पूजा अरुण, पूजा लहू कि पूजा संजय !

वाईट नेत्यांना बदनाम मंत्र्यांना महा बदमाश सरकारी अधिकाऱ्यांना वाईटातून वाचवण्याची जणू महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली आहे म्हणजे पवारांनी नवाब मलिक यांना वाचवले कि उद्धव यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवून मोकळे व्हायचे, शरद पवारांनी धनंजय मुंडे निर्दोष आहेत म्हणून त्यांना पाठीशी घातले रे घातले कि उद्धव यांनी लगेच संजय राठोड यांना वाचवून मोकळे व्हायचे, सत्ता टिकवण्याच्या नादात तुमचे हे चालू द्या पण एक दिवस कानाला चावा घेणाऱ्या आई व मुलाच्या कथेसारखे या राज्यात नक्की घडणार आहे. चोरी करतांना पकडल्या गेल्यानंतर न्यायधीश जेव्हा एका तरुण चोराला शिक्षा ठोठावतात तेव्हा तो तरुण आईला न्यायालयात बोलावून तिच्या कानाला थेट न्यायाधीशांसमोर कडकडून चावा घेतो आणि म्हणतो जेव्हा मी पहिल्यांदा चोरी केल्यानंतर चोरीचा ऐवज घरी घेऊन आलो तेव्हाच जर आईने मला लाडाने जवळ न घेता थोबाडले असते तर आज माझ्यावर अशी तुरुंगात जाण्याची कधीही वेळ आली नसती, नेमके हेच मला महाआघाडीच्या घटक पक्षांना सांगायचे आहे कि राज्यात मोठ्या प्रमाणात जे काय वाईट घडते आहे थेट मंत्री व अधिकाऱ्यांच्या हातून गंभीर स्वरूपाच्या चुका होताहेत त्यांना जर आज तुम्ही पाठीशी घातले तर उद्या तुमच्याच पुढल्या पिढीतले पीडित तरुण व तरुणी तुमच्या कानाचा चावा घेऊन मोकळे होणार आहेत. जेव्हा या राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका बड्या धाडसी नेत्याला मी ओरडून ओरडून जिवाच्या आकांताने सांगत होतो कि चोवीस तास यापद्धतीने पैशांच्या मागे आणि सुंदर बायको व मुले सोडून बाईच्या नादी लागू नकोस, आज तुझा वक्त चांगला आहे, एवढा मोठा होशील कि थेट यशवंतराव चव्हाणांच्या रांगेत तुला स्थान मिळेल त्यावेळी त्याने माझे ऐकले नाही, सरकारी तिजोरीवर डाके टाकत केवळ स्वतःची तो श्रीमंती वाढवत गेला आणि नेमके तेच घडले त्याचा फ्रस्ट्रेट मुलगा ड्रग्सच्या आहारी गेला थोडक्यात ज्यांच्या भल्यासाठी या नेत्याने दरोडे टाकले तोच मुलगा त्याच्या हाताबाहेर गेला थोडक्यात उद्या हाच मुलगा बापाच्या कानाला कडकडून चावा घेऊन हेच म्हणेल, बाबा तुम्ही आम्हाला घडवायच्या काळात नको त्या नादाला लागलात म्हणून आज मला या सवयी लागल्या अर्थात अशी एक ना अनेक उदाहरणे तुमच्या आमच्या प्रत्येक वाईट माणसाच्या घरातली घराण्यातली…

