अन्न आणि औषध विभागाची “पोल” खोल
हा राजन किवा आर.आर. पोळ कोण? आर. आर. आबा तर नक्कीच नाही. ते सज्जन होते. पण हा पोळ त्या कुळातला नाही. “महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनातील आयस भापगिरी संपली” या शीर्षकाखालील मी १३ फेब्रुवारी रोजी लिहिलेला ब्लोग जर वाचण्यात आला असेल, तर हा पोळ कोण तुम्हाला कळेल…
आर. आर. अर्थात राजन पोळ हे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासना मध्ये औषध नियंत्रण प्रयोगशाळा चे सहाय्यक संचालक म्हणून सध्या रुजू आहेत . पोस्टिंग औरंगाबाद येथे आहे. ते हि कागदावरच. महाशय मुंबई येथेच अस्तात. धडाकेबाज महेश झगडे यांनी जेव्हा या विभागाचे आयुक्त म्हणून रुजू झाले तेव्हाच त्यांनी पोळ यांना औरंगाबादला धाडले. “मिस्तर मनी पेनी” नावाने ओळखल्या जाणार्या पोळ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या असंख्य तक्रारी होत्या. त्यामुळेच त्यांना हटवण्यात आले असेल कदाचित. अजून, एकाच कार्यालयात ३० वर्षे एकाच पदावर ५ वर्षे चिटकून होते. त्यांच्या बदली मागे हे हि एक कारण असू शकते. झगडे यांची परिवहन आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेल्या पुरषोत्तम भापकर यांनी “आपला माणूस” पोळ यांना मुंबई मध्ये परत आणले. मग सुरु झाला तंटा. असे म्हटले जाते कि सगळ्यांनीच “भापकर काळ” दरम्यान मजा मारली. पण अवघे ४ महिने. भापकर यांना हटविण्यात आले. भापकर यांच्या कार्यकाळ दरम्यान औषध नियंत्रण प्रयोशाळेची जबाबदारी एक महिला सहाय्यक संचालक वर होती. नाव घेणार नाही. या महिला अधिकारी यांना पोळ या “निर्यात” करून आणलेल्या व्यक्तीला “रिपोर्ट” करण्यास सांगण्यात आले. किवा पोळ यांचे प्रत्येक आदेश पाळण्यास सांगितले. या महिला अधिकारीने २ महिन्याची सुट्टी टाकली. त्यांनी नंतर स्वेच्छानिवृत्ती योजनेखाली अर्ज केला, पोळ यांच्या हाताखाली काम करणे त्यांना पसंद नव्हते, असे तेथील काही कर्मचारी सांगतात. जेव्हा हि महिला अधिकारी काम करायची त्या प्रत्येक दिवशी तिच्या डोळ्यात अश्रू असायचे, अशी माहिती मिळालेली आहे. पोळ हा त्यांना भयंकर छळायचा. हि महिला अधिकारी तशी एकदम देशप्रेमी. अजिबात करप्ट नव्हती. त्यांच्या मूळ कामांपासून त्यांना दूर ठेवण्यात आले. त्यांचे नमुना विश्लेषणाचे काम, ज्या द्वारे परवाने देण्यात येतात, हे अतिशय महात्व्हाचे काम आता भंपक पोळ करत असे. त्या महिलेला हा भंपकपणा बघून राहोले नसेल गेले. म्हणून त्या स्वतः बाजूला झाल्या.
जेव्हा झगडे यांनी पोळ याला औरंगाबादला पाठविले, त्याने तिथे पदभार सांभाळाच नाही. माहितीनुसार जवळपास अर्धे वर्ष तो सुट्टीवर होता. परदेशी वारया सुरु होत्या असे म्हणतात. असो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी सुरु आहे. दोन विभागिय चौकश्या सुद्धा आहेत. पण आपले महाशय मात्र मजेतच!
विभागांतर्गत असलेले विजिलन्स खात्या कडून तर पोळ यांचे निलंबन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. काय माहिती अश्या कोणत्या देवाची पूजा पोळ करतात? सगळ्यातून वाचत आहेत. आता बघुया काय करतात आपले कांबळे महशय?
महत्व्हाच्य मुद्द्यावार येतो. पोळ हे ३१ जुलै २०१५ रोजी निवृत्त होणार आहेत. पण या आगोदर त्यांना मुंबई मध्ये परत एकदा यायचे आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री बापट यांना या विषयावर पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. भापकर असताना जेव्हा ते मुंबई मध्ये परत आणले गेले होते, एका NGO ने, भापकर यांच्या ट्रान्स्फर नंतर, पोळला पुन्हा औरंगाबादला पाठीवले. पण कुठे जातो हा? अजून हि मुंबईतच आहे कामाला. कारण सांगतो. काय आहे, विभागाकडे अजून ३१ मार्च २०१५ पर्यंत २४ कोटी रुपये खर्च करण्याची बाकी आहे. याची नजर त्या “फंड” वर आहे. निवृत्त होण्या आगोदर काही टक्के भेटले, कि झाल. NGO ने जेव्हा परत पोळ यांना औरंगाबाद ला पाठविले, औषध नियंत्रण प्रयोशाळेची जबाबदारी सौ. वेंगुर्लेकर यांच्या वर देण्यात आली . काय हिम्मत करेल बाई याच्या विरुद्धात जायला? बिचारी बॉस असून कॅबीनच्या बाहेर बसते. पोळ याने ह्या बाईला दम दाटी करून एक पत्र साहेब यांच्या जबरदस्तीने पाठीविले आहे. कि ३१ मार्च येत आहे, खरेदी करायच्या आहेत, कृपा अतिरिक्त भार श्री पोळ यांच्या वर सोपवण्यात याव. कमाल आहे कि नाही?
पोळ ची कार्यालयात सुद्धा जोरदार सेटिंग आहे. त्याचे आणि त्याच्या माणसांची मुळे खोलवर रुजुली आहेत. औषध उत्पदान करणाऱ्याना जी औषधे परीक्षणात अपयशी ठरतात त्यांचा अह्व्हाल आधीच त्यांच्या कडे (औषध निर्माते) उपलब्ध अस्तो. अपयशी ठरल्याने, हा पोळ त्यांना बोलावतो, व्यवहार करतो, आणि त्या परीक्षणाचे बाटल्या बदलतात आणि त्याचे ड्रग पास होते. असा सगळा खेळ आपल्या आयुष्याशी हे लोक खेळतात. औषध निमार्ते यांचे दलाल अक्खा दिवस तुम्हला या पोळ च्या आसपास दिसेल. आता वाट बघायची ती फ़क़्त ३१ मार्चची. २४ कोटी उरलेले आहेत. बापट साहेब, कृपया कोणत्याही मोहाला बळी पडू नका. हा पोळ कोणाला घाबरत नाही असे म्हणतात. सांगतो मंत्रालयात लई ओळख आहे!
आपला पुणेरी हिसका दाखवा, याची बदली होऊ नका देऊ!!
FDA’s “POL” Khol
Who on earth is this RR Pol? If you
readers recollect, earlier in my blog on the 13th of February, under the title “IAS
Bhap“giri” ends in Maharashtra’s FDA” , I had exposed this RR Pol on
various accounts.
Rajan Pol was transferred to Aurangabad as
soon as Mahesh Zagade had resumed his duties as FDA Commissioner. The reason
for that must have been surely been several complaints lodged against Pol who
is also termed as “Mr. Money Penny”. The reason can be also
attributed to Pol being in the same office for almost 30 years and at the same
post for 5 years. But when Bhapkar occupied the chair after Zagade’s
transfer, he immediately called on to his Man Friday to Mumbai and the original
LADY AD DCL (Assistant Director of the Drug Control Laboratory) was made to
report to this Pol. Informally done. Now all orders would be routed to her
through Pol. Subsequently this lady officer goes on leave for 2 months and then
later opts for VRS. People say, everyday was a nightmare for her. She was often
seen in tears at workplace in her last days on the job, such was her
frustration. She was humiliated and her analytic duties were divested where
licenses samples were assessed and each quality problem costs lakhs of rupees.
She was purposely kept at bay by Bhapkar. This lady AD DCL was known for her
honesty and integrity and has been a non corrupt officer, so hence was
sidelined. Meanwhile when Zagade had transferred this allegedly corrupt Pol to
Aurangabad, Pol for nearly 200 days was on leave. Foreign trips were part of
absence at cost of service of 20 days says his application to commissioner.
Pol is also facing an open Anti Corruption inquiry and 2 Departmental
inquiries from the Vigilance Department who have recommended discontinuity of
his services. Right now he is transferred to Aurangabad, after complaints were
made by a NGO based on anonymous information sent to it by some disgruntled
elements within.
This allegedly corrupt RR Pol is due to
retire on 31st July, 2015. For one last time, he wants to come to Mumbai again.
He has written in regards to his transfer to the Cabinet Minister. Pol’s mentor
Bhapkar has gone. Now there are internal staffs in the FDA who have written
anonymous letters to us saying that even WHEN the orders were removed to send
Pol to Aurangabad he still continuous to occupy chair in Mumbai. The reason is there are funds
worth Rs 24 crore left with FDA to spend for purchases. Pol has an eye on that. Also since he
is the Laboratory head, Pol has his people and roots firmly placed. He has his people
who regularly change the sample bottles the ones which have failed to new ones,
so that they get the approval. Then the manufacturers of the Drugs have easy
access to the reports generated. They all have photocopies of the report if
their sample is passed or failed. Accordingly Pol makes a deal with a handsome
cut and everything is replaced. The Drug Manufacturer’s people
(agents) are often seen in the FDA building meeting Pol and cutting a sweet
deal for them. Now even if Mrs. Vengurlekar has been given charge, she still
prefers to sit outside of her cabin. Sources claim R R Pol dominates every
living being In that laboratory. He has also made Mrs. Vengurlekar
forcibly write to the FDA to give himself additional charge looking at the 24
crore FDA will spend have to spend by 31st March. So, no guesses why is Pol wanting to come to Mumbai…
There are people in the
Mantralaya trying to protect Pol. Hope the new Commissioner disregards this Pol
and makes sure that 24 crore is delivered and not splurged for service of
healthcare for the people of state. Bapat saheb, FDA ko Bachoooo…Take care of
your staff’s in Mantralaya. They may be tempted to issue him orders to come to
Mumbai.