पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

अराजकतेकडे वाटचाल असे आज आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे चित्र आहे, सुसंस्कृत राज्य मागे पडले आणि विकृत महाराष्ट्र झपाट्याने पुढे आले, असे आजचे चित्र आहे. गंमती जमती पूर्वीही घडायच्या पण त्या सहन केल्या जाव्या अशा घडायच्या म्हणजे मंत्री असतांना जवाहरलाल दर्डा यांनीही दोन दोन विवाह करून दोन्हीकडे मुले मुली जन्माला घातले होते पण त्यांनी त्या दोघींमध्ये व कुटुंबामध्ये एकी जपली होती त्यामुळे त्यांच्या या दोन बायकांचा दादला या प्रकाराकडे कधीही जनतेने विकृत फाजील बाईलवेडा व्यक्ती म्हणून बघितले नाही किंवा वयाच्या सत्तरीनंतर म्हणजे मृत्यूच्या केवळ काही वर्षे आधी त्यावेळेचे अर्थमंत्री रामराव आदिक यांनी संसारातल्या साऱ्या जबाबदाऱ्या आटोपल्यानंतर माझ्या अगदी घराजवळ डिस्पेन्सरी असलेल्या हृदयरोग तद्न्य डॉ. लेखा पाठक यांच्याशी पहिल्या पत्नीला म्हणजे जांबुवंतराव धोटे यांच्या सासूला न सोडता दुसरे लग्न केले होते, आजही देखण्या लेखाताई डॉ. लेखा आदिक पाठक असे नाव लावतात अर्थात राजकारणातले असे हजारो किस्से मला पुराव्यांसहित माहित आहेत म्हणजे त्यावर लिहायचे झाल्यास एक अख्खी कादंबरी निघावी. जेव्हा माझ्याकडे पूजा लहू चव्हाण प्रकरण आले ज्यात विदर्भातल्या एका मंत्र्यांचे नाव जोडल्या जात होते तेव्हा संजय राठोड सोडून इतर साऱ्या मंत्र्यांची नावे एका झटक्यात माझ्या नजरेसमोर तरळली कारण इतर बहुतेकांचे वागणे देखील थोड्या अधिक प्रमाणात तसेच आहे म्हणजे एखादा अपवाद सोडल्यास  त्यांच्यातले सारेच या दुसऱ्या प्रकारातले आहेत पण सारी नावे मागे पडली आणि पूजा चव्हाण यांनी केवळ संजय राठोड यांच्यामुळेच आत्महत्या केली, ऐकून संजय राठोड यांच्याविषयी यासाठी घृणा वाटली कि त्यांच्या बंजारा समाजाची त्यांच्या मुलीच्या वयाची पूजा जेव्हा आपल्या नेत्याकडून फसविल्या लुटल्या गेली ती सत्यकथा  फार विदारक आहे…

शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याशी आमच्या एका जुन्या मित्राच्या म्हणजे मोहन चव्हाण यांच्या बहिणीचा विवाह झाला होता पण मित्राची बहीण अकाली गेली त्यानंतर संजय यांनी दुसरे लग्न केले आणि आता हे तिसरे चौथे का पाचवे संबंध लहानग्या पूजाशी म्हणजे ती केवळ  १८-१९ वर्षांची असतांना ठेवले पुढे वाईट परिणाम पूजा चव्हाण या बंजारा उभरत्या नेतृत्वाला आत्महत्या करावी लागली. पूजाचा तर हकनाक बळी गेला पण अशा आणखी काही पूजा त्यांच्या आयुष्यात आल्यात का त्यावर माझी उद्धवजींना हात जोडून विनंती कि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संजय यांच्या एकेकाळी अतिशय जवळच्या आणि आता खूप खूप दुरावलेल्या व दुखावलेल्या खासदार भावना गवळी यांना बोलावून घ्यावे त्यांना विश्वासात घेऊन मग बोलते करावे, अनेक किस्से उजेडात येऊन जर या राज्याचे उद्धव यांना आणखी अधःपतन होऊ द्यायचे नसेल तर ते पुढल्या क्षणी संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन मोकळे होतील, मोठी दहशत म्हणून भावना सहित सारे चिडीचूप आहेत अगदी पूजा चव्हाण हिचे कुटुंबीय देखील पण उद्धवजी आणि घाबरणे हे गणित तसे टोकाचे असल्याने निर्भय उद्धव यांनी आधीच्या अनेक प्रकरणात अनेकांना मुख्यमंत्री म्हणून वाचविले असले तरी येथे हयगय अजिबात करू नये आणि हो, थेट शरद पवारांनी देखील उद्धव यांना कठोर निर्णय घेण्यास यावेळी भाग पाडावे. कारण पूजा चव्हाण दोन महिन्यांची गर्भार होती त्यातून तिने आत्महत्या केली जेवढे दिसते तेवढे हे सोपे प्रकरण नाही कारण वयाच्या केवळ १८-१९ वर्षांपासून तिचा हा असा फार मोठा शारीरिक खेळ चालला होता आणि हा खेळ कोणता विकृत तिच्याशी खेळत होता, वाचकांना आता येथे थेट नाव सांगण्याची मला गरज वाटत नाही फक्त रडू येते…
भष्टाचार करणारे किंवा ड्रग्स च्या आहारी जाणारे किंवा त्या व्यवसायात अडकलेले किंवा जेथे स्त्रिया अजिबात सुरक्षित नाहीत असे हे मंत्रिमंडळ हा शिक्का जर या मंत्रिमंडळावर बसला म्हणजे काहीही केले व कसेही वागले तरी काहीही होत नाही हि भावना उद्धवजी व शरदराव जर नेत्यांमध्ये विशेषतः मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली तर तुमचे माझे उद्धव किंवा शरद पवार यांचे आयुष्य फार थोडे उरले आहे पण जेव्हा केव्हा तुमच्या घरातले सत्तेत नसतील तेव्हा त्याचा खूप मोठा त्रास भविष्यात आपल्याही मागे सोडलेल्या नातेवाईकांना नक्की होणार आहे. काहीही केले तरी चालते, हि भावना राज्यकर्त्यांच्या मनातून काढून टाकणे वरून कायद्याचा धाक निर्माण करणे हे आता तुमचे काम आहे आणि राज्यातल्या पोलिसांना ते आव्हान आहे. पर्वा जेव्हा एका पोलिसाच्या दोन मुलांना एका माजलेल्या उद्योगपतीने आपल्या मर्सिडीज खाली चिरडून ठार मारले म्हणजे धुंदीत जगणे जेव्हा थेट पोलिसाच्याच अंगाशी आले तेव्हा त्यांना नक्की समजले असेल कि गुन्हेगारी प्रवृत्तीला कसे तेथल्या तेथे ठेचायचे असते. आम्ही मीडिया ने उघड केलेल्या पुराव्यांनी वास्तविक उद्धव ठाकरे आणि पोलिसांचे काम खूप सोपे करून ठेवलेले आहे म्हणजे अरुण राठोड याला देखील गायब करण्यापूर्वी किंवा कदाचित त्याचाही खून होण्यापूर्वी म्हणजे पूजा याच्या दोन्हीही रूम मेट्स यांना मोहन चव्हाण व अरुण राठोड यांना लगेच ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्या तोंडून सत्य वदवून घ्यावे तसेच पुण्यातली सदनिका पूजा चव्हाण यांना कोणी व का उपलब्ध करून दिलेली होती व तिचा गर्भपात यवतमाळ मध्ये कोणी व कुठे करविला, तसेच भ्रमणध्वनीचे विविध पुरावे उघड केले, एवढे सत्य जरी प्रामाणिकपणे पोलिसांनी शोधून काढले तरी संजय राठोड यांना थेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, त्यांना गजाआड नक्की व्हावे लागेल, तसे जर घडले तर भावनाताई, फसविल्या लुटल्या लुबाडल्या गेलेल्या अनेकांना नक्की नक्की न्याय मिळणार आहे. भावनाताई आपण एक सेनेच्या धाडसी नेत्या, आपण देखील आपणहून पुढाकार घ्यावा आणि नेमके सत्य उद्धवजींसमोर कथन करावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *