भानगडी लफडी आणि विस्कटलेली घडी : पत्रकार हेमंत जोशी
अनेक आर्थिंक अडचणीत आहेत अनेकांना पैशांची चणचण आहे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अनेकांचे उद्योग धंदे बुडाले आहेत, अफाट खर्च करण्याची सवय लागलेल्या जोडप्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने असंख्य बदमाश तरुणी हनी ट्रॅपचा अवलंब करून पुरुषांना लुबाडताहेत तर बहुसंख्य पुरुष कधी ओळखीतून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्लुप्त्या युक्त्या लढवून तरुण स्त्रियांना नादी लावण्यात विकृत आनंद घेताहेत लुटताहेत विशेषतः गांड मे नही गु और हगने चला जुहू म्हणीनुसार बहुसंख्य चालू पुरुषांचे वागणे असते म्हणजे इकडे घरी स्वतःचे कुटुंब उपाशी असते आणि असे कितीतरी पुरुष कि जे बाहेर तरुण स्त्रियांना आम्ही कसे मालदार असे खोटे खोटे भासवून आपल्या जाळ्यात अडकवत असतात पुढे जाळ्यात अडकलेल्या या तरुण स्त्रियांना ते हमखास आर्थिक लुबाडतात मात्र काही लोकांना, अडचणीत सापडलेल्यांना मनापासून सहकार्य मदत करायची असते पण नेमके तसे घडत नाही मदत करणाऱ्यांनाच फसविले गंडविले जाते आहे. माझ्यासहित माझ्या अनेक दानशूर मित्रांना हे असे वाईट अनुभव या कोरोना महामारीत आले आहेत येताहेत म्हणून मदत घेणाऱ्यांनी आणि मदत करणार्यांनी देखील सावध पावले उचलून नेमके निर्णय घ्यावेत. आमच्या ओळखीच्या एकाच्या मुलीचे लग्न होते, त्यांच्याकडले पैसे संपले म्हणून म्हणून मी जेव्हा त्यांना मोठी रक्कम पाठवली त्या पैशांतून त्या गृहस्थाने संध्याकाळी महागडी दारू त्या पैशांतून काही रक्कम खर्च करून विकत आणली, एका विधवेकडे दोन हजार रुपये पाठविले त्यादिवशी तिने मुलांना चक्क मॅकडोनाल्ड मध्ये नेले तेथे एका दमात एक हजार रुपये खर्च केले जे खर्च करण्याची निदान माझी तरी आजही हिम्मत होत नाही. एका कुटुंबाकडे किराणा सामानाची यादी मागितली तर त्या अतिशय गरीब कुटुंबाने त्या यादीत अर्धा किलो प्रत्येकी बदाम आणि काजू हवे आहेत, इतर सामानाबरोबर सांगितले, मी डोक्याला हात लावला. अशा कितीतरी तरुण स्त्रिया ज्या ओळखी होताच खूप गरज आहे सांगून पैसे मागतात आणि त्याच बायका जेव्हा दररोज न चुकता उंची कपडे परिधान करून स्वतःचे उत्तान फोटो सोशल मीडियावर हमखास अपलोड करतात, त्यातून या बायका किती व कशा चालू आहेत असाव्यात हे लगेच लक्षात येते.
इकडे नवऱ्याने सांगायचे माझे बायकोशी पटत नाही तिकडे बायकांनी सांगायचे मला नवऱ्याचे सुख नाही आणि हे असे बदमाश स्त्री पुरुष जेव्हा जोडप्याने अगदी एकमेकांना बिलगून चिपकून एकमेकांना खेटून फोटो काढून विविध सोशल मीडियावर त्यांचे फोटोज अपलोड करतात, बहुसंख्य भारतीय स्त्री पुरुषांचा विशेषतः शहरी भागातून घसरलेला दर्जा त्यातून लक्षात येतो. विशेष म्हणजे अशा चालू जोडप्यांची वयात येणारी मुले आणि मुली आपल्या नालायक माय बापांना ओळखून व निरखून असल्याने अशा घरातली मुले व मुली बिघडायला अजिबात वेळ लागत नाही. माझा एक अमराठी व्यावसायिक मित्र त्यांचे बांद्र्याला घर आहे, बायका व मुले पुण्यात राहतात, हा एकटाच इकडे राहायला असला कि एका विवाहित तरुणीला तो बोलावून घेतो, आश्चर्य म्हणजे तिचा नवरा तिला सोडायला आणि घ्यायला येतो, अर्थात अशी एकमेकांच्या संमतीने पैशांसाठी वाट्टेल ते करणारी कितीतरी जोडपी आहेत असतात. या दिवसात नक्की अडचणीत सापडलेल्यांना तुम्ही आम्ही मदत करायची आहे पण या गरजू मंडळींच्या हाती शक्यतो पैसे न ठेवता त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा थेट व आवश्यक तेवढा पुरवठा करावा असे मला वाटते. अर्थात असे सहकार्य मागणारे सारेच वाईट किंवा बदमाश असे नक्की नसते पण मदत करणाऱ्यांनी या मंडळींना तपासून घेतलेले बरे असते. विशेषतः अशा आप्तांना नातलगांना ओळखीच्यांना मदत सहकार्य करा जे तुमच्या या दानाची मोठ्या मनाची भविष्यात जाणीव ठेवणार आहेत अन्यथा आपण सढळ हाताने प्रसंगी आपल्या स्वतःच्या पोटाला भुकेले ठेवून इतरांना मदत करतो पण पुढे घडते असे ज्यांना आपण सहकार्य करतो, स्वतः अडचणीत दिवस काढून अशांना घडवितो वाढवितो असे कितीतरी जे पुढे तुमच्यावर उलटून तुमचा काटा काढतात विशेषतः राजकारणात व्यापारात किंवा नातलगांत असे निष्ठुर जागोजाग बघायला अनुभवायला मिळतात. या दगाबाज मंडळींवर तर मी एखादी कादंबरी काढू शकेल, मित्रांनो विशेषत: या कठीण दिवसात सावध राहून माहिती घेऊन इतरांना मदत करा अन्यथा तुमचे मोल मातीमोल ठरेल…