दोघे मित्र दोघेही गेले २ : पत्रकार हेमंत जोशी
प्रेताचे दहन करण्यापूर्वी मंत्र म्हणणाऱ्या भटजीला त्याक्षणी हेच वाट ते जे त्याचवेळी संपूर्ण केश कर्तन करणाऱ्या नाभिकाला वाटत असते कि हे असे प्रसंग कधीही आमच्यावर येऊ नयेत, त्या दोघाना हेही वाटत असते म्हणजे भटजीला वाटत असते कि एखाद्या बटूचे व्रतबंध माझ्या हातून घडावे आणि न्हाव्याला वाटत असते कि त्या बटूचे केस कर्तन माझ्या हातून घडावे, आणि या दोघांसारखेच अलीकडं माझं झाले आहे म्हणजे या चार दोन महिन्यात अत्यंत अतिशय आवडत्या व्यक्तींवर त्यांच्या मृत्यूनंतर लिहिणे झाले असल्याने माझेही मन त्या दोघांसारखे झाले आहे म्हणजे अलीकडे असे वारंवार वाटायला लागले आहे कि लिहिणेच सोडून द्यावे. लागोपाठ मन्मथ म्हैसकर त्यानंतर त्याचे लाडके आबा अरुण पाटणकर आणि आत्ता आता काल परवा ते दोघे, आधी दत्तात्रय म्हैसकर लगेच दुसरे दिवशी वसंत डावखरे या सार्या लाडक्या लोकांचे स्वर्गवासी होणे, त्यावर लिहिणे, नकोच हे असले जड अंतकरणाने लिहिणे आणि उगाचच मनाचे खोटे खोटे समाधान करून घेणे…
आत्मा केव्हा संतुष्ट पावतो माहित आहे का, आपल्या देहातील प्राण क्रमाक्रमाने बाहेर पडून जेव्हा शरीर हालचाल करणे बंद करते तेव्हा मृत्यू झाला असे आपण म्हणत असलो तरी पुढले काही दिवस तो आत्मा घराभोवतालीच फिरत असतो आणि त्याला हे दिसत असते कि आपल्यासाठी कोण खरे रडतेय आणि कोण खोटे खोटे, कोण चांगले बोलतेय आणि कोण भलते सलते, या बाबतीत पक्के डोंबिवलीकर असलेले दिवंगत दत्तात्रेय म्हैसकर नक्कीच घरासभोवताली आत्म्याच्या रूपात फिरत असतांना १०० टक्के स्वतःवर जाम खुश असतील कारण असा एकही डोंबिवलीकर किंवा त्या परिसरातली सामाजिक सार्वजनिक क्रीडा कला समाजसेवी अन्य अशी कुठलीही संस्था नसावी ज्यांना दिवंगत दत्तात्रेय म्हैसकर यांनी सढळ हस्ते सहकार्य केले नसेल, म्हणून ते गेल्यानंतर जे जे त्यांच्या अख्या कुटुंब सदस्यांना भेटायला गेले, दारावर गेले ते मनापासून भरभरून खरे खरे बोलले नाही आणि मनातून रडले नाही, असे नक्की झालेले नाही, मला वीरेंद्र म्हैसकर म्हणाले, धाकटा जयंत बाबांचा विशेष लाडका, ३ जानेवारीला त्याचा वाढदिवस, नेमके त्याच दिवशी बाबा गेले, यापुढे जयंतचा वाढदिवस आमच्या अंगावर काटा आणणारा ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने वीरेंद्र आणि जयंत सतत कायम जगभर देशभर सारखे फिरत असतात, आश्चर्य म्हणजे ते दोघेही त्यादिवशी मुंबईत होते, पुण्य साचवून ठेवले असले कि हे असे आडवे येते…
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे या सत्तेच्या राजकारणात मी दरदिवशी कित्येक बघतो म्हणजे आज जे शेट्टी किंवा थोरातांसारखे बहुसंख्य दलाल कधी सत्तेतल्या गडकरी किंवा कधी फडणवीसांभोवती फिरतांना घुटमळतांना बघतो कालपर्यंत हेच दलाल कधी विलासराव देशमुख तर कधी सुशीलकुमार शिंदे भोवताली त्यांची पादत्राणे चाटताना मी बघतो, बघत आलो आहे. आणि हे असे जाधव किंवा थोरातांसारख्या दलालांना वेळीच ओळखून नारायण राणेंसारख्या परिणामांची चिंता न करता नेत्यांनी बखोटीला धरून हाकलून लावले तरी ते निलाजऱ्या मनाने पुन्हा पादत्राणे चाटायला आलेलेही मी बघितलेले आहेत. आणि येथेच मी नतमस्तक होतो दिवंगत दत्तात्रेय म्हैसकर यांच्यासमोर, म्हणून त्यांच्या फोटोला जेव्हा मी श्रद्धांजली वाहतांना फुले वाहिलीत, आई शपथ सांगतो, मला वाटले मी देवाला फुले वाहतो आहे. आणि हो, व्यवसायातून अनेक दरदिवशी पैसे मिळवून मोकळे होतात पण कमावलेले जे आहे त्यातले खूपसे वाटण्याची दानत ज्यांच्यामध्ये असते तेच थेट स्वर्गात पोहोचतात,
म्हैसकर हे नक्की देवाच्याच राज्यात पोहोचले आहेत, कारण ते दानशूर होते, गरजूंना मदत करतांना खूप हळवे व्हायचे. अत्यंत महत्वाचे म्हणजे अमुक एखादा नेता, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री सत्तेत असला तरी, सत्तेततून थेट घरी बसला तरी किंवा अमुक एखादा शासकीय अधिकारी निवृत्त झाला तरी, ज्यांच्याशी मैत्रीचे नाते जोडले ते कुठेही असलेत तरी, दत्तात्रेय म्हैसकर यांनी स्वार्थातून संबंध जोडले किंवा तोडले असे कधीही झाले नाही, एकाच्याही बाबतीत घडले नाही, महत्वाचे म्हणजे त्याचे विविध जाच आणि त्रास त्यांना व्यवसाय सांभाळतांना झालेत तरी, कारण सत्तेत असलेल्या अनेकांना वाटायचे कि आता आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे म्हैसकरांनी केवळ आमच्याशी संबंध ठेवावेत पण ते या अशा भूमिकेला कधीही धरून वागले नाहीत किंवा सांगतांना लाजलेही नाहीत कि अमुक एक गृहस्थ त्याचे स्नेही आहेत म्हणून…
२००० मध्ये सेना भाजपा युती सत्तेतून उतरली आणि अजित पवारांचे पर्व सुरु झाले, इतर अनेकांना जे वाटायचे तेच त्यांनाही वाटले कि म्हैसकर कुटुंब केवळ नितीन गडकरी यांच्याशीच घरोबा ठेवून आहेत, त्यावर अजितदादांनी घेतलेली त्यावेळी कर्मठ भूमिका, मी येथे सांगणार नाही, पण वेळ साधून मी अजितदादांना हेच सांगितले, असे अजिबात नाही, एकदा फक्त बोलून बघा आणि दादांनी वेळ दिल्यानंतर, म्हैसकरांनी हेच नेमके दाखले देऊन सांगितले कि पवार साहेब नसते तर ते या व्यवसायात कधीही पुढे गेले नसते, शरद पवारांचे वारसदार माझ्या डोळ्यात पाणी आणणार असतील तर मला या व्यवसायात राहायचे देखील नाही, काहीसे कडक स्वभावाचे दादा, या वाक्यावर आधी गहिवरले नंतर क्षणार्धात त्यांनी वडीलकीच्या नात्याचे म्हैसकरांना कडकडून जवळ घेतले. माझी माहिती अशी, जे दादांचे मोजके लाडके उद्योगपती या राज्यात आता आहेत त्यातले पहिल्या क्रमांकाचे आहेत म्हैसकर कुटुंबीय….
पुढल्या भागात डावखरे :
पत्रकार हेमंत जोशी