फडणवीस आडनावाची मिसळ ३ : पत्रकार हेमंत जोशी
बघा, राजेंद्रकुमार ने दिलीपकुमार च्या अभिनयाची नक्कल केली आणि अधिक यशस्वी ठरला. गोविंदाने तर जवळपास साऱ्याच नावाजलेल्या नटांची नक्कल केली आणि त्याने भल्या भल्या स्पर्धकांना मागे टाकून सोलो हिरो म्हणून कितीतरी हिट सिनेमे दिले. देवेंद्र फडणवीसांचे देखील तेच त्यांनी जवळपास आजवरच्या साऱ्याच मुख्यमंत्र्यांची त्यांच्यातल्या चांगल्या गुणांची अगदी हुबेहूब नक्कल केली म्हणून राहून राहून मनाला कायम हेच वाटत राहते कि ते देखील ‘ राजकारणातले सुपरस्टार ‘ अशी बिरुदावली चिटकवूनच निवृत्त होतील, फडणवीस म्हणजे आजवरच्या बहुतेक मुख्यमंत्र्यांची मिसळ म्हणून हि विल बे मोर सक्सेसफुल…
अनेकवेळा सांगून झाले कि माझे लिखाण इतर प्रगाढपंडित भाषाप्रभू पत्रकारांसारखे अजिबात नसते आणि ती अपेक्षा देखील तुम्ही ठेवू नये माझे लिखाण म्हणजे लिखाणातून तुमच्याशी संवाद यापद्धतीने असल्याने ते अनेकदा भरकटल्यासारखे तुम्हाला वाटते मला नाही म्हणजे आपण मित्र जशा एकाच भेटीत विविध अनेकविध वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून मोकळे होतो त्या तशा तुमच्याशी माझे हे लिखाण म्हणजे तुम्ही जगातले माझे सारे वाचक जणू जवळचे मित्र समजून मी मारलेल्या गप्पा टवाळक्या असतात म्हणून त्यात टोचून बोलणे किंवा टपल्या मारणे अधिक असते…
फडणवीस आडनावाची मिसळ या विषयाला हात घालण्यापूर्वी मला दैनिक लोकमत वरून काहीतरी आठवले ते आधी तुमच्याशी शेअर करतो.मला हेच काळात नाही कि बहुसंख्य पत्रकार अमुक एखादी भूमिका घेऊन लिखाणाशी प्रामाणीक का राहत नाहीत म्हणजे मी जर कडवे हिंदुत्व मानतो तर ते माझ्या लिखाणातून प्रामाणिकपणे दिसायलाच हवे प्रसंगी अजहर हुसेन सारखे काही मुस्लिम मित्र नाराज झाले किंवा होत असलेत तरीही पण इतर पत्रकारांच्या बाबतीत हे फारसे घडतांना दिसत नाही. वैयक्तित रागा लोभावर किंवा लाभावर असंख्य पत्रकारांच्या बातम्या किंवा लिखाण अवलंबून असते आणि हे असे वागणे रस्त्यावर धंदा घेऊन बसणाऱ्या वेश्यांना केवळ शोभणारे आहे किंवा असते असे मला वाटते, तुम्हालाही ते तसेच वाटत असेल…
अमुक एखाद्या कडून काम झाले नाही किंवा काही मिळाले नाही कि लेखणी हाती घेऊन त्याचे आयुष्य उध्वस्त करणे पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत चुकीचे आहे म्हणजे आधी अमुक एखाद्या मंत्र्याच्या अगदी जवळ जायचे त्याच्याकडून अनेक विविध फायदे उकळायचे पण अमुक एखादे काम त्या मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने टाळले कि लगेच त्याला आपल्या वृत्तपत्रातून बदनाम करायचे, इतरही वाहन्यांमधून आणि वृत्तपत्रांमधून हे असेच तेथे काम करणाऱ्यांकडून कायम घडत आलेले आहे आणि हे लक्षण म्हणजे धादांत पित्तपत्रकारिता आहे असच म्हणावे लागेल. मला राज्याच्या इतर भागातले माहित नाही पण ‘ मुंबई लोकमत ‘ मध्ये हे हमखास घडतांना दिसते आणि हि अशी वेश्याबृत्ती छाप भूमिका बदलत राहावी असे विजय दर्डा त्यांच्या वृत्तपत्रात पैशांनी आणि लेखणीतून प्रभावी ठरलेल्या वार्ताहरांना किंवा अन्य लिखाण करणाऱ्यांना सांगत असतील, वाटत नाही पण हे धंदे केवळ पैशांच्या लोभासाठी, हेही वेगळे त्या विजय दर्डा यांना सांगण्याची गरज वाटत नाही…
आधी तुम्ही अमुक एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला किंवा अन्य बड्या धेंडाला लोकमत किंवा तत्सम वृत्तपत्रातून ठोक ठोक ठोकायचे किंवा डोक्यावर उचलून धरायचे नंतर त्याच मंडळींचे एकतर वाटोळे करून सोडायचे किंवा डोक्यावर उचलून घ्यायचे हे कोणत्या पत्रकारितेचे लक्षण आहे आणि हा एकट्या लोकमत दैनिकाचा दोष नाही इतरही बहुतेक हे असेच वागतात म्हणून मला वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये रस्त्यावर येऊन काम करणारे बहुसंख्य कर्मचारी केवळ वाईट मार्गांनी पैसे कमविण्यासाठी मीडियाला धरून आहे असे कायम वाटत राहते किंवा तशी माझी खात्रीच झालेली आहे. ज्यांच्या भूमिकेवर अमुक एखादी वाहिनी किंवा वृत्तपत्र चालते ते वैयक्तित फायद्यासाठी आपल्या वाहिनीचा किंवा वृत्तपत्राचा वापर करवून घेतात का त्यावर अगदी महाराष्ट्र टाइम्स पासूनतर इतर साऱ्याच वाहिन्यांच्या किंवा वृत्तपत्रांच्या मालकांनी वारंवार तपासून घेणे बारीक लक्ष ठेवणे नजर ठेवणे अत्यंत अत्यंत आवश्यक असते. लोकसत्ताचे बारा वाजविणाऱ्या म्हणजे बातम्या लेखांकडे दुर्लक्ष करून आपल्या आवडीचा अर्थ हा विषय कायम घुसविणार्या गिरीश कुबेर एक भरकटलेले संपादक म्हणून माझ्या मनात कायम गोंधळ असतो पण गिरीश कुबेर यांची पत्रकारिता या अशा वैयक्तिक लाभांवर किंवा रागालोभावर आधारित आहे असे कधी वाटले नाही किंवा आपल्या वृत्तपत्रात वैयक्तिक फायद्या तोट्यातून बातम्या येतात, लिखाण घडते हे आजतागायत धूर्त विजय दर्डा किंवा दर्डा कुटम्बियांच्या लक्षात का आलेले नाही, कळायला मार्ग नाही किंवा एखाद्या आईनेच पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायात टाकल्यासारखा तर हा प्रकार नसतो…?
या राज्यातील विविध मीडिया पर्सन पैसे मिळविण्यासाठी कोणकोणत्या खालच्या थराला जातात त्यावर मला एकदा नक्की अगदी सखोल आणि सबळ पुरावे देऊन मांडायचे आहे. खुन्नस, स्वार्थ हेच डोक्यात ठेवून केवळ भ्रष्ट विचार थोडक्यात डोक्यात ठेवून आमच्या या क्षेत्रातले भले भले नामवंत जेव्हा हे तोडपाणी पद्धतीने वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांमध्ये काम करतांना दिसतात आणि या राज्याचे वाटोळे करण्यात महत्वाची किंवा मोठी भूमिका बजावतात त्यांना हे असे पाप करणे क्षणिक फायद्याचे आणि चांगले वाटत असावे पण हे असे पाप करणे दीर्घकाळ त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला सुखी ठेवून असते, वाटत नाही म्हणजे डॉ. उदय निरगुडकर जसे अत्यंत अभिमानाने आणि सुखा समाधानाने सांगतात कि त्यांची पत्नी आणि मुले कसे उत्तम आहेत मला वाटते देवाने त्यांच्यासारख्यांना चांगले वागलेत म्हणून दिलेले बक्षीस असते. १९८० नंतर आपल्या या राज्यात नवश्रीमंत होण्याच्या नादात जे उत्तम संस्कार बाजूला ठेवून पैसे लुटल्या गेले ते सारे त्यांच्या घरी कितपत सुखी समाधानी आहेत हे जयदत्त क्षीरसागरांसारख्या मंडळींना म्हणजे ज्याच्या हाती ससा तो पारधी पद्धतीने वागलेल्या किंवा वागणाऱ्यांना अवश्य विचारायला हवे आणि मी ते अशांना नक्की एक दिवस थेट अगदी
तुमच्या साक्षीने बिचारेल याची खात्री असू द्या…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी