मराठवाड्यातले लायक नालायक २ : पत्रकार हेमंत जोशी
शेजारी राहणाऱ्या तरुणीने अचानक मागून येऊन तुम्हाला ह्ग केले तुम्ही रागावणार आहात का, पंक्तीला वाकून लाडू वाढणाऱ्या शेवंताला तू नको येऊ वाढायला, त्या तात्यांना पाठव म्हणण्याचा आगाऊपणा तुम्ही स्वप्नात तरी कराल का, ऐन दिवाळीत तुम्ही एकटेच घरी आहात नि कॉलेजातल्या मैत्रिणीने तुम्हाला म्हटले कि मी येऊन लावून देईन तुझ्या अंगाला उटणे, तुम्ही तिला चक्क नकार देऊन तुझ्या आईला पाठवून दे म्हणाल का, हो म्हणाल समजा कॉलेजातल्या मैत्रिणीची आई माधुरी दीक्षित असेल तर, बायकोच्या बहिणीने तुम्हाला एकांतात असतांना डोळा मारला, नेमकी भाऊबीज दुसरे दिवशी आहे, अशावेळी तुम्ही तिच्याकडून ओवाळून घ्याल का, नाही, याउलट तुम्ही तिला प्रेमाने विचाराल कि पाडवा कधी आहे तद्वत माझ्याकडे जर आपणहून दरदिवशी माननीय मुख्यमंत्री फडणवीसांविषयी चांगली माहिती आपणहून आणून दिली तर त्यावर
मी न लिहिता, त्यांच्याविषयीच्या भानगडीची माहिती केव्हा येते, वाट पाहावी का, हो, वाट पाहतो आहे, गेली चार वर्षे, पण हाती काही येत नाही मग जे काय चांगले येते त्यावर लिहून मोकळा होतो, त्यांच्याविषयी वस्तुस्थिती सांगतो…
अलीकडे जालन्याला पशुसंवर्धन राज्यमंत्री हरहुन्नरी हसतमुख उत्साही लोकमान्य, लोकप्रिय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी भव्य दिव्य, अभूतपूर्व, अतिप्रचंड, आगळा वेगळा असा पशुधन महाकुंभ मेळावा मराठवाड्यातल्या जालन्याला भरविला होता, याठिकाणी मुख्यमंत्र्यांची आठवण यासाठी कि असा पशुधन कुंभ मेळा भरविल्या जावा हे सर्वप्रथम प्रगत उत्तम शेतकरी, सरकारी अधिकारी आणि अर्जुन खोतकरांचे खाजगी सचिव कल्याण औताडे यांच्या डोक्यात आले त्यांनी त्यावर प्लांनिंग केले आणि थेट आपल्या मंत्र्याकडे ते मांडले, खोतकरांना पशुधन मेळाव्याची हि भव्य दिव्य कल्पना अतिशय आवडली, ते उठले त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठले, पशुधन मेळाव्याची संकल्पना त्यांनी सादर केली…
www.vikrantjoshi.com
कदाचित सांगून तुम्हाला खोटे वाटेल किंवा ऐकल्यानंतर तुम्ही एक उंच उडी घ्याल, एकही क्षणाचा विचार न करता, बऱ्या वाईट परिणामांचा अजिबात विचार न करता कारण सेनेचे खोतकर आणि भाजपाचे प्रभावी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव देखील जात नाही हे तुम्हाला सांगणे म्हणजे आजही सामना चे संजय राऊत लग्नाचे वाटतात, एवढे तरुण दिसतात हे त्यांच्या पत्नीला सांगण्यासारखे, थोडक्यात खोतकर करताहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल आहे, विशेषतः दुखकाळग्रस्त विदर्भ मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पशुधन मेळावा म्हणजे उत्पन्नाचे साधन ठरणार आहे हे चाणाक्ष अभ्यासू मुख्यमंत्र्यांच्याएका क्षणात लक्षात आले, अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे आहे त्यामुळे याचे क्रेडिट सेनेला जाऊ शकते असा कोणताही संकुचित विचार न करता किंवा खोतकरांना या मेळाव्याची परवानगी दिल्यानंतर रावसाहेब दानवे यांना नेमके किती वाईट वाटेल त्यावर न विचलित होता पवारांच्या भाषेत शेतकरी नसलेल्या पण शेतकऱ्यांसाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, फडणवीसांनी तेथल्या तेथे अर्जुन खोतकरांना परवानगी तर दिलीच पण निधीही उपलब्ध करून दिला, हि इज ग्रेट, एका राज्यमंत्र्याने आणि त्याच्या खाजगी सचिवाने, विशेष म्हणजे दोघेही मराठवाड्यातले, उत्पन्न वाढीचे मिरॅकल घडवून आणले, देशभरातले तब्बल सात लाख शेतकरी या बहुमोल अनमोल पशु मेळाव्याला भेट देऊन मोकळे झाले, पशुपालन कसे वाढवायचे आणि त्यातून कसे उत्पन्न मिळवायचे विशेषतः अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या मेळ्यानिमित्ते नेमके कळले आणि ते कामाला लागले, बघा यापुढे या राज्यात पशुपालन पशुसंवर्धनातही आम्ही कशी झेप घेतो ते, सलाम अर्जुन खोतकरांना ज्यांनी केवळ एक राज्यमंत्री असूनही हि क्रांती घडवून आणली…
मागला विषय पुढे नेतो, मराठवाड्यातल्याच परभणीच्या मेघना बोर्डीकर यांच्याविषयी नेमके येथे सांगायचे झाल्यास सध्या त्या आणि त्यांचे लाडके पप्पा भाजपामध्ये आहेत जेथे नेमका भाजपाचा अजिबात फारसा प्रभाव नाही, रावसाहेब दानवे किंवा मंत्री बबनराव लोणीकर यांना कधी असे का वाटले नाही कि परभणी जिल्ह्यात भाजपाचे काम विस्तारायला हवे, असे त्यांना कधी वाटले नाही त्यामुळे शिवसेनेने तेथे कधी भाजपाचे महत्व वाढूच दिलेले नाही, थोडेफार राष्ट्रवादीला या जिल्ह्यात स्थान आहे पण मेघना यांनी यावेळी खासदारकीची निवडणूक येथून लढवावी पण अपक्ष म्हणून नव्हे तर त्यांनी रीतसर शिवसेनेचे तिकीट घ्यावे आणि जिंकून यावे कारण विद्यमान शिवसेनेच्या खासदारांवर सेनेचे नेते आणि मतदार प्रचंड नाराज असल्याने
मेघना यांनी या नाराजीचा फायदा घ्यावा, भाजपमधून शिवसेनेत यावे आणि सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून मोकळे व्हावे, मला वाटते हे असेच घडेल, सेनेचा खासदार मेघना बोर्डीकर यांच्या स्वरूपात नक्की एकाने वाढेल….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी