सांग सांग भोलानाथ सरकार गडगडेल काय ? पत्रकार हेमंत जोशी
माझ्या आवडत्या मित्रा, माझ्या लाडक्या पत्रकारा, अनिल थत्ते, संधी मिळाली आहे चुकून तर त्याचे सोने करा म्हणजे थेट संघ परिवाराच्या वेब वाहिनीने तुम्हाला अलीकडे बोलायची संधी दिली आहे मग तुम्ही प्लिज वाट्टेल ते बरळून चालून आलेली आयती संधी लगेच गमावून बसू नका. थापा कमी गप्पा अधिक मारा. कोणीही तुम्हाला फोन करून माहिती देणार नाही तशी रिस्क तुमच्याबाबतीत नक्की कोणीही घेणार नाही, बाहेर पडा माहिती घ्या नंतर वाहिनीवर येऊन बोला, तुमच्या बोलण्याची सामान्यांना कदाचित कांही काळ भुरळ पडेलही पण आम्हाला तर हसू फुटते कि हो. भाऊ तोरसेकर यांना बसल्या जागी पत्रकारिता करता पद्धतीचे टॉन्टिंग न करता स्वतःमधे बदल घडवून आणा, स्वतः फिरा नेमकी माहिती जमा करा नंतर खुषाल रा स्व संघाच्या वाहिनीवर येऊन वाट्टेल तो धुडघूस घाला. थापाडे थत्ते, अगदी अलीकडे तुम्ही या वाहिनीवरून सांगितले कि अमुक मुद्द्यावर तुमचे ईडीच्या अधिकाऱ्याशी बोलणे झाले म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्याचा तुम्हाला जणू फोन आला होता किंवा अमुक एखाद्या अधिकाऱ्याशी तुमची भेट झाली आणि त्याने तुम्हाला माहिती दिली, प्लिज हे असे वाट्टेल ते फेकू नका. कोणताही ईडीचा अधिकारी तुम्हाला शंभर टक्के आधी तर जवळच घेणार नाही किंवा कोणतीही माहिती तुम्हाला देणे दूर, ईडीतले कोणीही अगदी तेथला चपराशी सुद्धा तुमच्याशी बोलणार नाही, मीडियाशी ऑफ द रेकॉर्ड बोलून ते त्यांची नोकरी धोक्यात आणणार नाहीत ईडीवाले बाहेरच्या जगताशी कोणाशीही संबंध ओळख ठेवतांना अतिशय सावध असतात त्यामुळे भामरे सारखे विविध दलाल अनिलबाबुंना भेटून सांगतात कि आम्ही तुम्हाला वाचवतो आमची तेथे ओळख आहे तेव्हा या दिवसात अनिलबाबुंना ईडीरूपी हगवणीचा प्रचंड त्रास होत असतांना देखील त्यांना या दलालांचे ऐकून हसू फुटते, असे दलाल बाहेर पडल्यावर अनिलबाबू म्हणे जमिनीवर ओणवे होऊन हसत गडाबडा लोळतात. तर अनिल थत्ते जर असे कोणत्याही ईडी च्या अधिकाऱ्याच्या संपर्कात जरी तुम्ही आल्याचे सिद्ध केले तरी मी उदय निरगुडकर यांच्या हस्ते तुम्हाला एक लाख रुपयांचा चेक बक्षीस देईन. किरीट सोमय्या सारख्या फार कमी मंडळींना ईडी मध्ये एंट्री आहे कारण ज्यांच्याकडे पुरावे आहेत किंवा असतात अशी खात्री असते त्यांनाच ईडी ऐकून घेऊ शकते. म्हणजे माजी खासदार म्हणून किंवा भाजपा नेता म्हणून सोमय्या यांना तेथे ऐकून घेतले जात नाही तर त्यांची माहिती पुराव्यांसहित खरी असते म्हणून तेथे सोमय्या सारख्या अगदीच थोड्या लोकांचे ऐकून घेतल्या जाते अन्यथा त्यांच्याकडे अजिबात वेळ घालवायला वेळ नाही. अगदी ईडीवाला तुमच्या शेजारी जरी राहायला असला तरी तो शेजारच्यांशी देखील बोलणे संबंध ठेवणे टाळतो अशी माझी पक्की माहिती आहे, ईडी अधिकारी व कर्मचारी अतिशय सावध तसेच वागायला बोलायला खडूस असतात. थत्तेजी प्लिज या अशा थापा पुन्हा मारून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका, मग आम्हाला आवरता आवरता हसू आवरत नाही…
सांग सांग भोलानाथ हे महाआघाडी सरकार पडेल काय, पद्धतीचा प्रश्न दिवसभरात मला भेटणारे फोन वरून बोलणारे अनेक विचारतात त्यांना माझे असे सांगणे कि हे सरकार यावेळीच्या पावसाळी अधिवेशनात नक्की पडले असते त्याजागी सेना भाजपा युतीचे सरकार पुन्हा आले असते पण नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीतले ते खाजगी बोलणे व एकंदर राजकीय हालचाली धूर्त शरद पवारांनी नेमक्या टिपल्या आणि ते कामाला लागले. बघा, अलीकडे ते काही दिवस सतत कधी प्रत्यक्ष तर कधी संजय राऊत यांच्यासारख्या नेहमीच्या जवळच्या खात्रीच्या दूतामार्फत थेट उद्धव ठाकरे यांचे ब्रेन वॉशिंग करण्यात सिरियसली गुंतले होते कारण महाआघाडी सरकार टिकविणे हि काँग्रेसची तशी फार मोठी गरज नाही आणि उद्धव यांना तर भाजपा हा मोठा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनाही हे सरकार टिकलेच पाहिजे अशी फार मोठी काळजी नाही याउलट स्वतःचे त्यांच्या काही नेत्यांचे आणि शिवसेनेचे अस्तित्व आणि महत्व कायम टिकण्यासाठी उद्धव यांना महाआघाडी पेक्षा भाजपशी जवळीक अधिक आवडणारी व परवडणारी आहे. त्यामुळे सरकार टिकले पाहिजे असे यादिवसात अगदी मनापासून मनातून शरद पवार यांना वाटते जर हे सरकार टिकले नाही तर शरद पवार आणि अन्य राष्ट्रवादी नेत्यांच्या अनेक विविध अडचणींमध्ये मोठी भर पडणार आहे त्यामुळेच शरद पवार कसून व कस लावून कामाला लागले आणि उद्धव यांचे ब्रेन वॉशिंग करण्यात यशस्वी ठरले त्यामुळे आज तरी महाआघाडी सरकारचा कोसळण्याचा आपटण्याचा फार मोठा धोका नक्की टळला आहे. पवार खुश आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने तेही थेट राज्यपालांना पत्रातून कळविले आहे कि येणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात कोरोना असल्याने अगदी घाईगडबडीत आम्हाला विधान सभा अध्यक्षांची निवडणूक घेणे शक्य नाही ती कृपया पुढे ढकलण्याची परवानगी द्यावी आणि हे पत्र लिहिण्याचे काम शरद पवार यांनी बाजूला बसून उद्धव यांच्याकडून करवून घेतले आहे अगदी उद्धव यांची तशी इच्छा नसतांना कारण या निवडणुकीमुळेच हे महाआघाडी सरकार शंभर टक्के गडगडणार होते पण पवार यांनी राजकीय कसब पणाला लावून उद्धव यांचे मन वळविले आणि ते या महा संकटातून वाचले, बाहेर पडले आहेत. अर्थात याचा अर्थ महाआघाडी सरकार कोसळण्याचा धोका पूर्णपणे टळला आहे असे समजण्याचे अजिबात कारण नाही कारण आतून मोठी अस्वस्थता आहे आणि जेव्हा भाजपाला मनापासून वाटेल कि आता हे सरकार पाडणे अत्यावश्यक आहे, क्षणाचाही विलंब न लावता ते हे काम करून मोकळे होतील. मात्र एखादा कसलेला नेता कसा राजकीय खेळी पालटवण्यात धुरंधर धूर्त असतो हे पुन्हा एकवार या दिवसात शरद पवार यांनी दाखवून दिले आहे ते जर या प्रक्रियेत नसते तर सरकार नक्की गडगडले असते पडले असते स्वतः उद्धव यांनीच ते पाडले असते….
या दिवसात आणखी एका मोठ्या बातमीने जोर धरला आहे ज्यामुळे अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले आहेत तर अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. बातमी अशी कि देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिल्लीत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतील आणि गडकरी हे या राज्यात देवेंद्र फडणवीस यांची जागा घेतील, असेही काही घडेल वाटत नाही पण तसे घडले तर तिकडे मोदी आणि शाह खुश होतील सभोवताली गिरक्या घेऊन गर्भा खेळून मोकळे होतील पण मोठे नुकसान स्वतः फडणवीस, गडकरी आणि राज्याचे होईल. कारण फडणवीस येथे असणे हि या राज्याची मोठी गरज आहे आणि नितीन गडकरी दिल्लीत असणे हे या देशाची राष्ट्राची गरज आहे त्यामुळे असे अजिबात घडता कामा नये कि धडपडे कडक तोडफोड फडणवीस दिल्लीत गेले आणि तोळामासा तब्बेतीचे गडकरी राज्यात येऊन उलट पुन्हा शरद पवार यांच्या फायद्याचे ठरले. जरी नागपुरातल्या विदर्भातल्या घराघरात पोहोचलेल्या या दोन्ही नेत्यांची विदर्भाला मोठी आवश्यकता असली तरी नितीन गडकरी हे थकेपर्यंत निवृत्त होईपर्यंत दिल्लीत असणे हि महाराष्ट्राची आणि डॅशिंग फडणवीस हे राज्यात असणे हि आपल्या सर्वांची फार मोठी गरज आहे, जातीपातीच्या आंदोलनात जर फडणवीस यांना मोठा सततचा मानसिक त्रास देणे थाम्बले तर नक्की सांगतो सामान्यांच्या जे मोदी यांच्याविषयी मनात असते आणि ते तसे करवून दाखवतात नक्की सांगतो फडणवीस हे या राज्याचे किमान, नक्की नरेंद्र मोदी आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी