मीडिया : बढिया आणि घटिया
–पत्रकार हेमंत जोशी
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक देशात दोन प्रकारच्या स्त्रिया असतात म्हणजे खानदानी आणि वेश्या वृत्तीच्या पुरुष देखील दोन प्रकारचे असतात चांगले आणि वाईट विद्यार्थी देखील दोन प्रकारात मोडतात हुशार आणि मठ्ठ तेच प्रसार माध्यमांचे म्हणजे मीडियाचे आम्हा पत्रकारांचे आमच्यातही दोन प्रकार आहेत म्हणजे रावणी किंवा कौरव वृत्तीचे किंवा प्रभू रामचंद्रासारखे किंवा पांडव वृत्तीचे म्हणजे अत्यंत चांगले किंवा तद्दन रद्दी आणि भिक्कार म्हणजे चोर वृत्तीचे, तुम्ही कुठल्या बाजूचे तुमच्या या प्रश्नावर मी म्हणेन मी म्हणजे हनुमान म्हणजे आमच्या प्रसार माध्यमांमधला जो चुकला त्याला हाणला किंवा उचलून फेकला पद्धतीचा मी पत्रकार. प्रसार माध्यमात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या मंडळींचा मला खूप अभिमान वाटतो, असामान्य बुद्धीचा आणि वृत्तीचा अगदी सामान्य परिस्थितीतला जरी एखादा माझ्यासमोर अचानक समोर आला तरी मी त्याला वाकून नमस्कार करतो आणि वाईट वृत्तीच्या प्रसार माध्यमातील म्हणजे मीडिया क्षेत्रातील एखादा हरामखोर शब्दातून उचलून फेकताना मला एकही क्षण भीती वाटत नाही कारण माझ्या अंगात खरोखरी हनुमान संचारला असतो जो एकेकाळी आचार्य अत्रे यांच्या देखील अंगात कायम संचारलेला असायचा. आपल्या या राज्यात केवळ २५-३० मीडियातल्या मंडळींच्या अंगात जरी आचार्य अत्रे संचारले किंवा टिळक आगरकर पद्धतीची देशसेवेची पत्रकारिता केली तर विश्वासाने सांगू शकतो कि त्यानंतर एकही नालायक माणसाची हे राज्य विकण्याची ताकद होणार नाही थोडक्यात हनुमंताच्या ताकदीसारखी मीडियाची ताकद असते लक्षात ठेवा…
जशी अमुक एखाद्या चांगल्या प्रसंगी तुम्हाला प्रसार माध्यमांची मीडियाची आम्हा पत्रकारांची वृत्तपत्रांची हमखास आठवण येते तशी जेव्हा एखादा दबदबा असलेला दादागिरी करणारा समाजकंटक नीच हलकट गुंड प्रवृत्तीचा माणूस सामान्यांच्या अधिकाराचे उल्लंघन करून त्यांना सतत त्रास देतो तेव्हा तुम्हाला हमखास आमची आठवण येते आणि आम्ही अशावेळी कोणत्याही परिणामांची चिंता काळजी न करता भीती न बाळगता तुमच्यासाठी धावून येतो. मात्र आज शासन जेव्हा आमच्यातल्या रस्त्यावर उतरून वार्तांकन करणाऱ्या तमाम माध्यमांकडे पाठ फिरविते म्हणजे जेथे साधी रेल्वेची पास किंवा शासकीय अधिस्वीकृती मिळविताना जेव्हा आमच्यातल्या मंडळींची दमछाक होतांना दिसते मनापासून वाईट वाटते. वास्तविक पैसा आणि जातपात तसेच विविध अधिकार हाताशी घेऊन जेव्हा शासकीय क्षेत्रातले अधिकारी किंवा उच्चपदस्थ सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानून स्वतः श्रीमंत आणि सामान्यांना गरीब करून मोकळे होतात तेव्हा सामान्यांच्या बाजूने लढण्याचे काम आमच्यातले काही हरामखोर टाळतात पण बहुसंख्य रामविचारी प्रसार माध्यमे तुम्हा सामान्यांच्या बाजून लढून मोकळे होतात. वाईट प्रवृत्तीच्या बाजूने लढतांना अनेकांना विविध प्रकारे त्रास होतो त्यात या राज्यातल्या विविध विचारांच्या आमच्या संघटना खूपच कमकुवत म्हणजे अमुक एखाद्यावर जीवघेणे जरी संकट ओढवले तरी फार कमी असे नेते जे आमच्यासाठी धावून येणारे कारण आपापल्या संघटनांचा दुरुपयोग आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी विचार करणारे बहुसंख्य नेते त्यामुळे मनगटात कमी पडणारे मीडियात काम करणारे व्यक्तिगत संकटात सैरभैर झाल्याचे हमखास दिसून येते. बलवान संघटना आणि ताकदवान नेते आम्हा मीडियाची आज मोठी गरज आहे त्यासाठी एखाद्याने पुढे येण्याची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. जर प्रत्येक चांगल्या आणि वाईट प्रसंगात उत्तम मीडियाची गरज असेल तर या क्षेत्रात काम करणारे प्रामाणिक व त्यांच्या पाठीशी कायदा सरकार व जनता पाहिजे अन्यथा लढतांना चांगल्या मंडळींना नैराश्य येते असा माझा अनुभव आहे….
क्रमश: हेमंत जोशी