टवाळ ऊर्जा मंत्री : पत्रकार हेमंत जोशी
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अलीकडे सरकारमधील आपले सहकारी पक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा न करताच थेट पोरकट बुद्धीने संबंधित पारेषण आणि निर्मिती कंपन्यांमधील संचालक मंडळांवर अशासकीय नेमणूका केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ असल्याचे जणू दाखवून दिले, काँग्रेस चे नेते तसेच शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना अजिबात न विचारता राऊत यांनी केलेला हा आगाऊपणा पोरकटपणा त्यातून महाआघाडीतील मतभेद एकप्रकारे चव्हाट्यावर आले आहेत. हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांचे सरकार सध्या राज्यात अस्तित्वात आहे तेथे मनमानी करून भागणारे नसते अन्यथा मुख्यमंत्र्यांचा इतर मंत्र्यावर धाक, वचक नाही असे चित्र जनतेला नक्की बघायला मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या नजरेत जेव्हा हि बाब आली ते आणि इतर सारेच दिवसभर नितीन राऊत यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चांगलेच तोंडसुख घेतांना सर्वत्र बघायला मिळाले. मंत्री थोरात तर म्हणे राऊत यांना थेट म्हणाले कि असे वादग्रस्त वागणार असाल तर आम्हाला तुमच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागेल कारण प्रदेशाध्यक्ष या नात्याने थोरात यांना ठाकरे पवार यांच्यासहित अनेक नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले…
ब्राम्हणांचे शाप ऊर्जा खात्याच्या टवाळ मंत्र्याला म्हणजे नितीन राऊतांना चांगलेच भोवलेले दिसतात. वीज महामंडळात केलेल्या अशासकीय संचालकांच्या मनमानी नियुक्त्या काँग्रेस चे राज्यातले कप्तान आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने रद्द करून नितीन राऊत यांना म्हणाल तर चांगलेच तोंडावर पाडले म्हणाल तर अणकुचीदार दगडावर जणू राऊतांचे ढुंगण ठेचून थोरात मोकळे झाले. थांबा, जर मी या कोरोना महामारीतून सहीसलामत बाहेर पडलो तर ऊर्जा खात्यात राऊत आणि त्याच्या आसपास जमलेल्या चमच्यांनी जो सावळा गोंधळ घातलाय, दर आठवड्याला एक पुरावा छापून मोकळा होईल. अरे राऊत तुमच्यात हिम्मत असेल तर जरा पाटलांच्या विरोधात असे काहीबाही बरळून दाखवा बरे, ढुंगण सोलून काढतील एकजात सारे मराठे तुमचे, जे तुमच्या ना अधे ना मध्ये त्या ब्राम्हणांच्या विरोधात असे तोंडात विष्ठा ठेऊन का हो बरळलात, जरा लक्ष घाला कि तुमच्या ऊर्जा खात्यात, आणि घरातही अधून मधून अन्यथा वेळ येते बायकोच्या हातचा मार खाण्याची किंवा पोटच्या पोराचे विविध पराक्रम ऐकण्याची. परमेश्वराने चांगली संधी दिली आहे तर चालून आलेल्या या संधीचा सदुपयोग करवून घ्या अन्यथा कायमचे राजकारातून बाहेर व्हाल, होईल मग तुमचाही उल्लेख नागपुरातल्या पडिक नेत्यांच्या यादीत…
www.vikrantjoshi.com
विद्यमान मंत्री, महसूल या महत्वाच्या खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात हे राहुल यांचे आवडते आणि सोनिया यांचे लाडके आहेत कारण उद्या समजा काँग्रेस मध्ये दहा नेते उरले तर त्यातले एक नक्की बाळासाहेब थोरात असतील म्हणून या राज्यात ते पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे स्नेही आहेत अशोक चव्हाणांचे खास मित्र आहेत, सातव वासनिक सारख्या दिल्लीतल्या मराठी नेत्यांच्या पसंतीस उतरलेले या राज्यातले तडफदार दिलदार नामदार व नेते आहेत, काँग्रेस मधल्या महिला नेत्यांना व मंत्र्यांना सख्या भावासारखे आहेत आणि अमित देशमुख विश्व्जीत कदम इत्यादी साऱ्या तरुण नेत्यांचे आदर्श आहेत. नितीन राऊत यांनी त्यांच्या या प्रभावी नेत्याला यशस्वी प्रदेशाध्यक्षाला आणि मंत्री म्हणून कायम एका उत्तम प्रशासकाला मुख्य म्हणजे त्याचवेळी ज्यांचा शब्द त्या महाआघाडीत अखेरचा शब्द मानल्या जातो त्या शरद पवार यांना आणि आगाऊपणा करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला जेथल्या तेथे ठेचण्याची ताकद ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा नितीन राऊत यांनी अक्षरशा: फाट्यावर मारून म्हणजे मी कोणाला काय समजतो या मस्तीत जेव्हा या अशासकीय संचालकांच्या नियुक्त्या केल्या माझ्या कानावर हे पडले आणि त्याक्षणी मी मित्रांना म्हणालो, आता नितीन राऊतांचे अजिबात खरे नाही, नेमके तेच घडले ऊर्जा खात्याचा अतिशय बारीक अभ्यास माहिती असलेल्या अजोय मेहता यांनी राऊत यांनी केलेला आगाऊपणा आधी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला, त्याच क्षणी मुख्यमंत्र्यांनी फोन करून उचलून त्या बाळासाहेबांना सांगितले नियुक्त्या रद्द करून राऊतांना त्यांची जागा दाखवा, राऊतांची अशी खाशी जिरली…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी