पटेल पवारांचे पाप : पत्रकार हेमंत जोशी
शरद पवारांनी चांगल्या विचारांच्या नेत्यांना आपल्या पक्षात कधीही मोठे होऊ दिले नाही, अमुक एखादा नेता जेवढ्या वाईट विचारांचा, देशाला राज्याला खड्डयात टाकणारा तो मग पवारांना सर्वाधिक जवळचा, त्यांचा लाड्काही त्यामुळे चांगले नेते एकतर कधी पवारांकडे फिरकलेच नाहीत, जे चुकूनमाकून पवारांच्याजवळ गेले अशा गोविंदराव आदिक किंवा गुरुनाथ कुलकर्णी इत्यादींवर एकतर ढसाढसा रडण्याची वेळ आली किंवा रत्नाकर महाजन यांच्यासारखे पवारांना सोडून बाहेर पडले. सिजे हाऊस प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने अलीकडे प्रफुल्ल पटेलांना बोलावून घेतले फार बरे झाले. चित भी मेरी आणि पट भी मेरी पद्धतीने राजकारणाचा कुटुंबाच्या भल्यासाठी उपयोग करून घेणारे प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना वाटते कि त्यांनी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वर्चस्व स्थापित करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना वापरून घेतले पण आता पवारांच्याही ते लक्षात आले, प्रफुल्ल पटेलांनी पवारांनाच अधिकाधिक वापरून घेतले…
जेव्हा पवारांना सोनिया गांधी आणि सोनिया गांधी यांना पवारांची राजकीय जवळीक अत्यंत आवश्यक होती तेव्हा त्या दोघातल्या कॉमन मन असलेलया प्रफुल पटेल यांनी एकाचवेळी त्या दोघांचाही आपल्या भल्यासाठी, सत्तेसाठी, सत्तेतून मिळणारया राजकीय फायद्यासाठी झक्कास उपयोग करवून घेतला. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे करावे तेवढे कौतुक कमी कारण पुढे याच प्रफुल्ल पटेल यांनी भाजपा गोटात देखील शिरून आपले राजकीय वजन आणि महत्व कायम ठेवण्यासाठी हे सत्तेत आल्यानंतर प्रयत्न सुरु केले त्यासाठी त्यांनी गुजराथी आणि विदर्भवासी या दोन कार्ड्सचा देखील उपयोग केला पण यावेळी पटेलांची सडकी डाळ फडणवीस मोदी आणि शाह यांनी शिजू दिली नाही, पटेलांना अजिबात जवळ केले नाही, जवळ येऊ दिले नाही कारण पवारांचे उजवे हात पटेलांचे सारे काळे कारनामे यांना नेमके माहित होते…
www.vikrantjoshi.com
मुंबईतले सर्वात प्राईम ठिकाण वरळीची शिवसागर इस्टेट जेथे तुम्ही आम्ही साधा संडास देखील विकत घेऊ शकत नाही त्या इस्टेट मध्ये केंद्रात मंत्री झाल्यानंतर पटेलांनी सिजे हाऊस नावाची देखणी महागडी प्रचंड मोठी वास्तू उभी केली. पूनम चेंबर्स नावाने आधी ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीच्या तळाशी १९८५ ते २००० दरम्यान इकबाल मिरची याचा फिशरमन नावाचा मुंबईतला पहिला लेडीज बार होता. होय, ८५ च्या दरम्यान मुंबईतल्या आंबट शौकिनांसाठी दोनच लेडीज बार होते, लिंकिंग रोड खार ला अरविंद आणि महेश या दोन ढोलकीया बंधूंचा “सीझर पॅलेस” आणि इकबाल मिरची याचा “फिशरमॅन” हे दोन लेडीज बार असे होते जेथे पाय ठेवायला देखील जागा मिळत नसे. पुढे आपले कोण काय उखडून घेईल या मस्तीत सदैव वावरणाऱ्या पवारांच्या असंख्य फंटारांपैकी एक असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी हि इमारत विकत घेतली, जमीनदोस्त केली त्यावर नव्याने, सिजे हाऊस बांधले आणि तेथेच वरच्या मजल्यावर असलेल्या वसवलेल्या महालात स्वतः प्रफुल्ल पटेल राहायला गेले. तेथेच त्यांनी कार्यालय देखील थाटले…
भविष्यात युतीचे नेते आघाडीच्या नेत्यांसारखेच वागायला लागले तर त्यांनाही मतदारांनी नक्की त्यांची जागा दाखवून द्यायची पण युती सत्तेत येण्यापूर्वी ज्यांनी या देशाचे आपल्या राज्याचे खूप खूप वाटोळे केले त्या आघाडीच्या नेत्यांना आपण सर्वांनी एकत्र येऊन अजिबात माफ न करणे त्यावर जालीम आणि उत्तम उपाय म्हणजे या मंडळींना सत्तेपासून कोसो दूर ठेवणे, तेवढे नक्की आपल्या सर्वांच्या हाती आहे जे घडणे अत्यावश्यक आहे. सरकार मात्र आपले काम चोख पार पाडते आहे पवारांच्या प्रत्येक बदमाश नेत्याला आता सांगावे लागते आहे, त्यांनी एवढी संपत्ती नेमकी कोठून व कशी जमा केली, मग ते भुजबळ असतील, पटेल असतील किंवा उद्या खुद्द शरद पवार देखील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी