राजकीय दिवाळे कि राजकीय दिवाळी 1 :पत्रकार हेमंत जोशी

आजही आहे आणि लहानपणीही मी अत्यंत खोडकर होतो, आणि आमचा यदु म्हणजे पत्रकार यदु जोशी आज जसा आहे तेव्हाही अगदी तसाच म्हणजे कायम स्तब्ध पुतळा, तो अलगद चिमटी काढायचा आणि आमची आरडाओरड झाली कि बाप छातीवर बसून आम्हाला ठोकून काढायचा, हा गालातल्या गालात हसायचा, आजही तो तसाच, चिमटी काढून गालातल्या गालात हसतो, इतर बसतात विव्हळत….

काही माणसांचे वागणे समजत नाही, अनेकांना ते नेमके कसे आहेत सुरुवातीला कळत नाहीत फार उशीरा कळतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते जसे कुलकर्णी आडनावाचा एक बिलंदर पत्रकार आहे त्याचा ज्यांच्याकडे डेरा पडलेला असतो असा माणूस आयुष्यात कितीही उच्च स्थानी असला तरी या लबाड पैसेखाऊ कुलकर्णीच्या सहवासात राहून पूर्णतः उध्वस्त होतो, कदाचित मी हे यदूच्या प्रेमापोटी एकांगी लिहिले असावे असे तुम्हाला वाटेल आणि वाटणेही स्वाभाविक आहे कारण यदु आमच्याशी कसा वागतो हे त्याला अगदी जवळून ओळखणाऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही म्हणजे उद्या मी किंवा माझे कुटुंब एखाद्या अडचणीत संकटात सापडले तर टाळ्या वाजविणाऱ्यात तो पहिला असेल पण यदुवर जर एखादे संकट चुकून आलेच तर सर्वात आधी आम्हा हेमंत कुटुंबीयांची तलवार बाहेर निघालेली असेल आणि हो, श्रीमान देवेंद्र यांचीही, आम्ही यदूला त्याच्या गुणावगुणांसहित, दोषांसहित जरी तो दूर किंवा जवळ असला तरी त्याला आम्ही कायम आपले मानले आहे…तर हा कुलकर्णी यदूचा कट्टर विरोधक आहे म्हणून मी या कुल्कर्ण्यावर बरसतोयअसे अजिबात नाही तर कुलकर्णी याचा मुक्काम जेथे त्या माणसाचा सत्यानाश झालाच म्हणून समजा, मी खोटे लिहितोय असे तुम्हाला वाटत असेल तर या राज्याच्या एका लोकप्रिय लोकमान्य जगप्रसिद्ध पत्रकाराला म्हणजे श्रीयुत प्रवीण बर्दापूरकर यांना या कुलकर्णी विषयी विचारा, त्याच्याविषयी ते शिवी हासडून सुरुवात करतील आणि कुलकर्णी नीच नालायक कसा, खूप काही सांगून मोकळे होतील. हा कुलकर्णी मागच्या काही वर्षात म्हणजे दिवंगत आर आर आबा सत्तेत असतांना त्यांच्याकडे पडीक असायचा, आर आर पाटील यांच्याकडे कायम मुक्काम ठोकून असायचा, याने आणि आबांच्या त्यावेळेच्या एका स्टाफने काय काय काळे धंदे केले त्यावर मी कधीतरी नक्की लिहिणार आहेच पण घडले काय आबांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकीय वाट्टोळे झाले आणि आबा अचानक हे जग सोडून गेले नंतर हा कुलकर्णी एकनाथ खडसे यांना बिलगला, त्याचा सतत वावर खडसे यांच्या सभोवताली असायचा, तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही कि मंत्री म्हणून खडसे कितीतरी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती. काय घडले हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही, श्रीमान एकनाथ खडसे नशीब बलवत्तर म्हणून कसेतरी बचावले, अतिशय जीवघेण्या आजारातून मरता मरता वाचले पण आज ते जिवंत असले तरी त्यांचे आजचे राजकीय आयुष्य मेल्याहून मेल्यासारखे आहे. किंवा आज हा ज्या वृत्तपत्रात काम करतो त्या वृत्तपत्र मालकांचा देखील राजकीय दृष्ट्या ‘ खडसेच ‘ झालेला आहे, हा मोठा वाटतो आणि त्याच्या वृत्तपत्राचे मालक त्याच्यासमोर खुजे वाटतात. आर आर आबा गेले नंतर खडसे संपले, आता त्याचा मुक्काम पोस्ट आहे धनंजय मुंडे यांचे कार्यालय, मुंडे यांना छोटीशी एखादी राजकीय पुडि सोडून इतरांना जसा तो खुश ठेवायचा, आता नेमक्या त्याच पद्धतीने नवख्या धनंजय मुंडे यांना तो खुश करून मोकळा होतो नंतर तो आणि त्याचा मुंडे यांच्या कार्यालयात पेरून ठेवलेला एक जिवलग मित्र मुंडे यांच्या राजकीय दराऱ्याचाकसा खुबीने उपयोग करून घेतात, धनंजय यांना सांगितले तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल आणि शरद पवार तसेच अजित पवार त्याच्या बखोटीला धरून त्याला मुंडेंच्या कार्यालयाबाहेर काढतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे एकीकडे पंकजा मुंडे यांचे राजकारणातले किंवा मंत्री म्हणून पोरकट वागणे सुरु असतांना तिकडे धनंजय मुंडे मात्र कमालीचा संयम राखून ते विरोधात असून म्हणजे सत्तेत नसूनही या राज्यातले उद्याचे मोठे नेते म्हणून घडत असतांना त्यांनी आपल्या आसपास, आपल्या जवळपास त्यांना खुबीने युक्तीने संपवू शकतील असा माणसांना तातडीने दूर ठेवणे गरजेचे असतांना त्यांच्या हातून नकळत हि मोठी चूक होते आहे, त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे….

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *