कडवे जहाल हिंदुत्व हेच असावे राष्ट्रीयत्व भाग १ : पत्रकार हेमंत जोशी
इतर धर्मांविषयी द्वेष मत्सर राग शत्रुत्व असण्याचे काही कारण नाही नसते आणि हीच हिंदूंची भूमिका असते. इतर धर्मियांची रेषा पुसण्यात वेळ घालविण्यापेक्षा मी माझ्या उन्नतीची प्रगतीची रेषा अधिक मोठी करण्यात मोठेपणा व धन्यता मानेल असेच हिंदूंचे मत व वागणे बोलणे असते पण जसे इस्लाम खतरेमे अशी बांग देण्याचा अवकाश कि झाडून सारे मुसलमान आपापसातले त्यांचे मनभेद व मतभेद विसरून क्षणार्धात हाती जे काय दगडांपासून तर तलवारी पर्यंत शस्त्र मिळेल ते घेऊन जसे हिरव्या झेंड्याखाली एकत्र येतात ते तसे हिंदूंचे होत नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी व भविष्यातले महासंकट आहे असे वाटते. हिंदुस्थानाशी जे एकरूप मुसलमान आहेत असतील त्या चिमूटभर मुसलमानांचा कल नक्की हिंदूंना बाटविण्याकडे नसतो उलट आपलेही पूर्वज हिंदू होते याची त्या चिमूटभर या मातीशी एकरूप झालेल्या मुसलमानांची किंवा धर्मांतर केलेल्या अनेकांची खंत असते त्यामुळेच इतर काही धर्मियांच्या घरी त्यांच्या देवघरात हिंदू देवदेवतांना पण स्थान असते आणि त्यात त्यांना अजिबात वावगे वाटत नाही ते मोठ्या भक्ती भावाने हिंदू देवदेवतांना देखील वाकून नमस्कार करतात पण इतर जागतिक स्तरावर किंवा शेजारच्या राष्ट्रांमध्ये विखुरलेल्या बहुसंख्य मुसलमानांची तशी अजिबात भूमिका नसते याउलट हिंदुस्थान मुस्लिममय करणे किंवा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे त्यांचे प्रमुख लक्ष्य आणि उद्दिष्ट असते. अलीकडे पार पडलेल्या केरळ किंवा पश्चिम बंगालच्या विधान सभा निवडणुकात त्याचे प्रत्यंतर आले आहे विशेषतः थेट ममता बॅनर्जींच्या केवळ मतांसाठी मुस्लिम धार्जिण्या भूमिकेमुळे तेथे स्थानिक मुस्लिमांनी शेजारच्या राष्ट्रातून घुसखोरी केलेल्या मुसलमानांच्या साहाय्याने सत्ता मिळविण्यात फार मोठे यश मिळविलेले आहे अशावेळी हिंदूंनी एकत्र येऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून भविष्यातल्या पाकधार्जिण्या महासंकटावर विचार करण्यापेक्षा संघ व भाजपाची खिल्ली उडविण्यात विकृत घातकी आनंद मानला आहे मानताहेत…
माझ्या एका व्यापारी मित्राने तो स्वतः देखणा चिकना असतांना देखील अगदी ठरवून एका अत्यंत कुरूप तरुणीशी काही वर्षांपूर्वी ठरवून रीतसर लग्न केले, या विजोड जोडप्याकडे बघून इतर फिदीफिदी हसायचे त्याच्या पाठी त्याची टर खेचायचे टिंगल करायचे, आपण विशेषतः फेसबुक वर बघतो कि कुठल्याशा मजबुरीमुळे भारतीय स्त्री हे असे करते म्हणजे दिसण्यात अगदीच खेचर असलेल्या पुरुषाशी लग्न उरकून मोकळी होते त्यामुळे इतर अशा देखण्या तरुणी व तिच्या नवर्याकडे बघून चांगल्या झाडावरचे माकड असेच म्हणतात किंवा आपण ज्यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत असतो त्या मुली जेव्हा अशा माकडांशी लग्न करतात तेव्हा मी काय वाईट होतो हेच म्हणून आपण मोकळे होतो. मी एक दिवस मित्राला हिम्मत करून विचारलेही कि तू असे का केले त्यावर तो म्हणाला एकतर त्यामुळे सासर्याने खुश होऊन त्याची अर्धी मालमत्ता माझ्या नावाने केली दुसरे असे कि मी देखणा त्यामुळे बायको फिदा व खुश असते, बाहेर मी वाट्टेल तो धुडगूस घालतांना माझ्याकडे दुर्लक्ष करते तिसरे महत्वाचे म्हणजे असे कि इतरांसारखे तिला झाकून सांभाळून ठेवावे लागत नाही कारण तिच्याकडे मान वर करून बघण्याचे धाडसच इतरांमध्ये होत नाही थोडक्यात काय तर जशी पती किंवा पत्नी निवडतांना तुमची वेगवेगळी मते असतात तेच तुमचे राजकीय पक्षांच्या बाबतीत पण निर्णय ठरलेले असतात, एखाद्याला काँग्रेस आवडते तर एखाद्याला राष्ट्रवादी काहींना शिवसेना आवडते काहींना भाजपा तर काहींना मनसे देखील आवडते काही लाल निशाण हाती घेण्यात धन्यता मानतात तर काहींचे विचार शेकाप किंवा एखाद्या शेतकरी संघटनेशी एकरूप असतात थोडक्यात राजकीय विचारधारेत तुमची मतभिन्नता असणे त्यात वावगे असे काही नाही पण जे कधी आपले होणारच नाही अशा काही मुसलमानांचे केवळ मतांसठी लांगुलचालन करून त्यांना विधान सभा किंवा लोकसभेवर पाठविणे हिंदू मतदारांचे अत्यंत चुकीचे असे काम आहे कारण असे सत्तेत बसणारे मुसलमान नेते कायम बाबा सिद्दीकी अस्लम शेख नवाब मलिक विचारांचेच असतात त्यातला जो चुकून शाबीर शेख म्हणून जन्माला येतो ते फार क्वचित घडते आणि अशा शाबीर शेख पद्धतीच्या नेत्यांपाठी उभे राहण्यात हिंदूंनी धन्यता मानली पाहिजे. महत्वाचे म्हणजे बांग दिल्यानंतर जे मुसलमानांचे होते म्हणजे ते जसे क्षणार्धात अगदी त्यांच्या जातीतल्या त्यांच्या शत्रू शेजारी देखील चिपकून उभे राहून हिंदूंवर चाल करून येतात ते तसे हिंदूंनी पण केलेच पाहिजे म्हणजे राजकीय मतभेद असले तरी हिंदू समृद्ध होण्यासाठी हिंदुत्व टिकून राहण्यासाठी समस्त हिंदूंनी महिन्यातले निदान काही दिवस एकत्र येऊन प्रेमाचा हात एकमेकांच्या हातात घेतला पाहिजे. मी जे उद्धव सत्तेत बसल्यापासून अगदी ओरडून सांगतोय कि चुकीच्या मुस्लिम नेत्यांना जवळ घेऊन सन्मानित करून पद देऊन शरद पवार पद्धतीने त्यांना मोठे करू नका त्यात तुमच्या नेतृत्वाचे व शिवसेना पार्टीचे फार मोठे नुकसान होईल ज्याची मोठी झळ खुद्द ठाकरे कुटुंबाला बसेल किंवा बसते आहे, उद्धवजींनी माझ्या म्हणण्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि घडले तेच जे मी सांगितले अर्थात हि तर सुरुवात आहे म्हणजे जवळचा मित्र अशी ओळख निर्माण करून ज्या आदित्य ठाकरे यांनी नको त्या मुस्लिम नेत्यांना मित्रांना नको तेवढे जवळ केले त्यातल्या झिशान बाबा सिद्दीकी या आमदाराने शिवसेनेची जाहीर मक्तेदारी अलीकडे तेही थेट रस्त्यावर उभे राहून काढून थेट ठाकरे बाप बेट्यांना अवाक केले माझे लिहिणे खरे ठरले आणि माझे हेच सांगणे आहे असते कि जे आपले होणारे नाहीत त्यांना महत्व देऊ नका, हिंदुत्व तर धोक्यात येईलच पण तिकडे स्वर्गातल्या देवघरात त्या बाळासाहेबांना केवढ्या हो यातना होतील, होत असतील…
(अपूर्ण)…