सिक्रेट्स ऑफ अनिल देशमुख : पत्रकार हेमंत जोशी 

सिक्रेट्स ऑफ अनिल देशमुख : पत्रकार हेमंत जोशी 
अमुक एखाद्या राजकीय पक्षाला विविध अनेक खर्च असतात ते भागवण्यासाठी त्यांना पैसे लागतात हे तुम्हाला सांगणे म्हणजे मधुचंद्राच्या रात्री पलंगावर नवरा व बायको दोघेही लागतात असे तुम्हाला सांगण्यासारखे. शरद पवार देवेंद्र फडणवीस इत्यादी अतिशय मॅच्युअर्ड नेते अशावेळी त्यांच्याकडे राज्यातले जे बहुसंख्य व्यावसायिक किंवा तत्सम स्वतःच्या विविध फायद्याची कामे जेव्हा घेऊन येतात हे असे टॉपचे नेते ज्यांना आपले राजकीय आयुष्य दीर्घकाळ टिकवायचे असते, काम घेऊन येणाऱ्यांचे अक्षरश: स्वतःचा कोणताही हिस्सा न ठेवता किंवा न मागता काम करवून देतात अशावेळी काम करवून घेणारे तद्दन स्वार्थी असले तरी त्यांच्या मनात या अशा नेत्यांविषयी आपोआप एक जागा एक स्थान निर्माण होते आणि जेव्हा केव्हा मग या नेत्यांना आर्थिक गरज त्यांचा पक्ष चालवितांना लागते हे श्रीमंत त्यांच्यासाठी हमखास धावून जातात. पैसे न खाता काम करवून देणारे नेते किंवा अधिकारी जेमतेम संख्यने असतात सत्तेला लुटून खाणे हेच त्या सभोवताली जमणार्यांचे मुख्य टार्गेट असते. यावेळी तर महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यासभोवताली जमलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात सुरुवातीपासून किंवा आजही हाच विचार आहे कि या सरकारचे काही खरे नाही हे महाआघाडी सरकार केव्हाही पडू शकते त्यामुळे लूट लो, हीच यातल्या बहुतेकांची नव्हे प्रत्येकाची भावना असल्याने या महाआघाडी भोवताली जमलेले सारे हे राज्य सामूहिक बलात्कारासारखे लुटून नेताहेत जे जवळून उघड्या डोळ्यांनी बघतांना मन अतिशय अस्वस्थ होते, या मंत्री मंडळातल्या एका बुजुर्ग मंत्र्याची व त्याच्या मानस पुत्राची फाईल जर मी उघड केली तर मला वाटते दुसऱ्या क्षणी ते गजाआड असतील पण पत्रकारितेला किंवा सार्वजनिक जीवनात वावरतांना वावरणाऱ्यांना विविध कंगोरे असतात ज्यातून आम्हाला साऱ्यांचे सारेच काही प्रसंगी तीव्र इच्छा असूनही काही भानगडी सहजासहजी उघड करणे शक्य नसते…
राज्यातल्या प्रमुख मीडियाची भूमिका डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी असते म्हणजे आमच्यातल्या प्रमुखांना वाटते कि आपल्याला जे नियमित हप्ते येतात त्याची माहिती इतर कोणालाहि नसते पण हा मीडियाचा मोठा गैरसमज आहे कारण कोणत्या मीडियाला किंवा मीडियातल्या प्रमुखांना कोण किती रकमेचे हप्ते देतो याची अतिशय बारीक माहिती पोलिसांकडे असते त्यावर एक अतिशय सिनियर आयपीएस अधिकारी मला म्हणाले कि माझ्या मनात तुमच्याविषयी हप्ते जमा करण्यात आघाडीवर असलेला अशी इमेज होती पण त्या यादीत तुमचे नाव नाही किंवा जी नावे आहेत ती वाचून मला मोठा धक्का बसला कि बाहेर ज्यांची अतिशय स्वच्छ इमेज आहे मीडियातले नेमके तेच हप्ते जमा करण्यात खूपच आघाडीवर आहेत त्यावर मी त्यांना जेव्हा त्यातल्या काहींची विशेषतः मुंबईतल्या वार्ताहरांची पत्रकारांची मीडियातल्या काहींची नावे सांगितली, माझी माहिती ऐकून त्यांना आस्चर्य वाटले पुढे मी त्यांना असेही म्हणालो जर मी हप्ते जमा करणारा पत्रकार असतो तर माझ्या वसुली यादीत पहिली पन्नास नावे पत्रकारांचीच राहिली असती ज्यांच्याकडून मला हमखास हप्ते मिळाले असते कारण तुम्हाला पत्रकारितेत दीर्घकाळ टिकायचे असेल तर हप्ते जमा करणाऱ्यांच्या दलाली करणाऱ्यांच्या यादीत आपले स्थान निर्माण करायचे नसते तर राज्यातली दिलदार स्वभावाची श्रीमंत माणसे पाठीशी उभी करायची असतात. रावडी राठोड सिनेमात पोलीस अधिकारी अक्षय कुमार गावातल्या गरिबांना सिनेमातल्या खलनायकाच्या धान्याचे गोदाम खुले करून देतो अशावेळी जो तो गावकरी त्या गोदामावर तुटून पडतो आणि खलनायकाचे सारे काही लुटून नेतो. महाआघाडी सभोवताली रावडी राठोड मधल्या गावकर्यांसारखे सारेच जमा झाले आहेत आणि राज्याची व जनतेची अवस्था हि त्या खलनायकासारखी किंवा सामूहिक बलात्कार झालेल्या मजबूर तरुणीसारखी येथे आज अलीकडे काही वर्षात विशेषतः १९८० नंतर झपाट्याने झालेली आहे जो तो सामान्य माणसाच्या खिशाला आणि सरकारी तिजोरीला लुटून नेतो आहे…
अडचणीत आपणहून सापडलेल्या अनिल देशमुख यांच्याविषयी येथे तुम्हाला सांगायचे झाल्यास माझे विदर्भ, हिंदू आणि ब्राम्हणांविषयीचे प्रेम जगजाहीर आहे या तिघांसाठी मी कायम कोणतीही रिस्क घ्यायला तयार असतो तर १९९५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा अनिल देशमुख अपक्ष आमदार म्हणून विधान सभेवर निवडून आले आणि राज्यमंत्री झाले त्यानंतर ज्यांनी माझी अनिल देशमुख यांच्याशी पहिल्यांदा ओळख करून दिली त्या नागपुरातल्या गांधींसमोर म्हणजे गिरीश गांधी यांच्या समोर मी अनिल देशमुख यांना तेही त्यावेळी हेच म्हणालो होतो कि सत्तेत विशेषतः पैसे कमावण्याच्या बाबतीत जरा दमाने घ्या आपल्या विदर्भाचे भले करण्याची तुमच्यात नक्की कुवत आहे पण त्यांनी माझे ऐकले नाही मग त्यांची जागा झोकून देणार्या राष्ट्रप्रेमी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यामुळे आज या राज्यातल्या घराघरात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी लहानांपासून तर थोरांपर्यंत कुटुंब सदस्यासारखे त्यांच्याविषयी अतोनात प्रेम आहे पण अनिल देशमुख यांनी माझे म्हणणे ध्यानात ठेवले नाही त्यामुळे त्यांना सतत सत्तेत स्थान मिळत गेले आणि प्रचंड पैसे ते मिळवत गेले मात्र या गैर नादात त्यांना लोकांच्या मनात स्थान निर्माण करता आले नाही आणि ज्या कुटुंब सदस्यांसाठी त्यांनी हे केले तेथेही ते फार खुश आहेत असे अजिबात नाही. विशेष म्हणजे ५ एप्रिल रोजी त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भात तर अजिबात नाही पण त्यांच्या स्वतःच्या नागपुरात देखील कोणतीही खळबळ माजली नाही किंवा त्यांचे कोणतेही समर्थक त्यांच्या बंगल्यासभोताली जमा न झाल्याने बंगल्याबाहेरचे पोलीस कर्मचारी आरामात खुर्चीवर रेलून बसलेले ज्याला त्याला दिसले आणि याचेच मला कायम वाईट वाटते कि अगदीच फडणवीस गडकरी सुधाकरराव नाईक दत्ता मेघे यांच्यासारखे चार दोन आजी माजी मंत्री मुख्यमंत्री सोडल्यास ज्याने त्याने फक्त स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक भले साधले त्यांच्या मनात पश्चिम महाराष्ट्रासारखे विकास पुरुष होण्याचे कधीही नव्हते ज्यातून आम्ही वर्हाडी मागे राहिलो आमचा विकास खुंटला. तुमच्याच राष्ट्र्वादीतले अन्य नेते नटून थटून येणारा स्वार्थी बहुरूपी अशी तुमची कायम पाठी थट्टा निदानालस्ती करतात ज्यातून आमचीच मान खाली जाते आणि आपला मित्र चांगला निघाला नाही त्याला विदर्भाचा शरद पवार होता आले नाही किंवा बारामती, पिंपरी चिंचवडचा साधा अजित पवार पण होता आलेले नाही याचे राहून राहून सतत वाईट वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *