हंस दाणे वेचतोय आणि कावळा मोती खातोय : पत्रकार हेमंत जोशी 

हंस दाणे वेचतोय आणि कावळा मोती खातोय : पत्रकार हेमंत जोशी 
आमचा राग अन्य कोणावर नाही तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे कारण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवलेले आहे कि मुख्यमंत्री होणे हि उद्धव यांची सर्वात मोठी चूक ठरलेली आहे आणि काही यापद्धतीची उदाहरणे देखील दिली होती कि उद्धव यांचे मुख्यमंत्री होणे म्हणजे एखाद्या राजाने पंतप्रधान होण्यासारखे किंवा आलीया भटने दादा भुसे यांच्या प्रेमात पडण्यासारखे किंवा एकनाथ शिंदे यांनी पैशांचा मोह सोडून संत तुकारामाच्या भूमिकेत कायम शिरण्यासारखे, मुकेश अंबानी यांनी दिवाळीला बायकोसाठी दादरच्या फुटपाथवरून तेही घासाघीस करून साडी विकत घेण्यासारखे किंवा पत्रकार राजन पारकर याने पहेलवान खली याचा हात पिरगळण्याससारखे अशी काही उदाहरणे मी त्या ठिकाणी तुम्हाला दिल्याची नक्की स्मरत असेल. बदमाशांच्या विशेषतः अति भ्रष्ट मंत्र्याच्या घोळक्याचे नेतृत्व करणे म्हणजे सच्च्या शिवसैनिकांचे नेतृत्व करण्यासारखे ते सोपे नव्हते अनिल देशमुख यांच्याच सारखे बहुसंख्य पैसे खाण्याच्या बाबतीत ओवाळून टाकलेले नीच आणि हलकट नेते महा आघाडी मध्ये मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन मोकळे झाले होते त्यांना व त्यांच्या समस्त नेत्यांना अननुभवी उद्धव यांचे मुख्यमंत्री म्हणजे आजवरची त्यांना व राज्यातल्या दलालांना सरकारी अधिकाऱ्यांना चालून आलेली आयती व मोठी संधी होती आणि त्या संधीचे राज्यातल्या या समस्त बदमाषांनी बहुसंख्य भ्रष्ट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी फक्त स्वतःसाठी सोने केले ज्यातून उद्धव आपोआप बदनाम होत गेले विशेष म्हणजे सेना भाजपा युती दुभंगली तसेच शिवसेना राज्यात बऱ्यापैकी संपली आणि भाजपा संकटात सापडली केवळ चांदी झालींती शरद पवार यांची आणि काँग्रेसला तर राज्यात अचानक सत्तेमध्ये वाटा मिळणे म्हणजे एक तिकीट विकत घेतले असतांना त्याचीही मोठी लॉटरी लागण्यासारखे हे त्यांच्या बाबतीत घडले होते, अत्यंत दुर्दैवी असे हे कोरोना आणि उद्धव पर्व ज्यामुळे या राज्याची आणि उद्धव यांच्या स्वतःच्या उत्तुंग नेतृत्वाची मोठी वाट लागलेली आहे…
गृहमंत्री पदावर यापुढे टिकून राहणे अनिल देशमुख यांना अजिबात शक्य नाही कदाचित हे लिखाण तुम्ही वाचत असतांनाही अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री म्हणून मुक्त झाले असतील आणि तसेही त्यांना या पदावर काहीही झाले तरी ठेवायचे नाही हे शरद पवार यांनी स्वतःच ठरविलेले आहे फक्त पवारांना असे वाटते कि देशमुख यांचे केवळ खाते बदल करावेत आणि मंत्रिपद त्यांचे कायम असावे कायम टिकावे पण देशमुख यांच्या विरुद्ध जमा झालेले असंख्य पुरावे तसेच मीडिया व भाजपा दोघांनी देशमुख यांच्या काळ्या कृत्यांना पुरून उरणे आणि महत्वाचे म्हणजे राज्यातल्या जनतेला त्यांचा व पवारांचा मनस्वी मनापासून मनातून आलेला असलेला राग, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे केवळ देशमुख यांच्या काळ्या कृत्यांमुळे पोलिसांची डागाळलेली प्रतिमा त्यातुंबट्यांच्या मनात असलेला देशमुख यांच्याविषयीच्या राग, त्यातून जरी पवारांच्या मनात असले आले तरी अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते कायम ठेवणे फार दूरचे पण माझा अनुभव आणि माहिती सांगते कि अनिल देशमुख यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी नक्की तय आहे फक्त जर देशमुख यांचे नशीब बलवत्तर असेल तरच ते गजाआड जाणार नाहीत अन्यथा अनिलबाबू यांना शरद पवार यांनी वाचविण्याचा प्रयत्न न केल्यास त्यांचाही अगदी सहज छगन भुजबळ होईल अर्थात त्याकाळी छगन भुजबळ यांचे वाढलेले मोठे महत्व त्यातून त्यांना तुरुंगात जावे लागले जे पवारांच्या मनासारखे झाले किंबहुना तेच त्यांच्या मनात होते पण येथे अनिल देशमुख म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारखे प्रभावी व लोकमान्य ठरलेले नेते नाहीत ते त्यामानाने अगदीच लिम्बुतिंबू आहेत त्यांचे त्या काटोल पलीकडे फारसे अस्तित्व किंवा महत्व नेते म्हणून नसल्याने ते तुरुंगात जाऊन पक्षाची व पवारांची बदनामी होऊ नये हेच आज पवार यांना नक्की वाटत असल्याने देशमुख तुरुंगात जाऊ नयेत त्यास्तव शरद पवार आपली प्रतिष्ठा नक्की पणाला लावतील आणि जरी त्यांचे गृहमंत्री पद वाचविता आले नाही तरी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमा केलेली अमाप समाप संपत्ती व अनिल देशमुख आणित्यांच्या सभोवतालचे रवी व्हटकर संजीव पलांडे राजेंद्र अहिवार योगेश कोठेकर चिंतन थोरात सरकारजमा होणार नाहीत गजाआड जाणार नाहीत तसे संकट टाळण्याचेच पवार यांचे यापुढे प्रयत्न असतील…
जसा संजीव पलांडे किंवा अन्य काही कायम मंत्रालयाजवळील पंच तारांकित हॉटेल मध्ये राहून किंवा बसून गृहखात्याचे हिसाब ‘किताब सांभाळायचे तसे काम नागपुरात गेली अनेक वर्षे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक व उजवा हात योगेश कोठेकर नामक भामटा सांभाळत आला आहे आणि हाच योगेश कोठेकर गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून महिन्याकाठी नागपूर परिसरात कोट्यवधी रुपये जमा करीत असल्याचा आरोप नागपुरातील एका स्थानिक वाहिनीने केला आहे अर्थात यापुढे दरदिवशी अशी कितीतरी पैशांची व हेराफ़ेरीची प्रकरणे देशमुख यांची बाहेर येणार असल्याने त्यांनी त्यावर उत्तरे देण्याची मानसिकता बनवावी अन्यथा होणारे आरोप खरे आहेत असा निकर्ष त्यातून नक्की निघेल. महाराष्ट्र न्यूज ७ या वाहिनेने योगेश कोठेकर हे देशमुख यांच्यासाठी कोणत्या पद्धतीने पैसे जमा करायचे त्यावर नेमके चित्र या वाहिनीने रेखाटले आहे. अर्थात असे कितीतरी गैरप्रकार ज्यातून हे महाशय आपल्याला गृहमंत्री होते लाभले याची सर्वांना लाज वाटावी. बघूया, हि तर सुरुवात आहे. वास्तविक ज्या खात्यातला खालपासून वरपर्यंत ८० टक्के कर्मचारी व अधिकारी वर्ग आपल्या विरोधात आहे आपल्यावर नाराज आणि आपल्या भ्रष्ट उथळ नीच कामगिरीवर नाराज आहे हे लक्षात आल्यानंतर केव्हाच अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हायला हवे होते पण लालसेने त्यांना घेरलेले असल्याने त्यांनी ते अजिबात मनावर घेतले नाही अनेकांनी त्यांना हे सांगून देखील त्यांनी राजीनामा देण्याचे धुडकावले, आणि आज अवस्था अशी आहे कि अनिलबाबू आत बाहेर कसे किंवा त्यांची मालमत्ता आणि इतर बर्या वाईट सवयी किंवा व्यसने याविषयी पुरावे व माहिती राज्यातल्या काही महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे जी माहिती १०० टक्के अनिल देशमुख यांना अडचणीत नक्की आणणार आहे. खरा माज संजीव पलांडे याला आहे किंवा होता म्हणे, म्हणजे तो स्वतःच राज्याचा गृहमंत्री असल्याच्या अविर्भावात भेटणाऱ्या प्रत्येकाशी वागत बोलत असे. हाच संजीव पलांडे आता या राज्यातल्या नवख्या श्रीमंत अधिकाऱ्यांच्या रांगेत या वाममार्गाने पोहोचल्याची देखील माझी माहिती आहे. या मंडळींचा वक्त चांगला होता किंवा आहे पण त्यांचा अंत नक्की वाईट होणार आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *