हि विकेट हवी : पत्रकार हेमंत जोशी 

जीनके अपने घर सिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते किंवा स्वतः विडी ओढणारा इतरांना कसे सांगू शकतो कि धूम्रपान वाईट आहे किंवा स्वतः जीन्स घालून साधी भाजी विकत आणायला जाणारी बाई तिच्या सुनेला कशी सांगू शकेल कि नऊवारी नेसल्याशिवाय बाहेर पडू नको, एकेकाळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर पेटून उठणाऱ्या नेत्या विद्या चव्हाण स्वतःच्या सुनेच्या छळवणूक व फसवणूक प्रकरणी अडचणीत आल्या असल्याने त्यांनाच आता सारे काही समोर स्पष्ट दिसत असूनही पूजा चव्हाण प्रकरणी त्यांच्या महाआघाडीला ज्ञान पाजणे अशक्य झाले आहे पण मला आश्चर्य वाटते ते नीलम गोरे यांचे म्हणजे एखादी आक्रमक स्त्री नेता प्रसंगी केवळ सत्तेपायी कशी लाचार होऊ शकते हे विशेषतः गरीब बिचार्या पूजा प्रकरणात ज्या पद्धतीने अत्यंत नालायक मंत्र्याला वाचवले जात आहे, आणि नीलम गोरे मूग गिळून गप्प बसल्या आहेत, शी लाज वाटते आम्हाला कि तुम्हीही अशा कशा? त्यामानाने जेवढे कौतुक करावे तेवढे त्या चित्र वाघ यांचे म्हणजे ज्या आक्रमक पद्धतीने त्या पूजा चव्हाण आत्महत्या उचलून धरताहेत आणि त्वेषाने बाजू मांडताहेत, सॅल्यूट चित्रा वाघ तुम्हाला. जर यावेळी पूजा प्रकरण देखील महाआघाडीने नेहमीप्रमाणे दाबून टाकले तर फार फार मोठे राजकीय नुकसान उद्धव ठाकरे यांचे होईल त्यांच्या आजपर्यंतच्या उत्तुंग नेतृत्वाला त्याची झळ पोहोचणार आहे हे माझे वाक्य याठिकाणी लिहून ठेवा. मी तर आजपर्यंत कायम सांगत लिहीत आलोय कि उद्धव यांना कधीही अंडर एस्टीमेट करु नका कारण ते झेप घेऊन इतरांना मागे सोडून केव्हा पहिल्या स्थानावर येऊन बसतील एवढे ते प्रसंगी मुत्सद्दी व आक्रमक असतात आणि वागतात पण याच उद्धव यांचा आयुष्यात पहिल्यांदा यासाठी राग येतो अशे कि समोर वनमंत्री संजय राठोड यांचे एक नव्हे तर असंख्य पुरावे असतांना उद्धव त्यांची विकेट घेण्यात चालढकल करताहेत जे अत्यंत घृणास्पद आहे…
उद्धवजी, एक स्त्रीलंपट नेता आणि भ्रष्ट मंत्री म्हणून त्या संजय राठोड यांचे तुम्हाला एवढे पुरावे देऊनही समाधान होत नसेल तर तसे सांगा, माझ्याकडे आणखी कितीतरी त्यावर पुरावे आहेत. अत्यंत महत्वाचे म्हणजे गेली दोन ते तीन वर्षे संजय राठोड जे दोन वेगवेगळे भ्रमणध्वनी वापरत होते त्या व पूजा चव्हाण यांच्या भ्रमणध्वनींचे केवळ लोकेशन जरी पोलिसांनी शोधले तरी त्यातून अनेक धक्कादायक पुरावे बाहेर पडतील हे मी अतिशय खात्रीने सांगू शकतो विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या खाजगी सचिवांना त्यांच्या सहा वेगवेगळ्या स्वीय सहाय्य्यकांना पोलिसांनी विश्वासात घेऊन पूजा चव्हाण प्रकारणात माहिती घ्यावी पोलिसांच्या हे लक्षात येईल कि राठोड यांना त्यांचा स्टाफ कितींदा तरी हेच निक्षून सांगत असे कि पूजाला शासकीय किंवा खासगी दौऱ्यावर आपल्या कार मध्ये बसवून घेऊ नये तिची स्वतःसंगे वरात काढू नये पण पूजाच्या प्रेमात त्यावेळी आकंठ बुडालेल्या संजय राठोड यांना पूजाविषयी छेडल्यास पटकन राग येत असे अशी माझी पक्की माहिती आहे विशेष म्हणजे संजय राठोड यांची प्रेम प्रकरणे त्यावर अनेकदा त्यांचे आपल्या पत्नीशी खटके उडायचे अर्थात शोध घेणाऱ्या पोलिसांनाच सत्य शोधायचे नसल्याने सारे काही दडपण्याचा थेट पोलिसांकडून देखील सतत प्रयत्न सुरु आहे, देव करो आणि राठोड यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या मुलींच्या बाबतीत कधी असे न घडो. आज पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्या दिवसापासून ज्या अरुण राठोड व विलास चव्हाण या दोघांना दस्तुरखुद्द संजय राठोड यांनी पूजा सोबत ठेवले होते ते दोघेही एकाचवेळी गायब आहेत आणि त्या दोघांचेही प्रेत जर पुढल्या काही दिवसात तुम्हाला कुठे आढळले तर त्यात अजिबात अस्वस्थ होण्याचे कारण नाही कारण त्या दोघांबाबत म्हणे वाटचाल त्याचदृष्टीने सुरु आहे, केव्हाही त्या दोघांनी पण पूजा पद्धतीने आत्महत्या केली अशी त्यांचा खून होऊन पद्धतीची बातमी आपल्या सर्वांच्या कानावर पडू शकते, वनमंत्र्याने या राज्यात खऱ्या अर्थाने जंगल राज सुरु केले आहे असे उद्धव यांच्या यावेळी देखील घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून दिसते आहे…
वाचकांनो, आधी तुम्ही एक अत्यंत महत्वाचे काम करा म्हणजे हा लेख वाचत असतांना आत्ताच्या आत्ता जागेवर उभे राहा आणि शरद पवार यांना कौतुकाने अभिमानाने नजरेसमोर आणून त्यांना मानवंदना म्हणून गच्चीत उभे राहून सतत पाच मिनिटे टाळ्या वाजवा कारण शरद पवार यांनी संजय राठोड यांच्यामुळे पूजाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी ज्यापद्धतीने अगदी जाहीर उद्धव ठाकरे यांना खडसावले आहे त्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला ह्या टाळ्या वाजवायच्या आहेत आणि हो, शरद पवार हे असेच प्रसंगी वागायला आणि बोलायला कठोर व कर्तव्यदक्ष आहेत, आधी त्यांनी तशी करणी केलेली आहे करून दाखवलेली आहे म्हणजे पवार यांनी छगन भुजबळ, आर आर पाटील आणि अजित पवारांचे या तिघांकडून काही गंभीर चुका घडल्यानंतर असेच तडकाफडकी मंत्रिपदाचे राजीनामे घेतले आहेत आणि निर्दोषत्व सिद्ध त्यांनी केल्यानंतर याच शरद पवार यांनी त्या तिघांनाही पुन्हा मंत्रिपद बहाल केल्याचे इतिहास ताजा आहे विशेष म्हणजे शरद पवार यांनी आर आर आबांना तर पुन्हा गृह खाते देऊन मी कसा तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्ध करून पवार त्या दरम्यान कौतुकास पात्र ठरले आहेत, त्यांनी स्वतः आधी तसे केले म्हणून काल पर्वा पवारांनी अधिकारवाणीने उद्धव यांना खडसावले तरीही उद्धव ठाकरे जर संजय राठोड यांची विकेट काढायला तयार होत नसतील तर पूजा प्रकरण कदाचित कायदयाच्या कचाट्यातून अलगद बाहेर पडेल पण लोकांच्या मनावर ज्या फार मोठ्या जखमा उद्धवजी या क्षणी झालेल्या आहेत त्या तुम्हाला भरून काढणे पुढे कधीही शक्य होणार नाही तुमची यावेळची हि चूक तुम्हाला नक्की भोवणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्या नालायक मंत्र्याला राजीनामा मागा आणि पूजा चव्हाण किंवा इतर गंभीर प्रकरणी संजय राठोड यांना वठणीवर आणा. तुम्ही हे करा, उद्या एखादा उमदा धाडसी नेता त्या बंजारा समाजात तुमच्यासाठी तयार होईल आणि आमच्या विदर्भाचे नेतृत्व करेल. उद्धवजी तुम्ही हि विकेट घ्यायलाच हवी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Comments 2

 1. Avatar गामा पैलवान says:

  नमस्कार हेमंत जोशी.

  संजय राठोड म्हणताहेत की चौकशी होऊ द्या. याचा अर्थ मी निर्दोष आहे असं सुचवताहेत. याचा अर्थ अरुण राठोड व विलास चव्हाण यांना परलोकात पाठवलेलं असावं.

  पूजा चव्हाण प्रकरण आपलेच दात आणि आपलेच ओठ असं दिसतंय. शोषक आणि शोषित दोन्हीही बंजारा समाजाचे आहेत. मग उद्धव ठाकऱ्यांनी लक्ष का घालावं, असंही म्हणता येऊ शकेल. अर्थात, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे वगैरे सगळं ठीक. पण विनाकारण बंजारा मतपेढीला धक्का कशाला लावायचा, असा व्यवहारी निर्णय घेतलेला दिसतोय.

  शेवटी राज्याची म्हणून काही शिस्त राखायची की बंजारा मतपेढीशी इमान राखायचं हे उद्धव यांना ठरवायचंय. जो काही निर्णय असेल तो धडपणे घ्यावा व पूर्णत्वास न्यावा.

  माझं वैयक्तिक मत विचाराल तर संजय राठोड यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. ते काही बंजारा समाजाचे एकमेव नेता नाहीत. आज जर बंजारा समाजाचे माजी मुख्यमंत्री हाजूसिंग राठोड ( = वसंतराव नाईक ) हयात असते तर त्यांना हा प्रकार बहुधा रुचला नसता. त्यांनी संजय राठोडांना फटकारले असते. मग उद्धव कसली वाट पाहताहेत ?

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  • Every sainik is asking thr same question to Cm saheb….but our sources say resignation will be forced. sharad pawar is also very angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *