रवी राणाशी पंगा ना लेना : पत्रकार हेमंत जोशी
धूर्त नेत्यांशी आणि चवताळलेल्या स्त्रीशी कधीही पंगा घेऊ नये, त्यांच्याशी दंगा करण्याचाही प्रयत्न करू नये. तिकडे बडनेरा अमरावती विधान सभा परिक्षेत्रात भाजपाचे स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क प्रमुख श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी थेट रवी राणा या अति धूर्त विद्यमान आमदाराची नेत्याची छेड काढलेली आहे अर्थ सरळ आहे पुन्हा एकदा तुषार भारतीय यांना रवी राणा यांच्या विरोधात येत्या विधान सभा निवडणुकीला उभे राहून आपले नशीब आजमावयाचें आहे त्यासाठी प्रसंगी राणा यांच्या विरोधात थेट प्रसंगी रस्त्यावर देखील उतरण्याची मानसिक तयारी भारतीय यांनी केलेली आहे…
भारतीय बंधू भाजपाचे आणि संघाचे कट्टर असल्यानेच श्रीकांत भारतीय यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयात खुर्ची मिळालेली आहे, स्थान मिळालेले आहे. तुषार भारतीय यांना अमरावती महापालिकेचा तगडा अनुभव आहे कारण ते अमरावती महापालिकेत भाजपातर्फे निवडून आलेले लोकमान्य लोकप्रिय नगरसेवक आहेत शिवाय ते फार कमी मतांनी मागल्यावेळी विधानसभेला पराभूत झालेले असले तरी त्यांना विधानसभा लढविण्याचा तगडा अनुभव आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला तुषार भारतीय यांची उमेदवारी मिळविताना फजिती होणार आहे असे दिसते कारण विद्यमान आमदार रवी राणा हे देखील, मी मुख्यमंत्र्यांना फार जवळचा आहे, अशी वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यात फारसे काही खोटे असावे वाटत नाही कारण रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांसभोवताली कायम सहज वावर, त्यामुळे ते खोटे सांगत सुटले आहेत, वाटत नाही…
पण लॉयल्टी रवी राणा यांच्या रक्तात किंवा स्वभावात असावी वाटत नाही, कारण एकेकाळी अमरावती मध्ये अति सामान्य जीवन जगणारे रवी राणा अमरावती आणि मुंबईत अत्यंत वादग्रस्त वादळी व्यक्तिमत्व ठरलेले अजय नावंदर यांचे बोट पकडून मुंबईत आले, त्यांचे उजवे हात म्हणून ओळखल्या जाऊ लागले, एकदा फार पूर्वी मी जेव्हा अजय नावंदर यांना माहिती घेण्याच्या निमित्ताने जुहूला भेटायला गेलो होतो तेव्हा हेच रवी राणा त्यांच्या सभोवताली सांगकाम्या म्हणून मोठ्या अदबीने वावरतांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत….
www.vikrantjoshi.com
म्हणजे एक काळ असा होता कि जर वादग्रस्त अजय नावंदर यांनी रवी राणा यांना या ठिकाणी तासभर बसून राहा सांगितले तर हेच राणा दोन तास बसून राहायचे, उठ सांगितले कि उठायचे आणि जा सांगितले कि पळत सुटायचे. रवी राणा आधी काय होते आन नंतर कसे मोठे झाले हे अजय नावंदर अधिक विस्तृत सांगू शकतील.अर्थात अजय यांचे बोट पकडून मुंबईत आलेले रवी राणा पुढे त्यांच्याच ओळखीने दुसर्या एका अति वादग्रस्त व्यक्तिमत्वाला चिकटले आणि तेथेच त्यांनी जवळपास अजय यांच्याशी संबंध तोडले. ते अतिवादग्रस्त व्यक्तिमत्व होते किंवा आहे, बिल्डर सुधाकर शेट्टी, म्हणून कधी कधी भीती वाटते जेव्हा ते फडणवीसांच्या सभोवताली फेऱ्या मारतांना दितात, पण त्यावर राणा यांचे हे स्पष्टीकरण असू शकते कि आमदार या नात्याने माझा तेथे वावर असतो किंवा मोठ्या खुबीने मी विद्यमान सरकारातील मंत्र्यांचा अधिकाऱ्यांचा वापर म्हटल्यापेक्षा उपयोग करून घेतो, असेही ते सांगायला कमी करणार नाहीत…
पुढे अजय नावंदर यांच्याकडे पाठ फिरवून सुधाकर शेट्टी यांना बिलगलेले रवी राणा तदनंतर मात्र राजकीय आणि आर्थिक यशाच्या पायर्या भराभर चढत फार फार पुढे निघून गेले, अजय नावंदर यांना हात चोळत बसण्यापलीकडे फारसे काही उरले नाही, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितले कि धूर्त नेत्यांशी पंगा घेणे त्यांना आव्हान देणे मोठे कठीण असे काम असते, जे काम सध्या किंवा पुन्हा एकदा अमरावती मध्ये भाजपाच्या तुषार भारतीय यांनी हाती घेतले आहे. अजय नावंदर असोत कि सुधाकर शेट्टी, अशा अत्यंत वादग्रस्त मंडळींशी थेट आणि उघड संबंध ठेवणारे रवी राणा हे कच्च्या गुरुचे नक्कीच चेले नाहीत त्यामुळे त्यांच्याशी निवडणुकीत लढा देणे म्हणजे एखाद्याने कुत्र्याच्या ढुंगणात फुंकर मारण्यासारखे आहे. चवताळलेला कुत्रा आणि चिडलेला नेता, खतरनाक ठरतात, समोरच्याला संपवून मोकळे होतात. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे एकीकडे तुषार भारतीय राणा यांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजीत मग्न असतांना चतुर रवी राणा मात्र तोंडावर बोट ठेवून गप बसलेले आहेत, असतात याचा अर्थ ते तुषार भारतीय यांना घाबरलेले आहेत असे अजिबात नाही. अहो, जो माणूस थेट तेही मुंबईतल्या गॅंगस्टर मंडळींचे बोट पकडून आपले साम्राज्य निर्माण करू शकतो उभे करू शकतो ते राणा, भारतीय यांना घाबरून चूप बसले आहेत असे अजिबात वाटत नाही कदाचित हि वादळापूर्वीची शांतता असावी..
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी