मेड फॉर मीडिया मॅड फॉर मीडिया : पत्रकार हेमंत जोशी 

इतरांच्या बातम्या चोरायचा किंवा बातम्या इकडून तिकडून उचलायच्या आपल्या नावाने छापून मागची दुकानदारी पुढे रेटायची, इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्रात काम करणाऱ्या अनेकांचे हे उद्योग असतात अशांना फारतर तोंडावर केवळ वाहिनी किंवा वृत्तपत्राच्या भीतीपोटी संबंधित भलेही स्तुती करून मोकळे होत असतात पण अशांच्या पाठी त्यांचे फारसे चांगले नाव काढले जात नसते किंबहुना काही मंत्री काही नेते आपल्यातून लवकर वर जावेत अनेकांना वाटत असते तेच या अशा मीडियात केवळ पैशांसाठी काम करणाऱ्या बदमाश मंडळींबद्दल देखील अनेकदा अनेकांना वाटत असते वाटत राहते किंवा हे असले रंडी छाप मीडियातले केव्हाचे एकदा कार्यमुक्त केले जातात किंवा निवृत्त होतात त्याकडे देखील लोकांचा डोळा असतो. अलीकडे म्हणजे बजेट अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वनमंत्री संजय राठोड यांचा एकदाचा राजीनामा झाल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलेच असेल कि ज्यांना या राजीनाम्याची नेमकी वस्तुस्थिती माहित होती त्यांनी केवळ माझे अगदी मनापासून अभिनंदन केले जे त्यांना कदाचित नवीन होते माझ्यादृष्टीने अजिबात नवीन नव्हते कारण या अशा पद्धतीच्या मोहीम मी स्वतःला बाजूला ठेवून अनेकदा राबवत असतो कारण पत्रकारितेतील माझ्या लिखाणाच्या मर्यादा मला ठाऊक असल्याने अतिशय खुबीने मी आजवर अनेक अशाप्रकारची गंभीर प्रकरणे कायम इतर मीडिया पर्यंत पोहचवत आलो आहे किंबहुना धनंजय मुंडे प्रकरण देखील मी याच पद्धतीने हाताळले होते जे धनंजय यांच्या स्वतःच्या लक्षात आले होते म्हणून त्यांनी माझ्या हातून पुन्हा अशी चूक घडणार नाही हा निरोप मला त्यांच्या अतिशय विश्वासू असलेल्या दूतामार्फत पाठवला होता आणि धनंजय यांचे शब्द त्यावेळी मला आश्वासक वाटल्यानेच पुढे शर्मा भगिनी हा विषय मी बाजूला ठेवला होता…
ज्या रात्री पूजा चव्हाण या विशीतल्या तरुणीने केवळ संजय राठोड यांनाच कंटाळून आत्महत्या केली त्या रात्रीपासूनच मी कमालीचा अस्वस्थ होतो जसा मी अस्वस्थ होतो तसे वन खात्यातले अनेक महत्वाचे अधिकारी कर्मचारी विशेष म्हणजे दस्तुरखुद्द संजय राठोड यांचे काही महत्वाचे आजी माजी व्यक्तिगत कर्मचारी अधिकारी माझ्यासारखेच पूजाच्या जाण्याने मनातून मनापासून अतिशय दुखावले होते अत्यंत महत्वाचे म्हणजे पूजाचे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी चव्हाण आणि राठोड या ज्या दोन युवकांना सतत दोन महिने तिच्या पाळतीवर आणि सोबतीने ठेवण्यात आले त्यांच्यासमोरच जेव्हा पूजाने प्राण सोडला त्याक्षणी त्यादोघांनी एकमेकांशी नेमकी बातचीत करून नेमके पूजा प्रकरण लोकांसमोर आणि मीडिया पर्यंत पोहिचविण्याचे फार मोठे आणि फार महत्वाचे काम केले कारण जर त्यांनी पूजा चव्हाण आणि संजय राठोड या दोघातले परस्पर संबंध भीतीपोटी किंवा कदाचित नोकरी व पैशांसाठी उघड केले नसते तर त्या दोघांनाच पूजा आत्महत्या प्रकरणी आणखी मोठी किंवा फार मोठी किंमत मोजावी लागली असती आणि हा डाव त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी त्यांच्याकडचे अत्यंत महत्वाचे पुरावे विशेषतः माझ्यासारख्या मीडियाकडे त्यांच्या ओळखीच्या काही नेत्यांकडे आणि त्या तिघांच्या गावातल्या काही महत्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तींकडे व त्यांच्या काही जवळच्या मित्रांकडे पोहोचते केले ज्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उजेडात आले ज्यात काही नेत्यांनी प्रत्यक्ष काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष व मीडियाने अर्थात मोठी महत्वाची भूमिका पार पाडली अन्यथा आजही पूजाचे आईवडील अजिबात तोंड उघडायला तयार नसतांना तसे संजय राठोड यांचा राजीनामा घेणे नक्की अवघड गेले असते विशेष म्हणजे लोकसत्ता दैनिकात संजय राठोड विषयी छापून आलेला अग्रलेख आणि त्याच दिवशी याच लोकसत्तेमधून राखी चव्हाण यांनी वनमंत्र्यांचे नेमके उद्योग मांडले आणि येथेच उद्धव ठाकरे यांच्या मनातून संजय राठोड त्यादिवसापासून उतरले या तिन्ही बातम्यांचा प्रसंगांचा त्यांनी आधी बारकाईने अभ्यास केला आणि उद्धव यांच्या लक्षात आले कि संजय राठोड कसे डेंजरस लबाड घबाड व्यक्तिमत्व आहे ते आणि मी तर हे तुम्हाला अनेकदा सांगितलेले आहेच कि एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वतःशी अमुक एक खूणगाठ बांधली कि ते त्यानंतर कोणाचेही ऐकून घेत नाहीत परिणाम कोणतेही समोर आलेत तरी म्हणून ते ग्रेट आहेत मी कायम सांगत आलोय…
सतत १५ ते २० दिवस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण विविध माध्यमातून लावून धरल्यानंतर संजय राठोड एकटे पडले एकटे पडत गेले आणि अखेर त्यांना राजीनामा देणे भाग पडले पण या पंधरा दिवसात कधी वृत्तपत्रे तर कधी वाहिन्या तर कधी विविध नेते मध्येच बाजू मांडता मांडता कमी पडत असल्याचे लुळे पडत असल्याचे लक्षात यायचे मग संबंधित पुन्हा त्यांच्याकडले वेगवेगळे बहुसंख्य पुरावे पोहोचविण्याचे महत्वाची जबाबदारी अत्यंत गुप्त पद्धतीने मोठ्या खुबीने पार पाडायचे विशेष म्हणजे इतर नेते या प्रकरणी फारसे प्रभावी ठरत नव्हते अपवाद आमदार अतुल भातखळकर यांचा मग हे देखील जेव्हा भाजपा नेत्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आले त्यांनी त्यानंतर त्यांच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांना पुढे आणले समोर केले आणि येथे वातावरण झपाट्याने बदलले, चित्रा वाघ यांनी ज्यापद्धतीने पूजा आत्महत्या प्रकरणावर सरकारला धारेवर धरले, मित्रहो, पूजा चव्हाण प्रकरणाची त्यातून खरी व मोठी किंमत संजय राठोड यांना राजीनामा देऊन मोजावी लागली. अत्यंत महत्वाचे म्हणजे अमुक एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला कि ज्या नीलम गोर्हे विद्या चव्हाण यांच्या लढ्याला अशावेळी महत्व प्राप्त होत असे त्या साऱ्याच्या सार्या महिला नेत्या एखाद्या जादूगारासारख्या गुप्त झाल्या आणि भाजपा वर्तुळात आक्रमक महिला नेत्यांमध्ये चित्रा वाघ धडाकेबाज नेत्या म्हणून जनतेच्या मनात यापुढे या अशा अचानक कोरल्या गेल्या ज्यावर त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी. विशेष म्हणजे शिवसेनेतला जो मोठा नाराज गट भाजपाच्या संपर्कात आहे त्यातले एक संजय राठोड आहेत अशी बातमी कानावर पडल्याने, तुम्ही पण या गंभीर प्रकरणी हात झटणार का, असा थेट सवालच मी देवेंद्र फडणवीस यांना केल्यानंतर ते एवढेच म्हणाले कि याप्रकरणी मी देखील खूपच दुख्खी आहे आणि संजय राठोड यांना त्यांच्या या केलेल्या दुष्कृत्याची नक्की मोठी किंमत मोजावी लागेल त्यासाठी आमचा त्यांच्या विरोधात कोणताही लढा अजिबात कमी पडणार नाही आणि नेमके त्यांनी तसेच घडवून आणले अर्थात संजय राठोड व पूजा चव्हाण प्रकरणाचा हा केवळ ट्रेलर आहे, पुरावे आणखीही आहेत आणि खूप गंभीर आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Comments 1

 1. नमस्कार हेमंत जोशी.

  या लेखावरनं दिसतंय की अरुण राठोड व संजय राठोड यांच्या संभाषणाच्या मुद्राफिती ( = क्लिप्स ) अरुण राठोड व/वा विलास चव्हाण या दुक्कलीनेच समाजमाध्यमांकडे उघड केल्या असाव्यात.

  आता यातनं एक प्रश्न उद्भवतो. या फिती पूजाच्या आत्महत्येच्या आधी मुद्रित केलेल्या आहेत. मग आमदार संजय राठोडांनी अतिरिक्त प्रयत्न करून ही आत्महत्या का रोखली नाही?

  की पूजाने आत्महत्या केली नसून तिचा खून झालाय? आणि संजय राठोडांनी खून दाबून टाकण्यासाठी ‘पूजा आत्महत्या करणार’ अशी खोटी नाटकं करून ती फितींवर नोंदवून दुक्कलीद्वारे बाहेर उघड केली? तिसऱ्या की चौथ्या मजल्यावरून पडून पूजाचा मृत्यू होण्याची शक्यता किती कमी वा जास्त असते? पूजाच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण काय नोंदवलं आहे?

  वर दिसतंय त्यापेक्षा आतमध्ये बरंच काहीतरी जास्त आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *