नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी
तुम्हीच आठवा, महाविद्यालयात शिकत असतांना तुमच्या सभोवताली दोन भिन्न स्वभावाच्या तरुणी कायम असायच्या. काही एकदम बिनधास्त वागणाऱ्या अगदी टवाळ तरुणांसारख्या वर्गातल्या टग्या मुलांसारख्या, या मुलींना चालू हि पदवी हमखास बहाल केल्या जायची कारण त्यांची एकंदर वागणूक वर्तणूक किंवा वृत्ती वादातीत असायचे आणि काही तरुणी म्हणजे एकदम सुसंस्कृत खालची मानही वर न करता शिकणाऱ्या त्या मुलांच्या नजरेत काकूबाई ठरायचा पण पुढे अनेकदा नेमके उलटे घडते म्हणजे ज्या तरुणीला बुद्धिमान किंवा काकूबाई म्हणून बघितल्या जायचे ती एक दिवस चक्क धर्माबाहेर असलेल्या तरुणांबरोबर पळून जाते आणि जिच्या एकंदरच चारित्र्य किंवा भवितव्याविषयी कायम शंका अशी तरुणी पुढे उत्तम संसार आणि छान करिअर घडवून मोकळी होते. बिहार आणि मुंबई महाराष्ट्र पोलिसांना या सुशांत सिंग आणि दिशा मृत्यू किंवा घातपात प्रकरणी वर दिलेले उदाहरण नेमके लागू पडते. आजतागायत बिहार पोलिसांविषयी कधीही केव्हाही फारसे चांगले बोलल्याच गेले नाही ते सध्या सर्वत्र देशभर कौतुकाला पात्र ठरताहेत आणि विशेषतः मुंबई पोलिसांची अगदी जगभर या प्रकरणातून छी थू बदनामी नाचक्की झालेली आहे थोडक्यात बिहारी पोलीस सुशांत दिशा प्रकरणी अव्वल ठरले त्याचवेळी मुंबई पोलिसांना बिहारी तुमच्यापेक्षा कित्येक पटीने चांगले हिणवल्या गेले, चिडविल्या जाते आहे जे मन सुन्न व डोके बधिर करणारे ठरले…
www.vikrantjoshi.com
जीवाची मुंबई हा वाक्प्रचार तसा अख्य्या मुंबईला फारसा कधीही लागू पडत नाही, जीवाची मुंबई हा वाक्प्रचार बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान जी मुंबई पसरलेली आहे उभी आहे केवळ त्याच फिल्मी ग्लॅमरने वेढलेल्या परिसराला तंतोतंत लागू पडतो. जसे जगभरातल्या शौकिनांचे पाय आपोआप गोव्याकडे पुण्याकडे वळतात त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मुंबईतील बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान असलेल्या परिसराची शौकिनांना भुरळ पडते. 24 तास हा परिसर हॉट असतो जागा असतो स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगत असतो आणि आम्ही मुंबईकर जे नेमके या परिसरात वास्तव्याला आहोत आमच्या या परिसरात नेमके काय आणि कसे गंभीर घडत असते ते आम्हाला माहित असते. अलीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अगदी उघड व बिनधास्त घडलेल्या सुशांत सिंग आणि दिशा प्रकरणी यासाठी एवढे मोकळेपणाने बोलू शकले कारण ते आणि त्यांचे कुटुंब याच परिसरातल्या हॉटेस्ट परिसरात म्हणजे जुहूच्या समुद्रकिनारी वास्तव्याला आहेत त्यामुळे तरुण नितेश राणे यांना दिशा व सुशांत प्रकरण नेमके कसे घडत गेले किंवा बड्या घरातली कुटुंबातली कोणती मुले व मुली कसे, नितेश किंवा पार्थ अजित पवार यांना अतिशय बारकाईने माहित असते किंवा असल्याने स्वतः पार्थ पवार आणि नितेश यांचे वडील नारायण राणे कॉन्फिडन्टली आरोप करून मोकळे झाले…
जी पिढी ऐन तारुण्यात सर्वच क्षेत्रात स्वतः बेफाम बेधुंद अंदाधुंद तुफान जंगली राजकारणात आणि पैशांनी अवाढव्य झाली त्या मागच्या पिढीला आज सर्वाधिक मोठी काळजी आहे राजकारणात उतरलेल्या उतरणाऱ्या पोटच्या मुलांची कारण आम्हा भारतीयांचे तर हे ठरलेलेच आहे कि आधी स्वतःचे घर मोठे करायचे त्यातून काही उरलेच तर कार्यकर्त्यांच्या अंगावर भिकाऱ्यासारखे भिरकवायचे त्यातलेच एक अजित पवार, आजकाल त्यांना सर्वाधिक चिंता व काळजी आहे ते माझ्या पार्थचे कसे होईल त्याची आणि त्यात अजितदादांची काही चूक आहे असे वाटत नाही कारण जशी या राज्यातल्या अजितदादांच्या वयाच्या ज्या त्या नेत्याला जशी फक्त आणि फक्त पोटच्या बबड्याची काळजी आहे त्यातलेच एक अजितदादा हे देखील त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पार्थ मागल्या लोकसभा निवडणुकांपासून वडिलांच्या संपर्कात असतो त्याला जसे जमेल त्यापद्धतीने तो येथे पाय रोवण्यासाठी धडपडत देखील असतो आणि हे असे राजकीय बाप व त्यांच्या मुलांचे प्रत्येक राजकीय पक्षात सतत धडपडणे सुरु आहे सुरु असते. पारनेर चे नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणले ते अजितदादांनी नव्हेत तर पार्थ पवार यांनी आणि ती पार्थ याची अत्यंत यशस्वी खेळी ठरली आहे हे मी तुम्हाला आज सांगतो जरी उद्धव ठाकरे यांनी त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यात यश मिळविले असले तरी. आणि याच पार्थ पवार यांनी सुशांत व दिशा प्रकरणात लागोपाठ दुसऱ्यांदा म्हणजे पारनेर नगरसेवक फूट प्रकरण घडल्यानंतर दुसरा शिवसेनेला फार मोठा धक्का दिला आहे. मला तर वाटते पार्थ अजित पवार हे धक्का तंत्र वापरण्यात हे असे बापाच्या पावलावर पाऊल ठेवते झाले तर उद्या कदाचित ते स्वतःच्या हिंमतीवर विधान परिषदेतील आमदारकी मिळवून मोकळे झाल्याचे दृश्य आपल्या सर्वांना हमखास नक्की निश्चित पाहायला बघायला मिळेल…
मित्रहो, सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणी वरकरणी जेव्हा सारे काही शांत झाले आहे मिटलेले आहे असे संबंधितांना व साऱ्या भारतीयांना वाटत होते ते बघून या आत्महत्येची नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले आणि मनातून अस्वस्थ डिस्टरब झालेले एकमेव पार्थ पवार जाहीर मागणी करीत होते कि या घातपाताची सीबीआय चौकशी करा. हा शिवसेनेला आणि मित्र आदित्य ठाकरे यांना पार्थ यांनी दिलेला दुसरा मोठा दणका होता. कृपया पार्थ तुम्ही शांत बसा, असा निरोप त्यांना धाडल्यानंतर देखील ते शांत बसले नाहीत, अजितदादांच्या स्वभावाची झलक आणि चुणूक जणू पोटच्या पोरातून दिसून आली. अस्वस्थ झालेले आणि दिशा व सुशांत मृत्यू व घातपात प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले पार्थ अजित पवार अगदी उघड गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले आणि लेखी निवेदन देऊन वरून त्याचा फोटो पुरावा सर्वांसमोर उघड करून मोकळे झाले. आपल्या घरातलेच म्हणजे आपल्याच आघाडीतले आपल्यावर उलटल्याने बघून अनेक पार्थ यांनी घेतलेल्या उघड भूमिकेतून हादरले आणि घाबरलेही….
क्रमश: हेमंत जोशी