याच आदित्य व उद्धव यांनी सत्तेवर आल्यानंतर फार मोठ्या मनाने तेही ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर याच अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेत अत्यंत महत्वाच्या पदावर आणून बसविले त्यावर दोघेही पिता पुत्र कौतुकास पात्र. दुसरा अत्यंत महत्वाचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग या राज्याचे सोने करणारा हा अतिशय कठीण किचकट असा प्रकल्प व महामार्ग, येथेही तेच म्हणजे राधेश्याम मोपलवार आणि अनिल गायकवाड हे दोन सरकारी अधिकारी जर उद्धव सरकारने येथे कंटिन्यू केले नसते तर हा प्रकल्प शंभर टक्के रखडला असता अपूर्ण राहिला असता पण कोरोना काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता गायकवाड आणि मोपलवार द्वयीनीं दिवसरात्र या प्रकल्पावर मेहनत घेतली, अनेकदा अनेक कटकटीच्या मुद्यांवर त्यांनी लीलया मात केली आणि जवळपास हा समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे आणला आहे. दुर्दैवाने अनिल गायकवाड अगदी अलीकडे या महामार्गातून निवृत्त झाले आहेत आणि मोपलवार यांची देखील पुढल्या महिन्यात मुदत संपत आलेली असली तरीही गायकवाड आणि मोपलवार या दोघांनाही राज्य सरकारने हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत घरी बसवू नये त्यांनाच कंटिन्यू करावे असे माझे स्पष्ट मत आहे….
जसे सीताराम कुंटे या राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा मनुकुमार श्रीवास्तव किंवा मनोज सौनिक घेतील असे जे तुम्हाला वाटते तसे अजिबात घडणार नाही तर कुंटे यांच्या जागी या राज्यातली पहिली महिला आणि तीही एक दलित महिला कर्तबगार आणि प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी महिला जागा घेईल आणि त्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्याचे नाव आहे श्रीमती सुजाता सौनिक. जर या राज्याचे मुख्य सचिव म्हणून मनुकुमार श्रीवास्तव यांचेनाव पुढे आले तर महाआघाडी सरकारचे विशेषतः उद्धव ठाकरे यांचे फार मोठे राजकीय नुकसान होईल असे जरी दबक्या आवाजात बोलले जात असले तरीही मनुकुमार श्रीवास्तव हे फार वाईट आहेत असे मी कधीही म्हणणार नाही पण सुजाता इज बेटर चॉईस हे नक्की खरे आहे तेच मोपलवार आणि गायकवाड बाबतीत, जर या दोघांना अत्यंत गरजेचे असताना समृद्धी प्रकल्पामध्ये कंटिन्यू केल्या गेले नाही तर माझे वाक्य लिहून ठेवा कि हे दोघेही त्यांच्या निवृत्तीनंतर राजकारणात शंभर टक्के उतरतील आणि मोपलवार आमदार होतील तर अनिल गायकवाड हे आज ना उद्या लातूरचे खासदार होतील, एक दिवस केंद्रात राज्यमंत्री देखील होतील, तुम्हाला तर हे ठाऊक आहे कि माझ्या जिभेवर आणि … तीळ आहे. पण अनिल गायकवाड हे सरकारी सेवेतून निवृत्त होत असतांना आणि बांधकाम खात्यातील अनेक अभियंते या दिवसात ईडी आणि आयकर खात्याच्या रडारवर असताना ज्यांचे नाव या दोन एजन्सीज कडून प्रामुख्याने घेतले जाणार आहे त्या संदीप पाटील आणि शशिकांत सोनटक्के या मुख्य अभियंत्यांनी मूळे व शिरीष देशपांडे या दोन उप अभियंत्यांच्या सहकाऱ्याने गायकवाड निवृत्त होत असतांना थेट साडे तीन पेजेस भली मोठी तब्बल 25 लाख रुपयांची अनिल गायकवाड यांची जाहिरात तेही लोकसत्ता या जाहिरातींच्या बाबतीत महागड्या दैनिकातून केलेली आहे….
श्रीमान संदीप पाटील किंवा शशिकांत सोनटक्के हे दोघेही ईडी आणि आयकर खात्याच्या रडारवर कसे आणि वादग्रस्त नवंश्रीमंत कसे हे तर मी नक्की पुढल्या काही दिवसात तुम्हाला व प्रत्यक्ष भेटून ईडी आणि आयकर खात्याला तेही लेखी सांगणार आहेच पण या कठीण दिवसात सोनटक्के पाटील मुळे आणि देशपांडे सारखे बांधकाम खात्यातील अभियंते अगदी सहज तेही एका सरकारी अधिकाऱ्याच्या जाहिरातींवर उधळतात कसे, ना त्यांना सरकारी यंत्रणेची भीती आहे, ना त्यांना अमाप संपत्ती जमवल्याची काळजी आहे. वास्तविक अनिल गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य महामार्ग प्रकल्पवार पुनर्नियुक्ती होण्याची नस्ती सरकार दरबारी फिरत असतांना या भ्रष्ट अभियंत्यांनी ज्या नेता पद्धतीने त्यांची पुरवणी काढलेली आहे त्याचा विनाकारण मानसिक त्रास थेट गायकवाड यांना नक्की होऊ शकतो. विशेष म्हणजे ज्ञानाचे कायम डोस पाजणाऱ्या संपादक गिरीश कुबेर यांनी हि सरकारी अधिकाऱ्यांची विनाकारण उधळपट्टी कशी हो सहन केली ? प्रकरण गंभीर आहे, मी या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा नक्की करणार आहे. कदाचित गायकवाड यांना मुद्दाम अडचणीत आणण्याचा तर हा गेम नाही ना ?
अपूर्ण : हेमंत जोशी