मराठवाड्यातले लायक आणि नालायक ४ : पत्रकार हेमंत जोशी
मराठवाड्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकी आहे, युती आहे, आघाडी आहे पण ती अभद्र विषयांवर आहे, मराठवाड्यातल्या बहुतांश अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा कल अतिरिक्त पैसे मिळविण्याकडे अधिक असल्याने त्यांना त्यांच्या एकीचा युतीचा फायदा फक्त चांगले पोस्टिंग मिळविण्यासाठी होतो त्यानंतर त्यांना मिळणारी अतिरिक्त मिळकत केवळ स्वश्रीमंतीकडे वळविल्या जाते, मराठवाड्यातल्या स्थानिक नेत्यांना अधिकाऱ्यांना गोविंदभाई श्रॉफ व्हायचे नसते त्यामुळे जसे विदर्भातले मागासलेले तेच मागासलेपण मराठवाड्यातल्या सामान्य जनतेचाही नशिबी आलेले, दारिद्र्य बेकारी त्यांच्या पाचवीला पुजलेली…
नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची पुढली पिढी उच्चशिक्षित आहे, नशिबाने त्यांच्या बापाने त्यांच्यासाठी करोडो रुपयांची काळी कामे करून ठेवलेली आहे म्हणजे अमित देशमुख यांनी यापुढे काहीही केले नाही तरी त्यांच्या दहा पिढ्या आरामात घरी बसून खाऊ शकतील, अशावेळी मात्र अमित किंवा पंकजा जर बापाचेच अनुकरण करून राजकारण सत्ता केवळ पैसे मिळविण्याचे साधन म्हणून त्याकडे बघत असतील तर राज्य कोणत्याही पक्षाचे असो, मराठवाड्यातले शंकरराव चव्हाण किंवा तुकाराम मुंडे कोण, शोधणे अवघड ठरेल, अडचणीचे असेल. प्रत्येकाला अशोक चव्हाण व्हावेसे वाटते, शंकरराव व्हावे असे तीन चार हजार कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्यानंतर देखील जयदत्त क्षीरसागर यांना वाटत नाही आणि या अशा काळ्या पैशांच्या भरवशावर मोठी झालेली नेत्यांची अधिकाऱ्यांची पुढली पिढी कशी महाभयंकर असते हेही क्षीरसागर सारख्या नेत्यांनी आरसा समोर ठेऊन स्वतःला विचारायला हवे, त्यावर आत्मचिंतनही करायला हवे…
विशेषतः मराठवाडा विदर्भातल्या नेत्यांना अधिकाऱ्यांना आता अगदी उघड एवढेच सांगायचे बाकी आहे कि तुम्ही सारे पैसे मिळवा अधिकाधिक श्रीमंत व्हा पण ते करतांना अधिकाऱ्यांनी टी. चंद्रशेखर आणि नेत्यांनी मंत्र्यांनी नितीन गडकरी पॅटर्न राबवावा म्हणजे स्वतःसाठी पैसे नक्की मिळवायचे पण जराशी वेगळी पद्धत अवलंबून, त्यामुळे आपणही श्रीमंत तर होतोच पण देशाचा देखील विकास साधल्या जातो, वाटल्यास पैसे खाणार्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी गडकरी आणि चंद्रशेखर यांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणजे नावही होते आणि माणूस श्रीमंत देखील होत जातो. या दोघांची पद्धत एकदम मस्त आहे, होती म्हणजे कामाचा दर्जा राखून त्यांचे वरकमाई करणे असते, ज्याचे जनतेला वाईट वाटत नसते. इतर नेते किंवा अधिकाऱ्यांना मात्र कामाच्या दर्जाचे काहीही घेणे देणे नसते, पाच रुपयाची चादर पाचशे रुपयांना खरेदी करणारे अधिकारी आणि सत्तेतले नेते, येथे या राज्यात मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत, त्यांना या राज्यातल्या व्यापाऱ्यांनी आणि दलालांनी रंडी करून सोडलेले आहे, राज्य हे लुटण्यासाठीच असते हाच रस्त्यावरच्या रंडीसारखा त्यांच्या डोक्यात कायम विचार असतो आणि आचरणात आणल्या जातो…
अलीकडे ‘ उद्याचा मराठवाडा ‘ या दैनिकाचा वर्धापनदिन विशेषांक वाचण्यात आला. त्यात मी किती आणि कसा चांगला समाजसुधारक त्यावर नांदेड जिल्ह्यातल्या साऱ्या आमदारांच्या मुलाखती वाचतांना मनाशी हसू येत होते कारण त्या साऱ्यांनी ज्यापद्धतीने त्यांनी केलेल्या विकासकामांची जंत्री सांगितलेली आहे ते वाचल्यानंतर मनाला वाटते, अरे, नांदेड जिल्ह्याचा या आमदारांनी कॅलिफोर्निया करून सोडलेला आहे कि काय, प्रत्यक्षात केलेल्या कामाचा दर्जा बघून हेच म्हणता येते कि विकासकामांवर जेवढे खर्च झाले तेवढेच अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांच्या आणि नेत्यांच्या खिशात गेलेले आहेत. कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप चिखलीकर म्हणतात कि अशोक चव्हाण सोडलेत तर एकही नेता माझ्या विरोधात बोलणारा नाही, एक मात्र चिखलीकरांचे चांगले आहे, पूर्वी त्यांची लॉयल्टी अगदी उघड विलासराव देशमुखांशी होती आणि ते म्हणतात, अखेरच्या श्वासापर्यंत माझी लॉयल्टी केवळ देवेंद्र फडणवीसांशी असेल, त्यांचे हे वाक्य मनाला पटते, अलीकडे असे नेते अभावाने आढळतात अन्यथा जवळपास सारेच कुंपणावर बसलेले जयदत्त क्षीरसागर असतात. स्वतःला अजातशत्रू म्हणवून घेणारे प्रताप चिखलीकर यावेळी अविरोध निवडून येतात कि काय…
www.vikrantjoshi.com
अशोक चव्हाण यांच्या आमदार पत्नीला आजतागायत कधी भेटणे झालेले नाही पण त्या वैयक्तिक आयुष्यात खूप विनोदी असाव्यात असे त्यांनी ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांना द ग्रेट लीडर म्हटलेले आहे, त्यावरून वाटते, त्या नेमक्या विनोदी कशा हे त्यांनी मानलेल्या त्यांच्या दिरांना म्हणजे आमदार अमर राजूरकर किंवा बिल्डर जयंतभाई शाह यांना विचारणे योग्य ठरेल. पण केवळ नांदेड शहराचा किंवा नांदेड जिल्ह्याचा राजकीय अभ्यास करतांना, अशोक चव्हाण यांना आम्ही हीन लेखणे नक्की योग्य ठरणारे नाही कारण त्यांची नक्की नांदेड शहरावर आणि जिल्ह्यावर देखील राजकीय पकड आहे आणि हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे कि राज्यातले नेते हे हिंदी सिनेमातल्या डाकू सारखे असतात म्हणजे बडनेरा मतदार संघात थोडेफार टाकायचे आणि इतरत्र लुटपाट करून थोडेफार त्यातले खर्च करायचे त्यामुळे हिंदी सिनेमातले डाकू जसे अमुक एखाद्या गावात मसीहा म्हणून नावाजलेले पण इतर ठिकाणी लुटारू म्हणून गाजलेले असतात, बदनाम झालेले दरोडेखोर असतात तेच या राज्यातल्या बहुसंख्य नेत्यांचे, साऱ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांचे विशेषतः सत्ताधाऱ्यांचे, होऊन जाऊ द्या जेवढे वाटोळे या राज्याचे करायचे तेवढे, ना लाज ना लज्जा, बेशरम मंडळींच्या ढुंगणावर झाड उगवले तरी ते म्हणतात, सावली झाली सावली झाली…
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार डी. पी. सावंत, विधान परिषदेवर निवडून गेलेले राम पाटील रातोळीकर किंवा अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आणि आमचे मित्र हेमंत पाटील, देगलूर बिलोली विधान सभेचे आमदार सुभाष साबणे, किनवट विधान सभेचे प्रदीप नाईक, कंधार लोहा विधानसभेचे प्रताप चिखलीकर, मुखेड विधानसभेचे आमदार डॉ. तुषार राठोड, हदगाव विधान सभा मतदार संघाचे नागेश पाटील आष्टीकर, नायगाव विधान सभा मतदार संघाचे वसंतराव चव्हाण किंवा भोकर विधान सभा मतदार संघाच्या अमिता अशोक चव्हाण या सर्वांच्या मुलाखती वाचल्यानंतर असे वाटते जेव्हा केव्हा एखादा नांदेड जिल्ह्याचा फेर फटका मारायला निघेल, त्याला वाटेल आपण महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या मराठवाड्यात नव्हे तर अमेरिकेतल्या एखाद्या प्रगत राज्यातून फिरतो आहे कि काय, पण जे कागदावर असते तसे प्रत्यक्षात अजिबात नसते हेही येथल्या मतदारांना चांगले ठाऊक आहे त्यामुळे त्यातल्या त्यात बरा कोण, मतदारांना जो वाटतो तो आमदार होतो, काही अमरनाथ राजूरकर यांच्यासारखे भाग्यवान असतात जे मागच्या दाराने अगदी अलगद विधान भवनात प्रवेश करून मोकळे होतात…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी