भारतीय जनता पक्ष : दक्ष कि दुर्लक्ष : पत्रकार हेमंत जोशी
एक जाहिरात आहे, दाग अच्छे है तसे भारतीय जनता पक्षविषयी म्हणता येईल, बदलाव अच्छे है, सुरवातीचा जनसंघ आणि आजचा भारतीय जनता पक्ष, केवळ या राज्यातले त्यात घडलेले बघितले बघितले तरी डोळे विस्फारतील कान टवकारतील. कालपर्यंत केवळ बामनांचा असा हिणविल्या जाणारा जनसंघ, कायम डिपॉझिट जप्त होणारा पक्ष ते आजचा सर्व ज्ञाती जमातींनी वेढलेला भाजपा, मिळालेले यश, अनाकलनीय आहे. कधी मोठ्या संख्येने मुस्लिम ज्यात असतील तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, ६० ते ८० च्या दशकात असे जर एखाद्याने भविष्य वर्तविले असते तर त्याला लोकांनी वेडा झाला आहे, म्हटले असते पण बदल स्वीकारले, जे जे चांगले होते ते अंगिकारले म्हणून वडाच्या झाडासारखा भाजपा फोफावला विश्वात विस्तारला जगभर पसरला कानाकोपऱ्यात पोहोचला.मन मोठे ठेवले कि चांगलेच होते हे भाजपाने दाखवून दिले म्हणजे जे जे चांगले होते ते ते भाजपाने मनापासून स्वागत केले म्हणून आज या राज्यातही ते येथपर्यंत पोहोचले अगदी ग्रामपंचायत ते मंत्रालय, लोकशाहीत असलेल्या सार्या क्षेत्रात ते पाय घट्ट रोवून मोकळे झाले. राज्याच्या देशाच्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, हिंदुस्थानातला भाजपा हा एकमेव असा पक्ष ज्याचे कार्यकर्ते सतत काहीतरी वेगळे करून दाखवत असतात…
इतर असे फार कमी पक्ष आहे जेथे कार्यकर्त्यांना देखील मान सन्मानाचे स्थान असते, अन्यथा बहुतेक राजकीय पक्षात किंवा संघटनेत जो तो नेता कार्यकर्त्यांना खुबीने वापरून घेण्याचे तेवढे काम करतो नंतर त्याच कार्यकर्त्याचा कंडोम करतो, ज्याला आधी वापरले त्यालाच घाण समजून फेकून देतो. येथे भाजपा मध्ये संघ स्वयंसेवक हा मूळ गाभा बेस असल्याने भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यालाही मानाचे स्थान आहे, तू आहे म्हणून आमचे छान सुरु आहे असे भाजपा नेते आपल्या कार्यकर्त्यांना कायम सांगत आले आहेत, असतात. या राज्यात सर्वप्रथम २०१४ मध्ये भाजपाने जे स्थान मिळविले, प्रमुख कारण नेमके हेच होते कि त्यांनी कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले, त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. आता देखील फार वेगळे वातावरण नाही हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल कारण भाजपाने आणि फडणवीसांनी विविध लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आधी विश्वासात घेतले ज्याने घडले असे, इतरांनी वेळोवेळी कान फुंकले तरी निर्माण झालेले कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यातला एकही विचलित झाला नाही, त्यामुळे चांगले परिणाम उत्कृष्ट निकाल येत गेले…
www.vikrantjoshi.com
कालचा संघ जनसंघ आणि आजचा बहुतेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वीकारलेला संघ विचार आणि भाजपा, थेट स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील जाऊन बसला हे सारे आनंद देणारे आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे जे अतिशय सामान्य कार्यकर्ते तळागाळात इतरांसाठी काम करणारे कार्यकर्ते जेव्हा भाजपाने आपल्याले नेमके महत्व त्यांना विशद करीत आणले तेव्हाच त्यांचे मिशन पूर्ण झाले. अलीकडे प्रत्येक कोपऱ्यात जे भाजपा कार्यकर्ते उभे राहिले त्यांना विचलित करणे किंवा नेहमीप्रमाणे काहीतरी थापा मारून किंवा त्यांच्या मनात विष कालवून त्यांना आपल्याकडे खेचणे अजिबात शक्य नाही हे जेव्हा शरद पवारांसारख्या पाताळयंत्री नेत्यांनाही लक्षात आले तेथेच ते आधी खचले नंतर अस्वस्थ झाले. महत्वाचे म्हणजे सेना भाजपा युतीने सत्तेत आल्यानंतर १९९५ ते २००० दरम्यान ज्या घोडचुका केल्या होत्या ज्यामुळे पुढे पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी तब्बल १५ वर्षे वाट बघावी लागली त्या चुकांची कोणतीही पुनरावृत्ती देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे प्रमुख नेते म्हणून होऊ दिलेली नाही त्यामुळे तेच पुन्हा एकवार सत्तेत येणार आहेत हे अगदी मतदानाआधी जो तो ज्याला त्याला सांगत सुटलेला आहे…
एखाद्या स्त्रीला दिवस गेलेत आणि तिचे मोठे पोट दिसायला लागले कि जो तो ओळखीचा तिला सांगत सुटतो कि तुला अमुक होणार आहे तमुक होणार आहे म्हणजे काही तिला मुलगा होईल सांगतात काही मुलगी होईल सांगतात तर काही जुळे होईल असेही सांगतात पण सेना भाजपा युती आणि विधानसभा निवडणूक, मला अगदी खरे सांगा, या राज्यातला एकही कार्यकर्ता किंवा मतदार असे सांगतांना तुम्ही पहिला आहे का कि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा वंचित आघाडी किंवा अन्य कोणी इतर सत्तेत येईल म्हणून, नाही अजिबात असे कोणीही सांगत नाही याउलट जो तो ज्याला त्याला हेच सांगत सुटलाय कि यावेळीही सेना भाजपा युती सत्तेत येईल आणि श्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. हे जो तो ज्याला त्याला यासाठी सांगत सुटलाय कारण मतदाराला नेहमी हेच वाटत असते कि मी ज्या पक्षाला मतदान करणार आहे तोपक्ष नक्की जिंकून येणार आहे, यावेळी मला तर असे कायम वाटते आहे किंवा तेच खरे असावे कि बहुतेक सर्व मतदारांनी हेच ठरविले आहे कि सेना भाजपा आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून मोकळे व्हायचे त्या कॉन्फिडन्समुळेच ते सर्वांना सांगताहेत कि युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे…
क्रमश: हेमंत जोशी