आजपर्यंत तिचे नाव पूजा लहू चव्हाण आहे हेच आम्हा सर्वांना माहित होते पण दूरवर कुठेतरी वनमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ मध्ये पूजा जेव्हा उपचारासाठी नामवंत इस्पितळात दाखल होते झाली तेव्हा असे वाटले होते कि कदाचित तिचे नाव निदान येथे तरी पूजा संजय लिहिले जाईल पण तेही घडत नाही आणि संजय यांच्या जाळ्यात अडकलेल्या बिचार्या इनोसंट मजबूर गरीब सामान्य अरुण राठोड याचे नाव पूजाच्या नावापुढे लावल्या गेले म्हणजे पूजा जर अन्य कोणत्याही आजारावर उपचार करून घेण्यासाठी यवतमाळच्या इस्पितळात दाखल झाली असती तर तिने आपल्या नावापुढे केवळ बापाचे नाव म्हणजे लहू चव्हाण असे लिहिले असते पण एखाद्या सिनेमातल्या कथेसारखे अंगावर शहारे आणणारे येथे घडले म्हणजे तिच्या पोटात असलेले पाप या राज्यातल्या एक गुंडछाप नेत्याचे कि मंत्र्यांचे आणि गर्भपात घडवून आणतांना नवऱ्याचे नाव पुढे जोडणे आवश्यक असल्याने तिच्या नावापुढे चक्क अरुण राठोड या गरजू व जाळ्यात ओढल्या गेलेल्या तरुणाचे नाव लावण्यात आले आणि तिचा तेथे म्हणजे संजय राठोड यांच्या यवतमाळात गर्भपात करण्यात आला घरीही जर जेंटलमन आणि प्रसंगी अतिशय कठोर निर्णय घेण्यात माहीर असलेले मुख्यमंत्री आपल्या या बदमाश मंत्र्याला पाठीशी घालत असतील तर आमचे कडक उद्धव असे कसे वागताहेत बघून सर्वांना जनतेला आश्चर्याचा फार मोठा धक्का बसेल ज्याचे दूरगामी मोठे दुष्परिणाम उद्धवजी तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेला नक्की भोगावे लागतील म्हणून हीच ती अतिशय  योग्य वेळ, उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारून मोकळे व्हावे त्यातून चांगला संदेश जनतेसमोर जाईल आणि कठोर निर्णय घेतांना आमच्या मुख्यमंत्र्यांचा रणांगणावरील अर्जुन होत नाही हेच नेमके सिद्ध होऊन जनता समाधानाचा आधी सुस्कारा सोडेल नंतर उद्धवजी हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल…

हा लेख लिहीत असेपर्यंत अरुण राठोड गायब आहे ज्याने पूजाचा गर्भात घडवून आणला केला तो डॉक्टर देखील गायब आहे किंवा पूजा सोबत पुण्यातल्या सदनिकेत अरुण राठोड यांच्या संगतीने जो विलास चव्हाण नावाचा आणखी तिचा एक नातेवाईक तिला शेवटपर्यंत सोबत करीत होता तो देखील प्रसंग घडल्या क्षणापासून गायब आहे विशेष म्हणजे या तिघांवर आणि पूजाशी संबंधित तिच्या वडिलांसारखे आणखी अनेक व्यक्तींवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येणार कि काय कि त्यांनाही पूजा प्रकरणात सहभागी असलेले काही गुंडछाप मवाली थेट पूजाच्या सोबतीला पाठवणार आहेत कारण पूजाच्या नातेवाईकांत घरात चर्चा तर अशीच आहे कि पुरावे नष्ट करण्यासठी आणखी काही मंडळींना आपला जीव गमवावा लागण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे अतिशय तातडीने नेमके काय घडले हे पूजाच्या वडिलांच्या तोंडून त्यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी वदवून घेण्याची तसेच अरुण राठोड आणि डॉक्टरला लोकांसमोर ते सेफ आहेत दाखविण्या समोर आणण्याची नितांत गरज आहे तशी आवश्यकता आहे. मला आश्चर्य याचे वाटले कि  बंजारा समाजातील मंडळींनी सारे पुरावे अगदी उघड असतांना धडपड्या पण अकाली कोमेजलेल्या कळीच्या समर्थनार्थ मोर्चे  न काढता ज्यांच्या विरोधात धडधडीत पुरावे आहेत त्या मंत्र्याच्या समर्थनार्थ मोर्चा का म्हणून काढला, आपल्या लेकीबाळीसाठी हे असे हृदयशून्य किंवा चुकीचे समर्थन करीत असतांना समस्त बंजारा समाजाने एवढेच मनात आणावे कि हा प्रसंग माझ्या स्वतःच्या घरात घडला असता तर ! काहीही केले तरी समाजाला पाठीशी घेऊन सारे काही मिटवता पचवता येते हे जे काय अलीकडे या राज्यात वारंवार घडते आहे, समाज किती भरकटलेला आणि चुकीच्या पद्धतीने वागणारा हेच त्यावरून लक्षात येते त्यामुळे एकट्या बंजारा समाजाला दोष देणे तसेही चुकीचे वाटते कारण प्रबोधन अख्य्या मराठी जनतेचे करून मोकळे होऊन नितांत गरजेचे आहे. पूजा आपली लेक असती तर, हेच ध्यानात ठेवून बंजारा या अतिशय आक्रमक व धाडसी समाजाने याउलट संजय राठोड नामक त्यांच्या नेत्याला भर चौकात जाब विचारून मोकळे व्हावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *