भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य २ : पत्रकार हेमंत जोशी
महाराष्ट्रात वाममार्गाने अलिकडल्या ३० वर्षात ज्यांनी अमापसमाप संपत्ती जमा केली असे एकही कुटुंब नाही ज्यांच्या घरी पुढली पिढी आणि ते स्वतः सुखा समाधानाने आयुष्य जगताहेत. बहुतेकांची मुले मुली वाया गेलेली त्या अपत्यांचे दररोजचा खर्च किमान एक लाख रुपये कारण ड्रग्स च्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचा खर्च मोठा असतो. महिन्याकाठी २५-३० लाख रुपये उडविणे त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. पेज थ्री च्या आहारी गेलेली तरुण पिढी, त्यांच्याकडे बघून त्यांचे मायबाप, त्यांची अवस्था येथेच नर्क भोगायला भाग पाडणारी असते. माझ्या कडे तर या राज्यातल्या तमाम बिघडलेल्या पिढीचे तंतोतंत पुरावेच आहेत. त्यामुळे काळ्या कमाईतून जेमतेम एखादी दुसरी पिढी ऐश करू शकते, फार काळ देशाला खड्ड्यात घालणारे सुखासमाधानाने जगणे अशक्य ठरते….
मिसाळ आडनावाचे अधिकारी आहेत, कोणत्याही फाईलवर पैसे दिसल्याशिवाय ते काम पुढे रेटतच नाहीत, अर्थात या राज्यातले नेते आणि अधिकारी सारेच मिसाळ, अशांना साथ देणारे आम्ही सारेच म्हणजे त्यात दलाल व्यापारी मीडिया कंत्राटदार मंत्री, आमदार, खासदार, सारेच्या सारे आलेत. कोकणात नाणार प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या साऱ्यांनीच नाणार प्रकल्प परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या कारण नाणार प्रकल्प सुरु होताच जमिनींचे भाव नक्की गगनाला भिडणारे होते पण प्रकल्प रद्द झाला आणि मिसाळ सहित अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, मिसाळ तर फक्त वेडे व्हायचे तेवढे बाकी आहेत कारण या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध लोकांच्या नावे करोडो रुपये गुंतवून जमिनी खरेदी केल्या आहेत. यापुढे नाणार प्रकल्प जर सुरु होणार नसेल तर खरेदी केलेल्या जमिनींचे भाव कवडी मोल ठरणारे आहेत. वाचकहो, हा प्रकृतीचा नियमच आहे कि केलेले सारे येथेच फेडून वर जावे लागते, मी पण अनुभव घेतलाय, घेतोय…
www.vikrantjoshi.com
पुढल्या वेळी फडणवीसांनी गुणवत्ता पारखून आणि दमात घेऊन जर अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिले आणि मंत्रिमंडळ सदस्यांना देखील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या तर घरचा रास्ता दाखवेल, सांगितले तर येथे या राज्यात बऱ्यापैकी कामाचा दर्जा राखून प्रगती साधने शक्य होईल. विशेषतः पदोन्नती होत होत जे मराठी अधिकारी या राज्यात पुढे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्या जातात त्या सर्वांना माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्यासारखे उत्तम काम करून आयुष्याचे सार्थ नियोजन का करावेसे वाटत नाही. सुरेश साळवी नावाचे एक सनदी अधिकारी मला वाटते निवृत्त होऊन १७-१८ उलटली असावीत. आजही त्यांची अधूनमधून भेट होते, ते केवळ पेन्शनच्या भरवशावर जगतात, एवढे नोकरीत असतांना प्रामाणिक होते, त्यामुळे बस ने प्रवास करतात, तुम्ही अगदी सुरेश साळवी म्हणून बनून नोकरी करावी असेही नाही पण घरातल्या पैशांना आणि पुढल्या पिढीला कीड लागेल निदान असेही आडवेतिडवे मिळवू नये. १९८० ते आजतागायत, या राज्याची घडी जी विस्कटली ती पुन्हा बसेल वाटत नाही….
सरकार मग ते कोणाचेही असो, विशेषतः संघ संस्कारातून आणि प्रबोधनकारांच्या विचारातून जन्माला आलेल्या युतीकडून तरी स्वच्छ सरकारची हमी अपेक्षित आहे. शासकीय व प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या पदावर नेमत्तांना गुणवत्तेच्या तत्वांचा अंगीकार स्वीकार करणे महत्वाचे ठरते याचे अधिक भान पृथ्वीराज चव्हाण ते या राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांना होते. देवेंद्र फडणवीसांची हि पाच वर्षे त्यांना या राज्यातल्या भामट्या नेत्यांशी सामना करण्यात गेली त्यामुळे त्यांना मनातून तीव्र इच्छा असून देखील थेट पृथ्वीराज चव्हाण होता आले नाही पण त्यांच्या मनातली अस्वस्थता कायम जाणवत असते आणि मला शंभर टक्के खात्री आहे, पुढले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हे चव्हाणांपेक्षा अधिक आक्रमक होऊन काम करतील. उत्तम प्रशासनाची खात्री जेथे असते तेथे राज्य नक्की झपाट्याने प्रगती करते. आधी गुणवत्तेच्या आधारावर मोठ्या प्रमाणात पोस्टिंग होत असे पण शरद पवार, अशोक चव्हाणांसारखे सत्तेत मुख्य पदी विराजमान झाले आणि महाराष्ट्र हे महाभ्रष्टराष्ट्र म्हणून देशात ओळखल्या जाऊ लागले….
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी