संघ आणि भाजपा ५ : पत्रकार हेमंत जोशी
शरद पवार यांच्या घरातील घराण्यातील एक किस्सा कायम ध्यानात ठेवण्यासारखा. पवार आणि त्यांची सख्खी सावत्र भावंडे त्या भावंडांची मुले त्या मुलांची मुले अशी एकत्र कुटुंब सदस्य संख्या जवळपास ४००-४५० एवढी आहे. काळाच्या ओघात सारे वेगवेगळे राहतात पण या संपूर्ण पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयावर अखेरची मोहोर शरद पवार यांचीच असते, अगदी आजही. मग तो नातेवाईक भलेहि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी. बहुतेकवेळा तर शरद पवारांनाच बहुतेक सदस्य विचारून मोकळे होतात कि मी पुढे काय करू, मग शरदराव सांगतात, तू अमुक व्यवसायात जा, तू नोकरी, तू राजकारणात जा, इत्यादी इत्यादी. हे असे आपल्या समस्त हिंदूंमध्ये घडले तर म्हणजे ज्याला त्याला आपल्या जातीची रेषा मोठी करण्याचा नक्की अधिकार आहे पण दुसऱ्याची रेषा पुसण्याचा नाही थोडक्यात स्वतःच्या जातीचे नक्की भले करावे पण दुसऱ्या जातींचे नुकसान न करता आणि जेव्हा केव्हा हिंदू हा कॉमन अजेंडा असेल तेव्हा सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून, हात घट्ट पकडून प्रसंग मग तो कोणताही असेल एकत्र सामोरे जायचे, दुर्दैवाने पवारांच्या घराण्यासारखी एकी हिंदूंमध्ये नाही, आपण एकमेकांना विनाकारण खूप खूप पाण्यात बघतो, जातीतल्या जातींमध्ये देखील अनेक वाद त्यामुळे आम्ही सारे हिंदू विखुरल्या जात आहोत, हे चित्र चांगले नाही. प्रत्येकाची जात घराच्या उंबरठ्यापर्यंत ठीक असते, बाहेर पडल्यानंतर आम्ही सारे हिंदू, असा विचार जर प्रत्येकाच्या डोक्यात रुजला तरच कसेबसे टिकून राहणे शक्य होईल. हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांचा बळी द्यायला तयार असणाऱ्या, केवळ मते पदरात पाडून घेण्यासाठी हिंदूंना कायम वेठीस धरणारे साऱ्याच विचारांचे नीच पुढारी, त्यावर उपाय एकच आहे, आम्ही सारे हिंदू संघटित असे अत्यावश्यक आहे…
वास्तविक कोणत्याही धर्माचे आमच्यावर आक्रमण होणे हे या हिंदुस्थानात सतत घडणे अत्यंत चुकीचे, असे घडले रे घडले कि त्या कृतींवर कडक कारवाई होणे आवश्यक असते पण नको बाबा त्या ख्रिसचनांना किंवा मुसलमानांना उगाच दुखावणे, नेत्यांच्या, राज्यकर्त्यांच्या या गांडू विचारातून आम्ही हिंदूच आता अल्प मतात झपाट्याने येतोय. महत्वाचे म्हणजे जी काही धर्मनिरपेक्षता संविधानात आहे,तिचे उल्लंघन हिंदुहिताला अगदी बिनधास्त ठोकरून होत आहे. हिंदूंचा अगदी उघड कोणीही वाली नाही, हिंदू समाजाला योग्य दिशा दाखविणारे किंवा हिंदूंना थेट जवळ घेणारे कोणीही दिसत नाही अशावेळी रा. स्व. संघ हा एकमेव हिंदूंचा उघड आधार वाटतो, संघातील काही त्रुटी दूर करा, आम्हीही संघाला जवळ घेऊ, जवळ करू, हा विचार मला वाटते पुढे येण्यास हरकत नाही पण संघाने नेमके, अमुक बदल करावेत हे सुचवितांना ‘ एकत्र हिंदू ‘ या विचारांना अजिबात तडा जात काम नये….
अगदी आपल्या राज्यातही, घराबाहेर पडल्यानंतर आम्ही सारे हिंदू, हे अजिबात डोक्यात नसते. जातींचा विखार केवळ प्रत्येकाच्या डोक्यात असतो. हा या जातीचा, तो त्या जातीचा या अतिशय संकुचित विचारातून सतत जे एकमेकांकडे बघून काम
करायचे आहे किंवा नाही हे जे ठरवितो, हिंदूंमधला हा फुटीरवादी विचार तर हिंदूंना अतिशय घातक ठरलेला आहे. हे घडू नये केवळ रा. स्व. संघाला वाटते, ते एकत्र आलेत कि, आम्ही सारे हिंदू, हा एकमेव विचार त्यांच्या डोक्यात असतो आणि हाच विचार पुढे जाणे अत्यंत गरजेचे आहे. येथे या अंकात मी अत्यंत प्रखर आणि स्पष्ट शब्दात हिंदूंच्या ऐक्याचे महत्व विशद करीत असतांना कुठेही इतर धर्मियांना शिव्या घालण्याची गरजच पडली नाही, इतरांचे तसे होत नाही, ते मात्र हिंदूंवर अतिशय जहरी टीका करून आपल्या धर्माचे महत्व वाढविताना सतत दिसतात. त्यांची तशी हिम्मत होते कारण आम्ही आमचे नेते पोकळ विचारांचे आहोत, आम्ही विरोध न करता गप्पा बसतो, त्यांचे फावते, त्यांना वाटते हिंदू गांडू आहेत आणि हे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे..आताची सध्याची हिंदू चळवळ हा केवळ रा. स्व. संघ आणि संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेसारख्या विविध चळवळींचा अजेंडा आहे असे येथे का दिसते, इतर कोणालाहि फारसे का वाटत नाही कि हिंदूंचे संरक्षण करणे गरजेचे आहे ते. कदाचित तुम्हाला माहित नसेल कि निरनिराळ्या सामाजिक कार्ये करणाऱ्या चाळीस हजाराहून अधिक संस्था संघ परिवाराशी संबंधित आहेत, त्यातल्या अनेकांचे काम वरकरणी अगदी क्षुल्लक वाटत असेल, पण त्या साऱ्या चळवळींचे उद्देश सेम आहेत, दरखे आहेत, हिंदुत्वाचे संरक्षण करणे हेच त्या साऱ्यांचे काम आहे, मग हे काम इतर कोणत्याही हिंदूंनी हाती घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसला तर हिंदूंची ऍलर्जी असल्यासारखे ते आमच्याशी वागतात, वास्तविक ते हिंदूंच्याच भरवशावर निवडून येतात. इतर धर्मियांचे लाड करीत असतांना जणू आम्ही हिंदूंच्या गावचेच नाहीत हे असे त्यांचे वागणे घृणा आणणारे असते…
संघाची स्थापना १९२५ साली नक्कीच हिंदुराष्ट्राच्या प्रस्थापनेच्या ध्येयाने झाली, विशेष म्हणजे केवळ सत्ता मिळविण्यासाठी याच रा. स्व. संघाने आज स्थापना होऊन जवळपास शंभरी गाठतांनाही त्यांनी आपल्या भूमिकेत कोणतेही बदल केले नाहीत ते जसेच्या तसे हिंदु विचारांना आणि हिंदूंच्या ऐक्क्यासाठीच्या विचारांना चिटकून चिपकून आहेत, त्यांचे कौतुक वाटते. मंदिरांऐवजी संघ स्थानावर गेल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादाचे खरे दर्शन तेथे घडते हे विशेष. हिंदूंच्या ऐक्यासाठी संघ विचारांनाच चिटकून बसायला हवे असे अजिबात नाही पण आपल्यातही विचारातून हिंदू ऐक्य दिसावे असे इतर कोणत्याही राजकीय किंवा बिगर राजकीय संघटनांना वाटत नसल्याने केवळ रा. स्व. संघ हा एकमेव उपाय हिंदूंकडे आहे म्हणून संघ शाखा ओस पडूनही संघाची व्याप्ती मात्र वाढतेच आहे…
अगदी आपल्या राज्याचाही विचार करावयाचा झाल्यास प्रत्येक जातीच्या नेत्यांनी त्यांच्या भल्यासाठी नक्की झटावे म्हणजे मराठ्यांनी आरक्षणासाठी लढावे, तेल्यांनी सवलती पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलने करावीत, ब्राम्हणांनी विविध संमेलने भरववावीत, माळ्यांनी समता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र यावे पण हे सारे करतांना आम्ही सारे हिंदू हा महत्वाचा विचार डोक्यात ठेवून स्वतः नक्की मोठे व्हावे पण इतर जातींना शिव्या देऊन कमी हीन लेखून, त्या त्या जातीच्या नेत्यांनी, आम्ही बघा कसे आक्रमक आहोत हे दाखविण्यासाठी, एकत्र हिंदू विचार मागे पडेल असे वागू बोलू नये म्हणजे पुरुषोत्तम खेडेकरांनी नक्की सारे मराठे एकत्र आणावेत पण त्याचवेळी ब्राम्हणांना शिव्या घालून आपण फार मोठे होते, हे डोक्यातून काढून टाकावे, याउलट स्वतःची रेषा मोठी करणारे नेतेच कायम टिकतात, मोठे होतात म्हणून रामदास आठवले टिकून आहेत, ते समाजासाठी झटतांना त्यांनी इतर जातींना टार्गेट केले, कधीही घडलेले नाही म्हणून रामदास आठवले हे असे एकमेव नेते जे इतर जातीतल्या लोकांना देखील अगदी मनापासून आवडतात, असेच साऱ्यांनी वागावे, अहो, जाती फारशा महत्वाच्या नाहीत, हिंदूंचे ऐक्य अति अति महत्वाचे आहे.सहज सुचले म्हणून सांगतो, उद्या समजा रामदास आठवले यांनी एखादी निवडणूक लोकांमधून जर लढविली तर मला खात्री आहे इतरही समाज म्हणजे दुसऱ्या धर्माचे किंवा हिंदू देखील त्यांना अगदी मनापासून मतदान करून मोकळे होतील, त्यांच्याकडे काम घेऊन जाणाऱ्यांची त्यांनी कधीही आजपर्यंत जात विचारलेली नाही, सर्वांनी त्यांच्यासारखे वागावे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी फार मोठ्या प्रेमावर सरकारी कार्यालयातून जातीधर्माचे विष कालविण्यात आघाडीवर असतात, अशा नालायक मंडळींनी, प्रथम आम्ही हिंदू आहोत हे ध्यानात ठेवून हिंदुत्वाचे रक्षण करायला हवे…
पत्रकार हेमंत जोशी