मी बघितलेल्या स्त्रिया : पत्रकार हेमंत जोशी 

मी बघितलेल्या स्त्रिया : पत्रकार हेमंत जोशी 
१ एप्रिल माझ्या आईची सुशीला जोशी यांची पुण्यतिथी, आई जाऊन कितीतरी दशके उलटलीत, ती गेली तेव्हा मी जेमतेम १२ वर्षांचा होतो त्यामुळे आता ती नीटशी आठवत देखील नाही कारण त्याआधीही ती काही वर्षे आजारी आणि अनेक बाळंतपणांमुळे अनेकदा खाटेवरच असायची त्यामुळे ज्याला आपण भरघोस सहवास म्हणावा तसा तिचा किंवा आई या नात्याचा सहवास अगदी लग्नानंतरही माझ्या फारसा नशिबात नव्हता कारण आपण बायकोतही जर ती त्या उंचीची विचारांची असेल तर आई हे नाते नक्की बघत असतो किंवा मी तर म्हणेन तुम्हाला आई नसेल तर पत्नीमध्ये ते बघावे अर्थात दारू घुटका सिगारेट्स इत्यादी व्यसनाधीन पुरुषांनी दरवेळी त्यांच्या बायकोवर केलेला तो एक बलात्कार असतो असे माझे ठाम मत आहे, सर्वाधिक दुर्दैवी स्त्री कोणती तर तिला स्वतःला हि व्यसने नसतांना या अशा व्यसनाधीन नवऱ्यांच्या बाहुपाशात जाऊन बलात्कार सहन करणे. माझ्या आयुष्यात विविध नात्यातून ज्या अत्यंत तल्लख मेहनती बुद्धिमान एकपाठी सर्वगुण संपन्न दूरदृष्टी असलेल्या ज्या काय चार दोन स्त्रिया मी अगदी जवळून बघितलेल्या असतील आजही इतक्या वर्षानंतर आई सुशीला या साऱ्यांच्या कितीतरी पुढे होती असे आजही माझे मत आहे, दुर्दैवाने ती अधिक जंगली नाही जेमतेम ३५-३६ वय असतांना ती देवाघरी निघून गेली पण तिच्या बुद्धिमत्तेचा देशप्रेमाचा कणखर वृत्तीचा वारसा आम्ही बहीण भावंडांनी काही प्रमाणात नक्की पुढे नेण्याचा प्रयत्न केला, अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड वाचन तसेच हलाखीतही शिक्षण घेण्याची तिची जिद्द, अनुकरण करावे अशी ती स्त्री होती, आजही इतक्या वर्षानंतर तिची नक्की सतत आठवण येते, आठवण मनाला आजही अस्वस्थ करते…
अर्थात माझी आई तेवढी हुशार होती आणि इतरांच्या आया जेमतेम बुद्धीच्या असे नक्की नाही नसते, ज्याला त्याला प्रत्येकालाच आपली आई हुशार आणि श्रेष्ठ असते. माझा एक अतिशय जवळचा मित्र आहे, त्याची आई पण त्याच्या अगदी लहानपणी देवाघरी गेलेली त्यानंतर तो खूप शिकला पुढे गेला पण त्याने अद्याप वयाची पन्नाशी गाठूनही लग्न केले नाही कारण तो देखील त्याची डॉक्टर असलेली प्रेमळ देखणी बुद्धिमान आई उपवर मुलींमध्ये शोधत होता त्यांच्यात त्याला ती आई दिसली नाही म्हणून त्याने अद्याप लग्न केलेले नाही. मला असे बहुतेक घरातून कायम आढळते कि बहुतेकांचा संसार सुखाचा नसतो, आम्ही पूरूष नालायक असतो असे आपण समजूया पण बायका कधी आत्मचिंतन करतात कि नाही मला अलीकडे शंका येऊ लागलेली आहे, आपला नवरा आपल्यातल्या ज्या दुर्गुणातून आपल्यापासून दूर जातो आहे हे लक्षात आल्यानंतर देखील त्या दुर्गुणांना फाटा न देता उलट अशा दुर्गुणांची जोपासना किंवा वाढ करण्यात या बायकांना एकप्रकारे असुरी आनंद का मिळतो, मला न उलगडलेले हे कोडे आहे. माझ्या अशा अनेक किंवा कितीतरी मैत्रिणी आहेत ज्यांचे वय ४५ ते ६० या दरम्यान असतांना त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले असल्याने त्या कमालीच्या अस्वस्थ यासाठी आहेत कि पोटची मुले मुली वयात आलेली आहेत त्यामुळे या अशा स्त्रियांना एखादे प्रेम प्रकरण उभे करायला कसेसेच वाटते पण त्याचवेळी त्यांना स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास नवर्याच्या कुशीत झोपण्याची आणि हो, अधून मधून त्यांना सेक्स पण हवा आहे, मात्र अर्धवट विचारांचा समाज आणी पोटची मुले, माझे त्यावर स्पष्ट मत असे कि त्या आपले उर्वरित आयुष्य अक्षरश: कुढत कुढत जगतात आणि घरातले सारे झोपले कि स्वतःच्या नशिबाला दोष देत डोळ्यातून अश्रू काढतात, ना मुलांना त्यांची दया येते ना हा समाज त्यांचा विचार करतो. सेक्स भावना म्हणाल तर त्यांच्याकडे किंवा या अशा स्त्री व पुरुषांकडे मैथुन प्रक्रियेपलीकडे काहीही हाती उरलेले नसते किंबहुना असे फार कमी भारतीय पुरुष असतात कि जे शरीर सुख आयुष्यातून निघून गेल्यानंतर वेश्या किंवा तत्सम पर्याय निवडतात फारतर सोशल साईट्स च्या माध्यमातून काही स्त्री पुरुष आपली फसवणूक करून घेतात…
सभोवतीलाची जोडपी आयुष्याचा आनंद उपभोगत असतांना आपल्या नशिबी वैधव्य आले हि धड वृद्धत्वाकडे न झुकलेल्या स्त्रियांची खंत त्यांना मनातून अतिशय अस्वस्थ करणारी असते. संसाराची जबाबदारी मुले मोठी झाल्याने संपली असे वाटत असतांना ज्यांच्या आयुष्यातून पती देवाघरी निघून जातो त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी हे जिवंतपणी पाप फेडण्याचे जणू नाटक देव करतो आहे कि काय हिंदू समाजातल्या हा प्रसंग ओढवलेल्या बहुतेक सुसंस्कृत स्त्री तसेच पुरुषांना पाप फेडणे सुरु आहे असे सतत वाटत असते, मुली सासरी निघून गेलेल्या आणि मुले कामानिमित्ते बाहेर अशांना त्यांचे घर व आयुष्य खायला उठत असते असे माझे मत व ऐकलेले अनुभव आहेत आणि त्यातून या अशा स्त्री व पुरुषांना बाहेर काढणे हे इतर कुटुंब सदस्यांचे महत्वाचे असे काम आहे, त्यांना समजून घेणे व उर्वरित आयुष्याचा तुम्ही पण मनस्वी आनंद घ्या असे ज्यांची मुले व मुली या एकट्या माय बापांना मनापासून सांगतील खऱ्या अर्थाने आपण पाश्चिमात्य विचारांच्या जवळ गेलो म्हणता येईल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *