दादागिरी लै भारी : पत्रकार हेमंत जोशी
माझ्या वर्गात ज्या मुली होत्या त्यापैकी एक बावळट वेंधळी दिसायची अभ्यासात फारशी हुशार नव्हती, जी आम्हा मुलांना आवडायची ती आवडण्याचे कारणही असे होते कि एक तर ती श्रीमंत होती, तिचे कपडे मस्त मस्त असायचे, अभ्यासात तर ती हुशार होतीच पण दिसायला नीटनेटकी असल्याने आमच्यासाठी ती सायरा बानो होती, माझ्यासाठी तर स्वप्नांतली राजकुमारी होती, असे वाटायचे मी अमिताभ असावे तिने माझी जया भादुरी व्हावे. पुढे मी शिक्षणानिमित्ते नोकरी आणि व्यवसायानिमीत्ते शहरात निघून आलो, खूप वर्षांनी जेव्हा त्या दोघी गावातल्या कुठल्याशा समारंभात भेटल्या तेव्हा त्या दोघींनाही मी पटकन यासाठी ओळखले नाही कि जी एकदम बावळट होती ती आता गावातली सेक्सी रेखा म्हणून ओळखल्या जाऊ लागली, एकतर तिला श्रीमंत नवरा भेटला होता ती नखशिखांत बदलली होती आणि जी हुशार चुणचुणीत माझ्या स्वप्नातली जया भादुरी होती तिला व्यसनी नवरा भेटल्याने ती ओळखू येणार नाही एवढी काळवंडली होती, काळजीने गाल आत गेलेले आणि साधे कपडे अंगावर, थोडक्यात अमुक एखाद्याला अंडरएस्टिमेट करायचे नसते, शरद पवारांनी काहीशा साध्या राहणाऱ्या, जमिनीवर पाय टेकून चालणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांना असे विनाकारण अंडरएस्टिमेट केले त्याच पाटलांनी मी दिसतो तेवढा साधा पण माझी राजकारणावर हुकमत कशी, पवारांना दाखवून दिले…
पाच वर्षांपूर्वी जेव्हा फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आले त्यानंतर केवळ काही महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांच्यासारखे शिलेदार अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना विशेषतः पवार गटाला सळो कि पळो करून सोडतील वाटले नव्हते पण ज्यादिलीपकुमार ने राजेंद्रकुमारला कमी लेखले होते त्याच राजेंद्रकुमारला पुढे ज्युबीलीकुमार म्हणून ओळखले जाऊ लागले, पवारांचे फडणवीसांच्या बाबतीत हे असेच झाले पवारांचे राजकारण फ्लॉप ठरले आणि फडणवीस ज्युबीलीकुमर झाले, त्यापाठोपाठ गिरीश महाजन किंवा चंद्रकांत पाटलांसारखे भाजपा नेते देखील विरोधकांना फार वरचढ ठरले. पुण्यातील कोथरूड हा विधानसभा मतदार संघ जसा मोठ्या प्रमाणावर ब्राम्हण मतदारांचा आहे तसा हा मतदारसंघ जगात विविध क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या निष्णात चतुर बुद्धिमान हुशार चलाख मतदारांचा देखील आहे आणि जे बुद्धिमान आहेत त्यांना एवढे तर नक्की माहित आहे कि जसे मेधा कुलकर्णी यांना त्यांनी उत्स्फूर्त निवडून दिले होते त्याचपद्धतीने ते शंभर टक्के त्यांच्या या मतदारसंघाची चौफेर कामे प्रगती उन्नती होण्यासाठी पुन्हा सत्तेत येणाऱ्या चंद्रकांत पाटलांना विजयी करून त्यांच्याकडून विविध विकासाची कामे करवून घेतील. मला वाटते कोथरूड मधल्या मतदारांचे नक्की ठरले आहे, चंद्रकांत पाटलांना भरगोस भरगच्च मतांनी निवडून आणायचे आहे…
क्रमश: हेमंत जोशी