तुंबळ टोळीयुद्ध : पत्रकार हेमंत जोशी 

तुंबळ टोळीयुद्ध : पत्रकार हेमंत जोशी 
आधीही हे राज्य भ्रष्टाचारी होतेच पण १९९५ नंतर शासनाशी संबंधित बहुतांश कंत्राटदारांनी आणि ठेकेदारांनी मोठ्या युक्तीने विशेषतः राज्यकर्त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आमच्यातल्या दलाल मीडियाची मनातली भीती घालवली, काहीही केले तरी गाठीशी पैसे आणि पाठीशी जात असली कि कसेही वागले तरी काहीही होत नाही हे यातल्या प्रत्येकाला जाणीवपूर्वक शिकवल्या आणि बिंबवल्या गेले आणि आजची अराजकता प्रत्येक माणसात आणि प्रत्येक राजकीय पक्षात निर्माण झाली. सगळीकडे सर्वत्र सारखी माणसे म्हणजे काँग्रेस कडे नितीन राऊत असतील तर भाजपाकडे प्रवीण दरेकर राष्ट्रवादीकडे अनिल देशमुख असतील तर शिवसेनेत असे कितीतरी शिवाय या मंडळींच्या हिस्श्यात व पाठीशी अगदी भक्कमपणे शासनातले कर्मचारी अधिकारी उभे असल्याने वाट्याचे गणित समस्त राज्यकर्त्यांनी १९९५ नंतर एकदम सोपे करून ठेवलेले आहे. तुम्हाला अनेकदा वाटते कि देवेंद्र फडणवीस त्यांच्याही पक्षातल्यांना धारेवर धरतात मग त्यांच्यातही अनेक एकनाथ खडसे निर्माण होतात, होय हे खरे आहे कि फडणवीस जसे विरोधकांशी किंवा शासनाशी भ्रष्टाचाराविरोधात लढा देताहेत त्याचवेळी ते त्यांच्याही भाजपामधल्या करंट्यांना सोडत नाहीत हि वस्तुस्थिती आहे कारण ज्या प्रत्येक योजनेसाठी राज्य व केंद्र शासन पैसे ओततात उपलब्ध करून देतात त्यातले त्या प्रत्येक योजनेवर फक्त केवळ ३० टक्के पैसे खर्च होतात उरलेले सारे पैसे ज्यांच्या हाती ससा अशा सत्तेवर असलेल्या पारधीरूपी मंडळींच्या खिशात जातात आणि हि लढाई एकटा देवेंद्र लढतोय पण तो या लढाईत कितपत व कोठपर्यंत टिकेल आता मलाच शंका येऊ लागलेली आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आजन्म ब्रह्मचारी संघ प्रचारक त्या प्रमुख भाजपा कार्यालयामध्ये संघटन मंत्री या अतिशय महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर मोठ्या सन्मानाने नियुक्त केले जातात त्यातलेच रवींद्र भुसारी किंवा विजय पुराणिक यांच्यासारखे संघटन मंत्री जर नको त्या भानगडीत अडकून दूर केले जात असतील तर देवेंद्र सारख्या नेत्यांनी यापुढे अपेक्षा तरी कोणाकडून करायची ? थोडक्यात ज्याला त्याला या राज्यात विविध मोहांनी व्यापलेले आणि विविध विकृतींनी पछाडलेले असल्याने सत्तेशी संबंधित प्रत्येकाने स्वतःचे ब्रेन वॉशिंग कडून घेणे आत्यंतिक आवश्यक ठरते आहे, खुर्ची बदलून उपयोग नाही माणूस मुळापासून बदलला पाहिजे…
आपल्या या देशात किंवा महाराष्ट्रात विविध संस्था कंपन्या सतत लोकांच्या राजकीय मानसिकतेचा अभ्यास करत असतात राजकारणातले आम्ही अनुभवी म्हणून आवश्यक ती माहिती गोळा करतांना ते माझ्यासारख्या अनेकांच्या संपर्कात असतात या अशा मंडळींशी अलिकडल्या वर्षभरात चर्चा करतांना असे लक्षात आले आहे कि अराजकतेविरोधातली हि लढाई त्यात जर फडणवीस अयशस्वी ठरले तर दुसरा पर्याय निवडण्याच्या मोठ्या मानसिकतेत या राज्यातले विविध विचारांचे बहुसंख्य माणसे त्यापद्धतीने मोठा बदल करण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणजे हे तर दिल्लीत जसे घडले तसे या राज्यात घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दिल्लीतल्या या अशाच दोन्हीकडच्या अराजकतेला म्हणजे मग ती भाजपा असेल किंवा काँग्रेस, दिल्लीकर मुळापासून आधी हादरले नंतर त्यांनी ठरवले कि प्रामाणिक माणसाच्या हाती काही केले तरी आपली दिल्ली सोपवायची आणि अरविंद केजरीवाल यांच्या हाती दिल्लीकर मंडळींनी सत्ता सोपविली मग तेथे ना नरेंद्र मोदी यशस्वी ठरले ना राहुल व सोनिया यांच्या विविध क्लुप्त्या व युक्त्या आणि झपाट्याने हि अशीच मानसिकता या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेची देखील बनते आहे, कारण त्यांच्या अपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादीकडून स्वप्नातही पूर्ण होणाऱ्या नव्हत्या पण त्यांना विशेषतः उद्धव व शिवसेनेकडून आणि भाजपाकडून त्या अपेक्षित होत्या पण गाडी रुळावर येत असतांना मध्येच घसरली, उद्धव व देवेंद्र एकमेकांपासून दूर गेले विशेष म्हणजे त्यांच्यातला देखील प्रत्येक नेता राज्यातल्या विवेक जाधव सारख्या कंत्राटदारांच्या दलालांच्या कुशीत विविध सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून विसावला आणि गेले वर्षभर मी हेच अगदी जवळून बघतोय कि सत्तेत म्हणजे महाआघाडी सरकारमध्ये केवळ टक्केवारीला मोठे उधाण आले आहे, यांच्यातल्या एकालाही असे वाटत नाही कि जनतेचे भले व्हावे कारण जो तो केवळ वैयक्तिक कुटुंबाचा तेवढा विचार करतो आहे जे चित्र अत्यंत विदारक व राज्याचा बिहार करणारे आहे म्हणजे मला उद्या अजिबात आश्चर्य वाटणार नाही कि नजीकच्या काळात महाराष्ट्राचे बिहार आणि बिहारचे कालचा प्रगत प्रामाणिक महाराष्ट्र झाल्यास, आणि हेच बदल अतिशय झपाट्याने घडताहेत किंबहुना आजच तसे चित्र निर्माण झालेले आहे…
राज्यात नवीन सरकार सत्तेत आले कि त्या सरकारच्या विचारांशी बांधील असलेल्या मतदाराला कार्यकर्त्याला असे वाटत असते कि आता माझे आपले सरकार आले आहे यापुढे सारे काही छान होईल पण १९९५ नंतर तसे एकदाही घडतांना दिसलेले नाही अपवाद पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचा, कारण या दोघांच्या काळात लोकांच्या जे मनात असायचे तसे घडायचे कारण त्या दोघांना राज्याचे भले करण्याची आणि अराजकतेतून राज्याला बाहेर काढण्याची आंतरिक मनोमन इच्छा होती आणि त्या पद्धतीने मग अक्षरश: शाळेचा एखादा कडक मुख्याध्यापक असावा तशी पृथ्वीराज यांनी आधी छडी हाती घेतली पण त्यांच्या या कडक वागण्याने घडले काय कि त्यांना त्यांच्याच पक्षातल्या श्रेष्ठींनी नॉव्हेअर केले. सत्तेपासून दूर केले ठेवले आणि त्यांच्या हातून नंबर एक चे नेतृत्व देखील हिसकावून घेण्यात आल्याने त्यांच्याच पक्षातल्या बहुसंख्य अत्यंत वाईट नेत्यांची चांदी झाली. दुसरीकडे राज्यातल्या सत्ते सभोवताली टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे, केलेल्या वाईट कृत्यांचे सत्तेतल्या मंडळींना काहीही न वाटता याउलट महाआघाडीतले सारे एकत्र येऊन अजितदादा यांना पुढे करून दुसर्या टोळीवर उलटले आहेत आणि अजूनही काँग्रेस व उद्धव यांच्या ते लक्षात येत नाही कि या एकत्रित येऊन भाजपावर तुटून पडण्याचा मोठा राजकीय फायदा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी उचलणार आहे नुकसान काँग्रेसचे होईल ती अधिक खिळखिळी होऊन लोकांच्या मनातून आणखी आणखी झपाट्याने उतरत जाईल. कुठे आहेत उद्धव, प्रकृती अस्वास्थ्य आणि सभोवताली मोठ्या खुबीने जमा झालेली स्वार्थी मतलबी लीड्सरशिप त्यात उद्धव यांच्या ठायी तसा प्रशासन हाकण्याचा अजिबात अनुभव नाही त्यामुळे जो अधिकारी येतो तो त्यांना बदनाम व राज्याला लुटून खातो आहे आणि अजूनही नेमके कोणाला जवळ करण्याची आवश्यकता हे उद्धव यांच्या लक्षात येत नाही ज्याची फार मोठी किंमत त्यांना व त्यांच्या शिवसेनेला नक्की मोजावी लागणार आहे, वाईट वाटते. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयातले झारीतले शुक्राचार्य ओळखलेले नाही तेथे इतरांना ओळखणे फार दूरचे म्हणून राजा असताना तुम्ही प्रधान होण्याची विनाकारण अतिघाई केली मी ठासून सांगत आलो आहे,यापुढे तरी उद्धवजी तुमची प्रत्येक चाल सावधगिरीची असावी असेच जाणकारांना वाटते आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *