पुन्हा आमदार पुन्हा नामदार : पत्रकार हेमंत जोशी
आम्हाला असा आमदार अजिबात निवडून आणायचा नाही जो युतीचा उमेदवार आहे आणि पुन्हा एकदा नामदार होणार आहे, हि अशी चक्रम अविचारी विचार सरणी नक्की चंद्रपूरच्या मतदारांची नाही म्हणून ते वारंवार सुधीर मुनगंटीवार यांना भरगोस मतांनी निवडून आणतात. विजयोत्सव साजरा करतात यावेळीही मतदानाची तेवढी औपचारिकता बाकी आहे, सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकवार आधी आमदार तदनंतर नामदार होण्यासाठी सज्ज आहेत असे जो तो मतदार साऱ्यांना अगदी उघड अभिमानाने सांगत सुटला आहे. मी मतदारांसाठी काम केले नाही विकास साधला नाही लोकांसाठी झटलो झगडलो नाही तर मातापिता मला अजिबात माफ करणार नाहीत, मतदार मला जवळ करणार नाहीत, माझा पक्ष मला वारंवार संधी देणार नाही माझ्या घरातले म्हणजे माझे कुटुंबसदस्य मला विचारणार नाहीत माझ्या गावातले माझी अवहेलना करतील, माझी पत्नीही माझ्याशी बोलणे सोडेल हे सुधीर मुनगंटीवार यांना ते समाजकारणात उतरले आणि राजकारणात पडले त्यादिवसापासून त्यांना हे नेमके ठाऊक असल्याने हातून एखादी चूक घडेल असे अजिबात वागायचे नाही, हे त्यांनी ठरविलेले असल्याने त्यांची मतदारसंघातली राज्यातली पक्षातली त्यांची लोकप्रियता वाढत गेल्याचे दिसते….
www.vikrantjoshi.com
नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटीवारांना कायम राजकीय ताकद दिलेली असल्याने सुधीरभाऊंच्या मनात आदरणीय नेता म्हणून गडकरी यांच्याविषयी जरी मानाचे, मोठे स्थान असले तरी काहीसे ज्युनियर असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पुढे गेले म्हणून मुनगंटीवार कधीही अस्वस्थ झाले नाहीत उलट मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांचे साहेब असतात हीच नेमकी भावना मनात ठेवून त्यांनी कायम फडणवीसांना मान दिला त्यांचा आदर केला. भारतीय संस्कृतीमध्ये त्रिवेणी संगमाला विशेष महत्व आणि पावित्र्यही आहे. गडकरी केंद्रात तर सुधीरभाऊ आणि देवेन्द्रजी राज्यात या तिघांचे विविध विकास साधतांना विशेषतः विदर्भाचे भले साधतांना एकत्र येणे, एकमेकांना आडपडदा न ठेवता मनापासून सहकार्य करणे त्यांना जवळून ओळकणाऱ्यांना आनंददायी ठरते. तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि देवेंद्र फडणवीसांचे व सुधीर मुनगंटीवारांचे कुळ एकाच गावातले, मूल हे ते गाव, या गावातली हि मुले, विकासाची गंगा विदर्भात आणणे हेच या दोघांचे स्वप्न असल्याने त्यादोघांचे पाच वर्षे छान जमले, अर्थमंत्री म्हणून फारसा अनुभव नसतांना, फडणवीसांचे शासनाचे नाव बदनाम होणार नाही असे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी उत्तम काम केले….
मित्रहो, कमळाचे फुल जोपर्यंत देठावर असते आणि उमललेल्या स्थितीत असते,तोपर्यंत जल आणि सूर्य त्याचे मित्र असतात, पण देठापासून कमळाचे फुल तुटले किंवा आपल्या जागेवरून ढाळले कि जल व सूर्य दोन्ही कमळाला त्रासदायकच ठरतात. योगायोग मुनगंटीवारांच्या भाजपाचे चिन्ह कमळ आहे आणि त्यांना स्वतःला हे नक्की माहित आहे कि येथे मी जे सांगितले आहे त्यापद्धतीने जर मूळ संघ जनसंघ विचारांपासून दूर गेलो तर आपली किंमत नेता म्हणून झिरो शून्य होणार आहे, बुद्धिमान अर्थमंत्र्याला हे नेमके माहित असल्याने ते आजपर्यंत मनातल्या सकारात्मक सामाजिक विचारांपासून कधीही दूर गेलेले नाहीत. मुनगंटीवार यांचे प्रत्येक भाषण प्रभावी ठरते, श्रोते ते सिरियसली घेतात, मुद्दाम ऐकायला जातात कारण ते जे भाषणातून बोलतात ते तसेच करून दाखवतात, आश्वसक शब्दांची गुंफण ते प्रत्यक्षात उतरवितात. सुधीरभाऊ भाषाप्रभू आहेत, उच्चशिक्षित आहेत, अनुभवी आहेत अभ्यासू आहेत विचारवंत आहेत ते एक नेते म्हणून आणि मंत्री म्हणूनही आपल्या कार्याची वेगळी छाप सोडून मोकळे होतात म्हणून त्यांचे मतदार कायम त्यांच्या पाठीशी उभे असतात…
क्रमश: हेमंत जोशी