मोठी माणसे : पत्रकार हेमंत जोशी
मी ओळखीच्यांना पैसे मागत नाही, माझे सरकारी दरबारी कोणतेही काम नसते फक्त माझे ओळखीच्यांना एकच सांगणे असते कि माझी दखल घ्या मला टाळू नका, माझ्या योग्यतेचा मानसन्मान मला द्या, त्यांना तेही जमत नाही मग मी त्यांची दखल घेतो तेव्हा मात्र ते कमालीचे अस्वस्थ होतात. हा अंक तयार करीत असतांना कुठेतरी चार दोन ओळी आयबीएन लोकमत वाहिनीच्या तद्दन सामान्य असलेल्या प्रमुखाला म्हणजे उमेश कुमावत यांना मी त्यांची नेमकी जागा कोणती, शब्दातून मांडले आणि त्यांचा फोन आला.तत्पूर्वी किमान पाच पन्नास वेळा जेव्हा केव्हा मी कुमावतला फोन केले असतील, त्याने त्या कॉल्सची साधी दखल देखील घेतली नाही पण नेमकी जागा दाखवल्यावर हि माणसे अस्वस्थ होतात, महत्वाचे म्हणजे अशा अमुक एखाद्या स्वतःला प्रभावशाली समजणार्या व्यक्तीवर मी चार ओळी लिहायचा अवकाश, इतर असंख्य अस्वस्थ त्यांच्याविषयी पुरावे देऊन मोकळे होतात, जसे उमेश कुमावतवर लिहिले आणि दिवसभरात त्याच्याविषयी सांगणारे कितीतरी मित्रांचे फोन्स आलेत, ठरवतो, त्याच्यावर पुन्हा केव्हा लिहायचे ते. अति सामान्य कुवतीची माणसे, अनेकदा नशिबाने मोठी होतात आणि अर्ध्या हळकुंडात असे काही पिवळे होतात, विचारू नका, त्याचवेळी आभाळाला टेकलेली संभाजी भिडे किंवा उदयन राजे भोसले सारखी असामान्य माणसे कायम जमिनीवर चालतांना दिसतात, मन भरून येते…
हर्षल प्रधान उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघतो. त्याचे कितीतरी वेळा निवडणुकीदरम्यान फोन येतात कि तुमच्यासाठी पाचपन्नास लाख रुपये मुद्दाम वेगळे काढून ठेवलेले आहेत, या आणि घेऊन जा पण गेल्या दहा वर्षात पैसे कॉलेक्ट करणे जमलेच नाही, वेळच मिळाला नाही. गम्मत हो, हर्षल आणि पैसे देईल, अशक्य, उलट तो तुमच्याच खिशातले पैसे काढून तुम्हालाच जेवायला घेऊन जाईल. येथे हर्षलचा विषय यासाठी कि उमेश कुमावत जेव्हा त्याच्याकडे अंगावर पडेल ते काम करण्यासाठी नोकरीला होता तेव्हापासून मी त्याला ओळखून आहे, पुढे जातांना आधी नशीब साथ देते त्यानंतर अभ्यास देखील करायचा असतो, पु. ल. देशपांडे कोण आहेत, त्यांना एवढे वाहिनीवर का महत्व द्यायचे, असे प्रश्न मग उमेशजी चार लोकात विचारले जात नाहीत, तुम्ही जेथे बसलात तेथे ‘ धडकन ‘ चित्रपटातल्या सुनील शेट्टीसारखे लोकांसमोर येऊ नका म्हणजे केवळ किमती कपडे घालून या क्षेत्रात माणूस राजबिंडा ठरत नाही त्यासाठी ज्ञान असणे, घेणे देखील आवश्यक असते, तुमच्या सभोवतालचे हुजरे तुम्हाला हे असे सांगणार नाहीत, मला मात्र वाटते, तुम्हाला मिळालेले मोठेपण कायम टिकावे. असो, येथे सध्यातरी उमेश कुमावत हा विषय संपलेला आहे…
माणूस मोठा होणे सोपे आहे पण मोठेपण टिकविणे कठीण असे काम आहे, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जवळ आणि लॉयल असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी आठवण झाली आणि मन यासाठी भरून आले कि हे लिखाण करीत असतांना कानावर पडले ते असे, मराठवाड्यात औश्याला जी पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र प्रचार सभा आहे त्यासभेला मान्यवरांच्या पहिल्या रांगेत मिलींद नार्वेकर यांना बसण्याचे स्थान देण्यात आलेले आहे. असे ऐकले कि मनाला बरे वाटते. अहो हेच ते मिलिंद ज्यांचे वडिलांवर प्रभू रामचंद्रासारखे प्रेम होते, अगदी अलीकडे म्हणजे होळीच्या दरम्यान त्यांचे वडील गेले आणि हा पठ्ठ्या वडिलांचे दुःख बाजूला ठेवून, डोळ्यातले अश्रू लपवून थेट चौथ्या दिवशी मातोश्रीवर एखाद्या हनुमानासारखा हजर, कामालाही लागला. मिलिंद नार्वेकर असोत कि आपले देवेंद्र फडणवीस, हे असे पुढे गेलेले त्या शरद पवारांना फॉलो करतात म्हणजे रात्री फार उशिरापर्यंत ते कार्यमग्न असतात आणि सकाळी साडेसहा सात वाजता पुन्हा नेहमीच्या उत्साहात कामाला लागतात. गम्मत म्हणजे तुम्ही अमुक एखादा मेसेज त्या मुख्यमंत्र्यांना रात्री तीन साडेतीन वाजता केला तरी आणि सकाळी सात वाजता केला तरी, मेसेज महत्वाचा असेल तर पुढल्या पाच मिनिटात फडणवीसांचे तुम्हाला उत्तर येते. मोठेपण टिकविणे हे असे कष्टाचे आणि दगदगीचे काम असते त्यापेक्षा आपण जे सामान्य जीवन जगतो तेच बरे, असे मनाला नक्की वाटत राहते…
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि गेल्या चार वर्षात म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी असा एकही क्षण वाया घालविलेले नाही जेव्हा त्यांनी या राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात किंवा निर्णयांची अंमलबजावणी करण्यात कसूर केला. निर्णय अनेक घेतात हो, बोलायला काय लागते पण घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली किंवा नाही, होते आहे किंवा नाही त्याचा फॉलो अप घेणे ज्याला जमते तो खरा नेता तो खरा लोकांचा मसीहा. आजपर्यँत मी फार कमी नेते बघितलेत कि जे निर्णय घेतल्यांनंतर त्या निर्णयांचा कमिशन कडे न बघता फॉलो अप घेतात, त्यातले एक आपले मुख्यमंत्री. त्यांनी घेतले निर्णय त्या निर्णयांवर अंमलबजावणी झाली नाही असे एखादे उदाहरण त्यांच्या विरोधकांनीही दाखवून द्यावे. औषधाला देखील असे उदाहरण सापडणारे नाही, त्यासाठी या राज्यावर या देशावर मनापासून खरेखुरे प्रेम असावे लागते जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नक्की आहे, त्यांना राष्ट्र आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे…
पत्रकार हेमंत जोशी