तारीख एकवीस पुन्हा फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी
पावसाप्रमाणे राजा सुद्धा सर्व लोकांचा आधार असतो. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही किंवा कमी झाला तरी माणसे कशीबशी जिवंत राहतात पण राजा जर वाईट निघाला तर राज्याचे वाटोळे जलद गतीने होते जे या राज्याचे युती सत्तेत येण्यापूर्वी तेव्हाच्या राजांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी करून ठेवले आहे, वाटोळे पुनःपुन्हा होऊ नये असे वाटत असेल तर किमान आणखी एक संधी एकवार युतीला, फडणवीसांना द्यायला हवी जर तेही मागच्यासारखे पद्धतीने वागणारे निघाले तर पुन्हा मतदारांना, आघाडीला अगदी सहज सत्तेत आणता येते. ज्याच्या डोक्यात सतत फक्त राज्याच्या हिताचा विचार असतो तो सहजासहजी वाटोळे करून मोकळा होईल असे कधी घडत नाही पण फार कमी मुख्यमंत्र्यांनी १९८० नंतर राज्याच्या हिताला प्राधान्य दिले बहुतेक केवळ आपापल्या नातेवाईकांचा व कुटुंबाचा विचार करणारे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. तुम्हाला मी हे मागे एकदा सांगितले आहे कि केव्हातरी मी सांताक्रूझच्या खाजगी विमान तळावर आमदार उदय सामंत यांना जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा तेथे जे सर्वात महागडे विमान होते ते विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाच्या मालकीचे होते, बहुतेक
सारेच हे असे कुटुंबाचे भले करून मोकळे झाले…
मतदानाची तारीख एकवीस पुन्हा सत्तेत फडणवीस हा नवा वाक्प्रचार डोक्यात ठेवून आणि हृदयात बिंबवून साऱ्यांनी निक्षून मतदान करायचे आहे आणि त्या त्या ठिकाणच्या योग्य उमेदवाराला नक्की मतदान करून निवडून आणायचे आहे. कोणत्याही शासकीय योजनेत किती जास्तीत जास्त पैसे ओरबाडता येतील या पद्धतीने आघाडीचे मंत्री आणि मुख्यमंत्री काम करायचे त्यांना अर्थात मदत संबंधित बदमाश अधिकाऱ्यांची आणि दलालांची कायम व्हायची, त्याला फडणवीसांनी बऱ्यापैकी वेसण घातले, वास्तिवक फडणवीसांना आणखीही शिस्त लावता आली असती पण त्यांच्या सभोवताली शरद पवारांसारख्या कावेबाज नेत्यांनी विविध मोर्च्याच्या रूपात डोकेदुखी निर्माण केल्याने फडणवीसांची बरीचशी ताकद विनाकारण नको ते गलिच्छ राजकारण सांभाळतांना खर्ची पडली, जर त्यांना राज्य हिताचे काम करतांना मोकळीक मिळाली असती तर त्यांनी जे केले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी राज्य हीत साधले असते, राज्याचे मोठे भले केले असते…
www.vikrantjoshi.com
मला शंभर टक्के विश्वास आहे तशी खात्री आहे कि येणाऱ्या नव्या शासनात अधिक दणकट अधिक गंभीर अधिक खंबीर फडणवीस तुम्हा आम्हा सर्वांना बघायला मिळणार आहेत, त्यांची बसणारी छडी साक्षात परमेश्वराच्या छडीसारखी असेल म्हणजे ती अनेकांना अशी बसेल कि आवाज तर अजिबात येणार नाही पण बदमाशांच्या ढुंगणाचे साल काढून त्यावर ते शिक्षा रुपी मीठ चोळून मोकळे होतील. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांना राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन ‘ अमन का मसीहा ‘ असा अत्यंत अनमोल शब्दांचा ‘किताब बहाल केला होता, ज्यांनी हे घडवून आणले त्यातले एक कट्टर मुस्लिम नेते माझे मित्र होते, मित्र आहेत. मी त्यांना सहजच विचारले कि संघाच्या फडणवीसांना कट्टर मुस्लिमांनी एकत्र येऊन असा ‘किताब बहाल करणे म्हणजे दुबईला सतत दोन महिने पाऊस पडण्यासारखे किंवा युगांडाची पुढली पिढी गोरी निपजण्यासारखे त्यावर ते म्हणाले, फडणवीसांना अमन का मसीहा हा ‘किताब आम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन कोणीही विरोध न करता यासाठी बहाल केला कि या पाच वर्षात ज्या मोकळ्या मनाने मुस्लिमांना मंत्रालयाचे सरकारी कार्यालयांचे दरवाजे खुले केले गेले त्यावर आम्हा सर्वांचे डोळे दिपले. राज्यातला गोरगरीब मुस्लिम अमुक एखाद्या रोगाने पछाडला आहे आणि त्याला मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी किंवा गिरीश महाजन यांच्या रोगमुक्ती मिशनने मदत केली नाही, असे कधीही घडले नाही, म्हणून आम्ही हे छोटेसे काम केले, फडणवीसांना थेट अमन के मसीहा ठरविले, संबोधले, म्हटले…
कडव्या मुस्लिमांनी एकत्र येऊन अमन का मसीहा तेही संघाच्या फडणवीसांना बहाल करण्याची आणखी अनेक कारणे होती. फडणवीस यांच्या नेतृत्वात हे राज्य सत्तेत आल्यानंतर एकही हिंदू मुस्लिम दंगल न होणे हे तर प्रमुख कारण होते. दारुल उलूम फैझान ए रझा चे मुक्ती मोहम्मद झई यांच्या हस्ते असा सत्कार आणि पुरस्कार फडणवीसांना मिळणे, ज्यांना ते ठाऊक आहेत त्यांना त्या कार्यक्रमाचे मोठे आश्चर्य वाटले, देशात त्या समारंभाची चर्चा झाली हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. भाजपाशी संलग्न नसलेल्या विविध कट्टर मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन फडणवीस यांना हा सन्मान बहाल करणें, अघटित असे घडले जणू सबका साथ सबका विश्वास हि केवळ घोषणा नसून त्या दिशेने फडणवीसांनी पाऊल टाकले त्याचेच हे द्योतक, असे म्हटले तर त्यात वावगे ते कसले…
क्रमश: हेमंत जोशी