सत्याचे प्रयोग : पत्रकार हेमंत जोशी
मी महात्मा गांधी नाही त्यांच्या पायांची विचारांची सर मला नाही मी फारसे गांधी वाचलेले पण नाहीत त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा नक्की माझ्यावर नाही पण आजवरच्या आयुष्यात विविध अनेक सत्याचे प्रयोग मी पण करून बघितले यापुढेही नक्की करून बघणार आहे जसे १९९० पर्यन्त मांसाहार हा माझा वीक पॉईंट होता आठवड्यातून किमान चार दिवस मी हटकून मांसाहार करीत असे पण एक क्षण असा आला कि मी शपथ घेतली मांसाहार काय पण अंड्याचे देखील सेवन करणार नाही आज त्या शपथेला जवळपास ३० वर्षे उलटलीत केक मध्ये अंडे असते म्हणून मी साधा केक देखील खात नाही किंवा काही देशांमधून तेथल्या दुर्गम भागातून फिरताना शाकाहारी असे काहीच खायला मिळत नाही अशावेळी मी स्वतः हॉटेलातल्या किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवून खातो. मी आयुष्याचा कुटुंब व्यवस्थेचा पुरेपूर उपभोग घेणारा माणूस आहे पण या निर्णयावर मी जवळपास येऊन ठेपलोय कि सार्या सुखांचा त्याग करून अचानक एक दिवस वनवासात निघून जायचे आणि उर्वरित आयुष्यात ध्यान साधना योगाभ्यास लिखाण इत्यादींवर प्रभुत्व मिळवायचे, विशेष म्हणजे मी कुटुंब सदस्यांना याची कल्पना दिलेली आहे त्यामुळे त्यांना माझ्या या एकांतात निघून जाण्याचे नक्की फारसे आश्चर्य वाटणार नाही.
अमुक एखादी किंवा एखाद्यावर विरोधी भूमिका लिखाणातून घेणे तो माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे पण प्रत्यक्ष जीवनात मी कधीही कोणाचाही दुस्वास करीत नाही अगदी शत्रू असलाच तर त्याच्याकडे देखील सकारात्मक नजरेने बघतो, एखाद्याने आपल्याशी चुकीचे वर्तन केले म्हणून शिव्याशाप देणे मला माहित नाही कारण मी एक असंख्य पाप केलेला सामान्य माणूस, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते मग का म्हणून एखाद्याला शिव्याशाप दयावेत. अगदी अलीकडे शरद पवार पुन्हा एकवार कुठल्याश्या शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल झाले होते त्यांच्यावर ज्यादिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यादिवशी नेहमीप्रमाणे त्यांच्या काही हितशत्रूंनी ते गेले अशी बातमी पसरविली, पत्रकार मी खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या एका अतिशय निकटवर्तीयाला फोन केला तो म्हणाला हे काय आत्ताच साहेब सिल्व्हर ओक वर स्वतःच्या पायांनी चालत आले. आणि आज हा लेख लिहीत असतांना पवारांची उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी भेट झाल्याचे वृत्त सगळीकडे झळकले. पवारांच्या भूमिका त्यांचे राजकारण त्यांच्या काही अतिशय दुखावलेल्या विरोधकांना भलेही रुचणारे नसेल पण जेव्हातेव्हा त्यांच्या मृत्यूच्या अशा अफवा पसरविणे अजिबात योग्य नाही. यावेळी ज्याने मला पवारांची हि बातमी फोनवरून सांगितली त्या तरुणाला मी एवढेच म्हणालो, पवार आधी तुला पोहचवून येतील नंतर वाटल्यास ते जातील जेव्हा त्यांनी वयाची शंभरी पार केलेली असेल. नितीन गडकरी स्वतः तसे कधी वागल्याचे आठवत नाही पण ते नेहमी म्हणतात कि दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करा मोठी काढा आणि हीच आयुष्यात आपण भूमिका घ्यायला हवी. पवारांचे बाबतीत हि अशी दरवेळी अफवा पसरविणे त्यातून उलट त्यांचे आयुष्य वाढते आणि वाढावे असेच मला वाटते. माझे काही आप्त नेहमी म्हणून दाखवतात कि हेमंतला संपवायचे आहे, हेमंत तू मर एकदाचा असेही काही म्हणतात त्यावर मी मात्र गप्प असतो बसतो त्यात हाच विचार असतो कि आपल्या तोंडून विरोधकांचे किंवा जे आपल्याला त्रास त्रागा देताहेत त्यांचे वाईट व्हावे असे कोणतेही अपशब्द बाहेरच पडता कामा नये. अर्थात तुम्ही अमुक एखाद्याला वारंवार विनाकारण त्रास देत असाल त्रासून सोडत असाल तर ज्याला त्रास होतो अशी कोणतीही व्यक्ती तुम्हाला तोंडावर शक्य नसेल पण आतून मनातून हृदयापासून नक्की शाप शिव्याशाप देत असते म्हणून इतर दुखावतील असे कधीही वागू नका कारण सृष्टीचा तर तो नियम आहे कि सारे काही येथेच सोडून आणि भोगून उपभोगून वर जायचे आहे. मनात एक आणि कृती भलतीच असेही स्वार्थी वागू नका. समोरची व्यक्ती दुबळी एकाकी हळवी त्याचा गैरफायदा घेऊन अशांना त्यांच्या आयुष्यातून उध्वस्त करू नका, आज तुमचा वक्त चांगला आहे त्याचा सदुपयोग करा अन्यथा अंत तुमचाही वाईट होईल जेव्हा तुम्हाला तुम्ही केलेली दुष्क्रुत्ये आठवतील पण तुमच्याकडे गाळायला असतील ती केवळ आसवे…