पोरकट पत्रकारिता : पत्रकार हेमंत जोशी
पत्रकार अरविंद भानुशाली यांचे नेमके स्वरूप वाचकांसमोर उघड केल्यानंतर शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विविध मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी, मुंबईतील इतर शासकीय कार्यालये या सर्वांमध्ये एक वेगळी हिम्मत ताकद फार मोठ्या प्रमाणावर अशी निर्माण झाली कि विविध वृत्तपत्रांचे मंत्रालयातील काही वार्ताहर ज्या दबाव तंत्राचा वापर करून कामे करवून घेतात त्यांना किमान हेमंत जोशी वाचा फोडू शकतो, त्यांना नागडे करण्याची हिम्मत ठेवून आहे. त्यामुळे या अरविंद भानुशाली यांच्यासारखे जे आणखी चार वृत्तप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर दलाली करण्यात गुंतलेले आहेत त्यांचे अनेक किस्से मला सांगण्यात आले, देण्यात आले. मंत्रालयात अतिशय मोठ्या प्रमाणावर दलाली करणाऱ्या एका स्मार्ट मित्राने तर ठाणे शहापूर परिसरातील एका बाविस्कर कि तेवीसकर आडनावाच्या तहसीलदारांची बदली महसूल खात्यातून इकडून तिकडे म्हणजे मोक्याच्या ठिकाणी करवून घेतल्या नंतर त्याला म्हणे त्या बदली करवून घेतलेल्या अधिकाऱ्याने तीन कोटी रुपये मोजले, दिले आणि अशी कितीतरी कामे हा पत्रकार कम दलाली अधिक करणारा स्मार्ट मित्र विविध मंत्र्यांकडून, प्रसंगी मुख्यमंत्री कार्यलयातून गेली कित्येक वर्षे करवून घेतो, मी त्या मंत्रालयात फारतर आठवड्यातून एकदा जात असल्याने हे असे प्रकार थोडे दुर्लक्षित झाले होते पण आता ठरविलेले आहे, हे असे दबाव टाकून केवळ दलाली करणारे वार्ताहर, पत्रकार शोधून काढायचे, आधी त्यांचे पुरावे त्यांच्या वृत्तपत्र कार्यालयात लेखी कळवायचे, हे असे कळविल्याने जर त्या प्रतिनिधींचे मंत्रालय बीट बदलल्या जात असेल तर माझ्या व्यवसायाची बदनामी टाळण्यासाठी मी नक्की माझ्या पाक्षिकातून ते लिखाण करणार नाही पण वृत्तपत्रांनी दाखल घेतली नाही तर नावानिशी पुरावे सादर करून मी मोकळा होईल.
उदाहरण द्यायचे झाल्यास समजा एखादा जोशी किंवा कुलकर्णी लोकमत सारख्या वृत्तपत्राचा दबाव टाकून हि अशी मलईदार मोठ्या कमाईची कामे करून मोकळे होत असतील, पैसे खाऊन मोकळे होत असतील तर आधी नक्की त्यांची लेखी तक्रार पुरावे देऊन त्या वृत्तपत्राकडे देईन, ऍक्शन घेतल्या गेली तर माझी लढाई तेथेच संपलेली असेल पण त्यांना योग्य ती शिक्षा दिल्या गेली नाही तर माझे ते कामच आहे, समोरचा मग कोणीही असो, नागडे करून मोकळे व्हायचे. अर्थात जोशी किंवा कुलकर्णी ह्या नावांचा येथे उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे, ते तसे असतीलच असे नाही आणि तसे असतील तर शेवटच्या श्वासा पर्यंत लढणे आमचे कामच आहे. येथे खोटे पुरस्कार घेऊन जगायचे आहे तरी कोणाला, जगभरातल्या मराठी वाचकांचा दररोज दरदिवशी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमचे खरे पुरस्कार आहेत, असे आम्हाला वाटते आणि तेच सत्य आहे. असेच जगत राहण्यात आनंद आहे…
जे वार्ताहर मंत्रालयात बसून दररोज मोठ्या प्रमाणावर दलाली करतात, मलईदार कामे करवून घेतात, अमाप पैसे कमावून घेतात, त्यांचा मी आता वेगळ्या पद्धतीने देखील अभ्यास करायला सुरुवात केली आहे. हे असे प्रचंड खप असलेल्या वृत्त पत्राचे वार्ताहर दलाली सोयीस्कर कशी होईल हाच एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून बातम्या, मुलाखती, लेख छापून मोकळे होतात हे आता माझ्या लक्षात आले आहे. त्यांनी छापलेल्या लिखाणावरून दलालीचे अनेक संदर्भ माझ्या लक्षात येऊ लागलेले आहेत. म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील सहकार्य करून मोकळे होत असतील तर त्यांच्या विरोधात न छापणे आणि काम हुकले कि त्यांना नागडे करून मोकळे होणे हे असे रंडीछाप धंदे हे दलाली करणारे वार्ताहर करून मोकळे होतात, माझ्या तेही लक्षात आले आहे. दलाली करणाऱ्या या प्रभावी पत्रकारांविरुद्ध, विविध वृत्तपत्रांच्या वार्ताहरांविरुद्ध, प्रतिनिधींविरुद्ध माझी हि लढाई म्हणजे मी साक्षात विस्तवावरून चालतोय, याचीही मला संपूर्ण कल्पना आहे, पण हा ठरवून केलेल्या खुनासारखा माझा हाती घेतलेला अतिशय खतरनाक प्रयोग आहे, वार्ताहरांनी किंवा पत्रकारांनी अधून मधून, पुन्हा एकदा सांगतो, छुटपूट एखादे काम करवून घेऊन दोन पैसे मिळविणे, चुकीचे आहे, माझे म्हणणे नाही पण केवळ दलाली करणे यालाच जर काही वार्ताहर प्रतिनिधी पत्रकार प्राधान्य देत असतील तर मेलो तरी हरकत नाही, जीव गेला तरी हरकत नाही पण लढणे सोडणार नाही. आज या लेखात दलाली करणाऱ्यांची नावे आणि पुरावे येथे दिले नाहीत पण हे थांबले नाही तर माझ्या कडे जमा झालेलं जमा होणारे, येणारे पुरावे त्या त्या पत्रकारांच्या नावांसहित मी ते विदारक सत्य मांडून मोकळा होईल. आणि मंत्रालय किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयातील, महापालिकेतील किंवा अन्य कुठल्याही कार्यालयातील तेथे काम करणाऱ्या मंडळींनी या अशा केवळ दलाली करण्यासाठी पत्रकारिता करणाऱ्या मंडळींना अजिबात घाबरू नये, आम्ही दिवसरात्र आपल्या पाठीशी उभे आहोत हे लक्षात असू द्या…
माझे विविध वृत्तपत्रांच्या मालकांना असे म्हणणे सांगणे विचारणे आहे कि तुम्ही तेच ते चेहरे महत्वाच्या त्याच त्या बीटवर कंटिन्यू का करता, इतरही वार्ताहरांना संधी देऊन तर बघा म्हणजे चेहरे कृपया बदलते ठेवा. मला तर असे अनेकदा वाटते कि वृत्तपत्रांच्या मालकांना किंवा संपादकांनाही हे असे दलाली करणारे प्रभावी वार्ताहर मोक्याच्या ठिकाणी हवे असतात म्हणजे त्यांच्या अंगावर एखादा तुकडा पडला कि हे असे मालक किंवा संपादक स्वतःच या वार्ताहरांना दलाली करण्या मोकळीक देऊन मोकळे होत असावेत. हे तर असे झाले कि संध्याकाळी घरी येतांना चार पैसे घरात अधिक आणणार्या बायकोला तिच्या नवऱ्यानेच दुसऱ्या एखाद्यासंगे झोपण्याची परवानगी देण्यासारखे….
विशेष म्हणजे विविध वाहिन्यांचेही काही भामटे प्रतिनिधी दलाली करण्यात आघाडीवर आहेत, ती देखील माहिती पुराव्यांसहित माझ्याकडे आता हळूहळू येऊ लागलेली आहे. बातम्यांचा दबाव आणि त्यातून मलईदार कामे करवून घेण्याच्या ह्या थर्डग्रेड पद्धतीचा प्रसंगी कोणत्याही वाहिनीचा प्रतिनिधी असो, घाबरण्याचे पैसे देण्याचे अजिबात कारण नाही, निर्भय होणे तेवढे गरजेचे आहे. जेव्हा फडणवीसांसारखे मुख्यमंत्रीही म्हणजे एरवी फारसे न चिडणारे देवेन्द्रजी त्या दलाली करणाऱ्या भानुशालींना त्यांची औकात दाखवून मोकळे होतात, इतरांनीही मग त्यांची री ओढून मोकळे व्हावे, हात जोडून विनंती.
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी