विना राडा, युगेंद्र पवारांचा साक्षगंध साखरपुडा :
पुण्यातल्या कुलकर्णी आडनावाचे ब्राम्हण त्यांच्या दोन्हीही मुलींनी नाव काढले त्याचे असे झाले मोठ्या मुलीचे जगप्रसिद्ध उद्योजक यश बिर्लाच्या मुलाशी वेदांत यश बिर्ला यांच्याशी लग्न ठरले आहे, बिर्ला कुटुंबीयांपैकी युगेश कडल्या कार्यक्रमाला हजेरी दिली ती वेदांत आणि त्याच्या वाग्दत्त वधूने, अर्थातच कुलकर्ण्यांची दुसरी मुलगी बारामतीच्या पवारांकडे नांदायला जाते आहे थोडक्यात आम्ही ब्राम्हण येथेही आघाडीवर, शिव्या आम्हालाच द्यायच्या वरून लेकी बाळी आमच्याच घरातल्या नांदायला घेऊन जायच्या म्हणजे तुझे माझे जमेना पण तुझ्याशिवाय करमेना त्यातला हा प्रकार. विशेष म्हणजे युगेंद्र आणि तनिष्का तसेच कुलकर्ण्यांच्या मोठ्या मुलीचा वेदांतशी होणारा विवाह दोन्ही एकाच महिन्यात म्हणजे बिर्लांकडले लग्न 2 नोव्हेंबरला तर युगेंद्र तनिष्काचा विवाह सोहळा 23 नोव्हेम्बरला आहे. मीडिया खोटे सांगते आहे कि युगेंद्र यांच्या साखरपुड्याला अख्खे पवार कुटुंबीय एकत्र आले होते किंबहुना ज्या सख्य्या भावाने अजित पवारांना राजकीय दृष्ट्या अलीकडे अडचणीत आणले आहे सतत तसे प्रयत्न ज्या शर्मिला वाहिनी श्रीनिवास पवार आणि युगेन्द्रकडुन केल्या जाताहेत त्यांच्याकडल्या या महत्वाच्या कार्यक्रमाला अजितदादा आणि कुटुंबियाला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती…
www.vikrantjoshi.com
जायचे नाही हेच अजितदादा पत्नी आणि मुलांचे ठरलेले होते पण त्याआधी पार पडलेला अजितदादांचा वाढदिवस, श्रीनिवास पवार आपणहून अजितदादांना शुभेच्छा द्यायला गेले, दोघातला मनमुटाव त्यामुळे कमी झाला, बरे झाले अजितदादा सहकुटुंब ज्या युगेन्द्रने त्यांच्या घरात फूट पाडली मोठ्या मनाने त्याच्याच साखरपुड्याला जाऊन आले. या वर्षाअखेर श्रीनिवास आणि अजितदादा दोन्हीच्या मुलांचे विवाह सोहळे आहेत, दोघा सख्ख्या भावात शरद पवार काकांनी मोठ्या खुबीने घडवून आणलेली फाटाफूट, अजितदादांची आई अस्वस्थ आहे पण शरद पवारांसमोर त्याही हतबल ठरल्या आहेत. मीडियावाले तद्दन खोटे सांगताहेत कि साखरपुड्याला पुन्हा नेहमीप्रमाणे अख्खे पवार घराणे एकत्र आले होते, अजिबात नाही, याउलट अनेकांची अनुपस्थिती त्यादिवशी जमलेल्या मोजक्या मंडळींना मनापासून खटकली कि बरेचसे पवार कुटुंब सदस्यांनी या सोहळ्याला पाठ फिरविली किंवा त्यांना बोलावण्यात आलेले नव्हते. शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तआधी जसे राज्यातल्या अनेक राजकीय घराण्यानां एकमेकांपासून वेगळे केले त्यांच्यात कायमची फूट पाडली पुढे त्यांनी आपल्या घराला देखील असुरी राजकीय महत्वाकांक्षेपोटी एकमेकांपासून तोडले विभक्त केले, एवढे कि युगेन्द्रच्या साखरपुड्याला एकत्र जमलेले थोडेफार पवार कुटुंब सदस्य देखील त्यादिवशी एकमेकांना अनेकदा टाळतांना दिसले, एकमेकांशी भेटल्यानंतर सारेच फारसे खुश नव्हते, त्या साऱ्यात अढी निर्माण झाल्याचे लगेच लक्षात येत होते. पोटची लेक सुप्रिया सुळे कायम आपल्यानंतरही राजकारणात वरचष्म्याने वावरावी हेच शरद पवारांचे स्वप्न असावे त्यातूनच अलिकडल्या केवळ काहीच वर्षात समस्त पवार घराण्याची पुढली पिढी एकमेकांच्या विरोधात उतरतांना दिसते आहे, बुजुर्ग काकांचाच हा महाप्रताप आहे हे तुम्हाला सांगणे म्हणजे चित्रविचित्र पत्रकार म्हणजे अनिल थत्ते हे ठाणेकारांना सांगण्यासारखे. अजित पवार आणि कुटुंबीय त्यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास आणि कुटुंबीय, शरद पवार आणि सुप्रिया पवार तिकडे अभिजित पवार आणि आप्पासाहेब पवारांची पुढली पिढी, म्हणजे रोहित पवार व त्याचे आई वडील जो तो एकमेकांशी जीवघेणी राजकीय स्पर्धा करतो आहे, ज्याच्या हाती सत्तेचा ससा तो पारधी बनून यापुढे इतरांना राजकारणातून उठवण्याचीच मोठी शक्यता पवार घराण्यात नक्कीच निर्माण झालेली आहे. एखाद्या सिनेमातला खलनायक घरातल्या साऱ्यांना आधी ठार मारतो सरतेशेवटी तो स्वतः देखील पोटात तलवार खुपसून घेतो, शरद पवारांनी सत्तेच्या लालसेतून फारसे वेगळे केलेले नाही, हि तर सुरुवात आहे पण पुढल्या केवळ काहीच वर्षात कदाचित शरद पवारांच्या डोळ्यादेखतच राजकीय महत्वाकांक्षी पवार कुटुंब सदस्य एकमेकांच्या जीवावर उठल्यास त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, पेरले तसे उगवते….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी