कोण कोण अंदर कोण कोण बाहर : पत्रकार हेमंत जोशी
अनिल देशमुख यांच्या ताफ्यात एकंदर ३५ माणसे कार्यरत होती त्यापैकी अद्याप फक्त कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची तेवढी सीबीआय ने चार तास एकत्र आणि वेगवेगळे पद्धतीने चौकशी केली आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आणखी कोणाची चौकशी हा प्रश्न तसा अनुत्तरित असला तरी त्यांच्या कार्यालयातले राजेंद्र आहिवार योगेश कोठेकर चौधरी काद्री चिंतन थोरात रवी व्हटकर असे आणखी काही महत्वाचे मोहरे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नाहीत विशेषतः राजेंद्र अहिवार हा तर जवळपास १०-१२ वर्षे अनिल देशमुखांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जात असल्याने त्याची कसून चौकशी झाल्यास सीबीआयचे काम अधिक नक्की सोपे होणार आहे. शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही हा राजेंद्र अहिवार त्या देशमुखांच्या कार्यालयातील अत्यंत महत्वाच्या नसत्या कशा स्वतः हाताळायचा आणि त्यावर आपल्या अक्षरात अशा महत्वाच्या नस्त्यांवर तो कसा बेकायदेशीर पद्धतीने शेरे लिहून मोकळा होत असे त्याची कबुली स्वतः संजीव पलांडे आणि सचिन वाझे यांनी आपणहून सीबीआय कडे दिल्याचे समजते त्यामुळे आज ना उद्या राजेंद्र यास सीबीआय ने चौकशीसाठी बोलावल्यास त्यातून मोठे बिंग नक्की बाहेर पडणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने अहिवार हा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्याची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यावेळेच्या गृहमंत्र्यांकडे कोणतीही अशी नियुक्ती केलेली नसतांना अहिवार कोणत्या अधिकाराने शासकीय महत्वाच्या फाईल्स हाताळत असे हे न उलगडलेले असे कोडे आहे. संजीव पलांडे आणि राजेंद्र अहिवार हे अनिल देशमुखांच्या काळातले अत्यंत अत्यंत दोन्ही महत्वाचे असे मोहरे होते तसेच रवी व्हटकर आणि योगेश कोठेकर व कुंदन शिंदे या मंडळींना जर सीबीआयने आपला खास खाक्या दाखवून बोलते केले तर सीबीआयचे काम खूप सोपे होणार आहे अद्याप ठाणे जिल्ह्यातील बदल्यांच्या संदर्भात सीबीआयने लक्ष घातलेले दिसत नाही त्याकडे त्यांनी लक्ष दिल्यास सर्वप्रथम राजेंद्र अहिवार गजाआड होण्याची अधिक शक्यता निर्माण होईल. बढत्या बदल्या हिअरिंग परवाने घुटक्याचा काळा बाजार हे विषय पलांडे व अहिवार यांच्याकडून समजावून घेणे अधिक उचित व योग्य ठरेल….
संजीव पलांडे राजेंद्र अहिवार रवी व्हटकर कुंदन शिंदे या चार प्रमुख मोहऱ्यांची नावे पुढे आलेली असली तरी त्यातले आणखी एक अत्यंत महत्वाचे नाव विशेष उजेडात आलेले नाही आणि हे महाशय आहेत अनिल देशमुख यांचे गेली अनेक वर्षे पीएशीप सांभाळणारे अनिल देशमुख व देशमुख कुटुंबियांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार व गुंतवणूक बघणारे सांभाळणारे तसेच स्वतःसाठी कि देशमुखांची हप्ते वसुली करून कोट्यवधी रुपये जमा करणारे श्रीमान योगेश कोठेकर. नागपुरातल्या स्थानिक बातम्या देणार्या महाराष्ट्र न्यूज ७ या वाहिनीने तर योगेश कोठेकर कशा पद्धतीने स्वतःसाठी व अनिल देशमुख यांच्यासठी हप्ते वसुली करायचे त्यावर चक्क अनेक पुरावेच सादर केले आहेत ज्याचा मोठा उपयोग पुरावे जमा करतांना सीबीआयला नक्की होणार आहे कारण कोठेकर हे आजकालचे नव्हे तर तब्बल २०-२२ वर्षे ते देशमुख कुटुंबियांचे विश्वासू व स्वीय सहाय्यक म्हणून काम बघताहेत त्यामुळे अमुक दिवशी अनिलबाबूंनी कोणत्या ब्रॅण्डची आणि कोणत्या रंगाची अंडरवेअर घातली होती याची सुद्धा माहिती म्हणे योगेश कोठेकर यांना असते त्यामुळे त्यांना तातडीने बोलते करणे अत्यंत महत्वाचे ठरणारे आहे. पुढल्या एक दोन दिवसात माझे अनिल देशमुख विषयावर पाक्षिक प्रकाशित होणार आहे, अवश्य वाचा अनेक धक्कादायक उलगडे त्यातून तुम्हाला होतील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी